सिद्धूऐवजी चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यामागे काँग्रेसचं नेमकं कारण काय?

पंजाबच्या विधानसभा निवडणुकीला १३ चं दिवस बाकी आहेत. अशात सगळ्या पक्षांचं जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालंय म्हणजे उमेदवारांची लिस्ट फायनल झालीये, त्यांचा प्रचार सुद्धा जोरात सुरुये, संकल्प पत्राची लिस्ट फायनल झालीये. त्यात काही पक्षांनी आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा फायनल केलाय.  त्यामुळं एकूणचं कसं निवडणुकीचं चित्र पूर्ण झाल्यासारखं आहे.

पण एका गोष्टीची मात्र सगळ्या देशभरात चर्चा होती कि, सत्ताधारी काँग्रेस पक्ष आपला बालेकिल्ला असलेल्या पंजाबमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करेल. कारण पक्षातली अंतर्गत भांडण कोणापासून लपून नाही, त्यात नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणजित सिंग चन्नी यांच्या नावात मोठी चुरस होती, त्यामुळे काँग्रेस हायकमांड मोठं कन्फ्युज होत.

पण आज राहुल गांधी यांनी खुद्द पंजाबमध्ये जाऊन एका सभेला संबोधित करत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चरणजित सिंह चन्नी यांचं नाव फायनल केलंय. सध्या पंजाबचे मुख्यमंत्री चन्नीचं कारभार पाहत आहेत.  पण पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये पंजाबमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दलित समाजातून आल्याने चरणजित सिंग चन्नी यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना मागे टाकलेयं.

चन्नी यांचं नाव जाहीर करताना राहुल गांधी यांनी म्हंटल कि, आम्ही एका नावावर येण्यावर खूप कन्फ्युज होतो, पण पंजाबच्या जनतेने आमचं काम हलकं केलं, जनतेने आम्हाला सांगितलं कि, आम्हाला गरीब घराण्याचा मुख्यमंत्री हवा आहे, जो गरिबीला समजेल, जो आमची भूक समजेल. हा निर्णय पंजाबच्या जनतेचा आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे. त्यामुळे चरणजीत सिंह चन्नी याना मी काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा कँडिडेट म्हणून फायनल करतोय. 

 आता काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून चन्नी  हे नाव फिक्स केलं खरं पण त्यामागे खूप मोठं कारण आहे भिडू.. नाहीतर उगाच काय चन्नी यांनी सिद्धू यांच्यामागून येऊन पुढे निघून गेले. 

कारण तिथलं जातीय समीकरण म्हणजे आता डिटेल मध्ये सांगायचं झालं तर,  २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, पंजाबच्या २.७७ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ३१.९% लोकसंख्या दलित समाजाची आहे. मात्र, दलित समाजाचा मोठा भाग हिंदू दलितांचाही आहे. पंजाबमध्ये सुमारे ५३.१९ लाख दलित शीख आणि ३४.४२ लाख दलित हिंदू आहेत. दलित शीख समाज आणि दलित हिंदू समाजही वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागलेला आहे.

दलित शीख समाजात मुळात चार पंथ आहेत जे महजबी, वाल्मिकी, अदधर्मी आणि रामदासिया शीख म्हणून ओळखले जातात. राज्यात सुमारे २५.६२ लाख महजबी शीख आहेत. यानंतर दलित शिखांमध्ये रामदासिया समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. राज्यात सुमारे १४.४३ लाख रामदासिया शीख आहेत. याशिवाय २.०७ लाख वाल्मिकी आणि ०.८६ लाख अदधर्मी शीख आहेत. राज्यात सुमारे २७,३९० दलित बौद्ध आहेत.

पंजाबमधील दलित समाजामध्ये मग ते सामाजिक आणि राजकीय पातळीवर अनेक विरोधाभास आहेत. पण हा समाज अनेक आघाड्यांवर एकवटला आहे. परंपरेने चामड्याच्या कामात गुंतलेल्या रामदासिया आणि गैर-धार्मिक समुदायाचा चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे स्पष्ट कल आहे. दरम्यान, सर्वात मोठा दलित समुदाय, महजबी शीख यांचा कल काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या दोन्ही पक्षांकडे आहे. दुसरीकडे, प्रामुख्याने शहरांमध्ये राहणारा वाल्मिकी समाज काँग्रेसला पाठिंबा देतो.

आणि काही दिवसांपूर्वीचं जेव्हा काँग्रेसमध्ये वाद झाले आणि कप्तान अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तेव्हा पक्षाची अब्रू चांगलीच चव्हाट्यावर आली होती, म्ह्णून काँग्रेसने आपली लाज राखण्यासाठी राज्यात पहिले दलित मुख्यमंत्री म्हणून चरणजित सिंग चन्नी यांना संधी दिली.

आता जरी नवज्योत सिंग यांनी राज्यात राजकीय समीकरण बदलली असली, तरी त्यांना संधी देणं म्हणजे वापरलेलं दलित कार्ड गमवण्यासारखी गोष्ट होती. कारण चन्नी हे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री झालेत, अश्यात काही वेळात त्यांनी खूप लोकप्रियता मिळवलीये, त्यामुळे आताच्या निवडणुकीत जर पक्षाने सिद्धू यांची निवड केली असती, तर काँग्रेसवर एक प्रकारे दलितांचा वापर केल्याचा आरोप झाला असता. त्यामुळे पक्षाने इथे सावधगिरी बाळगली.

त्यात पक्ष अंतर्गत सुद्धा चन्नी यांच्या नावाचाच बोलबाला होता. कारण म्हणजे सिद्धू यांनी पक्षात आपले समर्थक गमावलेत. कारण क्वचितच असे कोणी उरले असेल ज्यांच्या विरोधात ते बोलत नाहीत. सिद्धू यांनी नेहमी ‘मी’ वर लक्ष केंद्रित केलेय, आमच्यावर नाही, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. 

त्यात काही महिन्यांपूर्वी सिद्धूला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आमदारांनी आणि इतर नेत्यांनीही चन्नी हे लोकांचे लोकप्रिय बनलेत असं सांगितलं. ते म्हणतायेत आम्ही एका महिन्यापासून गावोगावी प्रचार करत आहोत आणि जेव्हाही आम्ही लोकांना मुख्यमंत्र्यांच्या नावावर प्रतिक्रिया विचारतो, तेव्हा ते चन्नी यांचे नाव घेतात. एकाही व्यक्तीने सिद्धूचे नाव घेतले नाही.

एकूणच काय, चन्नी मागून येऊन फॉर्मात आलेत, त्यात सिद्धू यांनी पक्षातच भांडण लावून स्वतःची आणि पक्षाची इमेज खराब केली होती. जी चन्नी यांनी पुन्हा दुरुस्त करण्याचं काम केलंय. त्यामुळे अर्थातच काँग्रेस हायकमांड सगळ्यांची नाराजी घेऊन चन्नी यांना डावलू शकत नव्हते. म्हणून उशिरा का होईना पक्षाने चरंजीत सिंग चन्नी यांनाच आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून फिक्स केलंय. 

हे ही  वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.