राजू श्रीवास्तव यांच्यावर जबाबदारी असणाऱ्या उत्तरप्रदेश फिल्मसिटीचं आता काय होणार
अभिनेता सुशांत सिंग यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड मध्ये ठराविक घराण्यातील लोकांनाच काम देण्यात येतं, बॉलिवूड मध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणात असून जो कोणी या विरोधात बोलतो त्याला काम मिळू देत नसल्याच्या तक्रारी एक गट करत होता.
त्यात अभिनेत्री कंगना राणावत हिने शिवसेनेवर केलेल्या आरोपा नंतर तिच्या घरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते. त्यामुळे बराच बाद चिघळला होता. या सगळ्या वादा दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी सप्टेंबर २०२० मध्ये उत्तरप्रदेश मध्ये फिल्म सिटी उभी करण्यात येईल अशी घोषणा केली होती. वर्ल्ड क्लास फिल्म सिटी बनवण्याचे ध्येय असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते.
योगी आदित्यनाथ यांनी फिल्म सिटीची सगळी जबाबदारी राजू श्रीवास्तव यांच्याकडे दिली होती.
राजू श्रीवास्तव हे त्यावेळी उत्तरप्रदेश फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष होते. डिसेंबर २०२० मध्ये राजू श्रीवास्तव म्हणाले होते की, उत्तरप्रदेश मध्ये उभी करण्यात येणाऱ्या फिल्मसिटीमुळे मुंबईचे कुठलेही नुकसान होणार नाही. हैद्रराबाद येथील रामोजी फिल्मसिटी पेक्षा चांगली फिल्म सिटी उत्तरप्रदेश मध्ये तयार करण्याचा आमचा हेतू असल्याचे सांगितले होते.
योगी आदित्यनाथ यांचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जातो. योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या कार्यकाळात फिल्म सिटी उभी करण्यात येईल अशी घोषणा सुद्धा करण्यात आली होती. यासाठी गौतम बुद्ध नगर येथील यमुना प्राधिकरणाच्या सेक्टर २१ ही जागा निवडण्यात आली होती.
१ हजार एकर मध्ये फिल्म सिटी उभारण्यात येणार होती.
जानेवारी २०२२ मध्ये ही फिल्म सिटीचे कामकाज सुरु होईल सुद्धा सांगण्यात आले होते. या प्रोजेक्टच्या पहिल्या फेजसाठी १७ हजार कोटी इतका खर्च येणार होता. यातून १५ हजार लोकांना रोजगार मिळणार होता. ऑगस्ट २०२१ मध्ये सीबीआरई साउथ एशिया या कंपनीकडे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट राज्य सरकारकडे दिला होता.
या कंपनीने जगभरातील फिल्म सिटींना भेट दिली होती. तसेच मोठ्या निर्मात्यांना फिल्म सिटीत काय हवे याची विचारणा सुद्धा केली होती. यानंतर सगळ्या नंतर सीबीआरई कंपनीने पुढच्या तीन आठवड्यात ग्लोबल टेंडर काढण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. यामुळे भारतातील आणि जगभरातील कंपन्यांना टेंडर भरता येणार होते. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत फिल्म सिटीसाठी कंपनी फायनल होऊन आणि कामाला सुरुवात होणार होती.
ही फिल्म सिटी ३ फेज मध्ये बांधण्यात येणार होती. यासाठी ९० टक्के जागा ताब्यात घेण्यात आली होती. त्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये ग्लोबर टेंडर काढण्यात आले होते. हे टेंडर ३० जून २०२२ पर्यंत भरता येणार होते.
या संदर्भात एप्रिल २०२२ मध्ये राजू श्रीवास्तव यांना विचारण्यात आलं होतं. ‘उत्तरप्रदेशमध्ये तयार होणाऱ्या फिल्म सिटीचे काम कुठं पर्यंत आले आहे ?’ त्यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले होते की, फिल्म सिटीसाठी जोरात काम सुरु आहे. उत्तरप्रदेश सरकारने बेसिक गोष्ट पूर्ण केल्या आहेत. फिल्म सिटी जवळ विमानतळ उभारणीचं काम सुद्धा सुरु आहे. मुंबईच्या फिल्म सिटी पेक्षा ही सिटी मोठी असणार आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करून काम करण्यात येत असल्याची माहिती राजू श्रीवास्तव यांनी दिली होती.
४ जुलै २०२२ रोजी फिल्म सिटीचे टेंडर उघडण्यात आले.
यात फक्त एका कंपनीने टेंडर भरलं होत. त्या कंपनीचे नाव होते अंकित कॅन्स्ट्रक्शन. जरी अंकित कॅन्स्ट्रक्शन कंपनीने टेंडर भरलं तरीही त्यांनी टेंडर फी आणि प्रोसेसिंग फी जमा केली नव्हती. यामुळे पहिल्या टेंडरची प्रक्रिया बंद करण्यात आली.
यामुळे कन्सल्टंट कंपनीवर ताशोरे ओढण्यात आले होते. यासाठी कंपनीला ७० लाख रुपये सुद्धा देण्यात आले होते. मात्र कंपनीने काम चांगल्या प्रकारे केले नसल्याने आता दुसरी कंपनी नेमण्यात येईल असेही सांगण्यात आले होते. या सगळ्या प्रोजेक्टवर राज्य सरकार लक्ष ठेऊन होते. यामुळे पुन्हा एकदा निविदा काढण्यात येईल अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती.
यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २३ जुलै २०२२ ला एक उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन परत एकदा फिल्म सिटीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी टेंडर मधील काही अटी शर्थी कमी करण्याच्या सूचना दिल्या. फिल्म सिटीचे काम करणाऱ्या कंपनीला वेळ वाढवून देण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आले.
मोठा गाजा वाजा करत मुंबईतील फिल्म सिटी पेक्षा मोठी फिल्म सिटी उभी करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र दोन वर्षांनंतरही साधी टेंडर प्रक्रिया ही सरकार राबवू शकली नाही. बुधवारी उत्तरप्रदेश फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांचे निधन झाल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हे ही वाच भिडू
- पोटापाण्यासाठी रिक्षा चालवणाऱ्या राजू श्रीवास्तवनं आपल्याला कायम हसवत ठेवलं…
- त्या घटनेतून योगींना कळालं, बुलडोजर पॉलिटिक्स लोकप्रियता मिळवून देवू शकतं..!!!
- विदर्भात फिल्मसिटी बनविण्याची चर्चा सुरू झालीय. संजुबाबा पुढं आलाय.