तियानमेन चौकात चीन सैन्याचा रणगाडा अडवणाऱ्या त्या तरुणाचं पुढे काय झालं..?

एक पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती तियानमेन चौकाजवळ रणगाड्या समोर उभा राहून त्यांचा रस्ता अडवतो. गेली ३२-३३ वर्ष हा फोटो क्रांतीची स्वप्न पाहणाऱ्यासाठी आस्थेचा विषय बनला आहे… 

युद्धभूमी सारखी परिस्थितीत रणगाडा अडविणारा नेमका कोण होते ? पुढे त्याचे काय झाले. आज तियानमेन चौकातील नरसंहाराला ३३ वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, जग आजही या घटनेला विसरले नाही.

४ जून १९८९ ला तियानमेन चौकात नेमकं काय झालं होत ?

तियानमेन चौक हा चीनची राजधान बीजिंग मधील साडे पाच हजार एकर मध्ये असलेले महत्वाचे मैदान आहे. ऐतिहासिक घटनेचा साक्षिदार सुद्धा आहे.  चीनचे प्रमुख मायो यांच्या निधनानंतर डेंग यांनी देशाची सूत्रे हातात घेतली होती. तर एकीकडे चीन मध्ये १९६२ पासून आर्थिक सुधारणांचे वारे वाहू लागले होते. हे करतांना असतांना राजकीय लोकशाही आणावी यासाठी एक गट मागणी करत होता. त्यात बंडखोर बुद्धिवंत आणि कम्युनिस्ट पक्षातील हू याओबांग यांच्यासारखे नेते करत होते.

दुसरीकडे चीन सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे जनतेला दिलासा मिळू लागला होता. पण लोकशाहीवाद्यांनी लोकशाही व्यवस्थे स्थापन करण्याची मागणी करायला सुरुवात केली. त्यातून १९८६ चीन मध्ये एक आंदोलन उभे राहिले. मात्र ते जास्त काळ चालले नाही.

या आंदोलनाला कारणीभूत असल्याच्या कारणावरून कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी हू याओबांग यांना पदावरून काढण्यात आले. १९८९ मध्ये त्यांचे निधन झाले आणि पुन्हा एकदा लोकशाहीवादी आंदोलकांनी हू याओबांग यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने परत आंदोलन सुरु केलं. या आंदोलनात एक गोष्ट घडली.

लोकशाहीवादी नेत्यांबरोबर विद्यार्थ्यांच्या सहभाग वाढला होता

तियानमेन चौकातील आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत होते. डेंग यांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी रणगाडे बीजिंगच्या रस्त्यावर आणले.

तर त्यापूर्वीच ३० मे रोजी तियानमेन चौकात स्वातंत्र्य देवीची स्थापना केली होती. एका रात्रीत या मूर्तीची चर्चा सगळ्या चीन मध्ये झाली. यानंतर संपूर्ण देशातून त्याला विरोध होऊ लागला होता. २ जून रोजी कम्युनिस्ट पक्षाने देशभरात मार्शल लॉ लागू केला. ३ जूनच्या रात्री पासून तियानमेन चौकात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांना हुसकावून लावण्यात येत होते. 

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ जून १९८९ ला डेंग जियपिंग आणि कम्युनिस्ट पक्षाच्या इतर नेत्यांनी कुठल्याही परिस्थिती तियानमेन चौका खाली करण्याचे आदेश लष्कराला दिले. 

तर दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांनी चौक सोडण्यास नकार दिला. जेव्हा विद्यार्थी मागे हटत नव्हते त्यांच्यावर अंधाधुंद गोळ्या मारण्यात आल्या. तसेच यावेळी चीनचे लष्कर आंदोलनस्थळी रणगाडे सुद्धा घेऊन पोहचले होते. आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थांना गोळ्या झाडून मारून टाकण्यात आले होते. नेमका आकडा आज सुद्धा कोणाला माहित नाही.  

या दरम्यान एका फोटोग्राफरने फोटो काढला.

Screenshot 2022 06 04 at 9.43.08 PM

जो की, तियानमेन चौकात जाणाऱ्या रणगाडयांना एक जण अडवत आहे. त्याच्या मागे एकही जण नव्हता. तरीही त्याने हिंमत करून चिनी लष्कराचे रणगाडे अडविले होते. त्यानंतर तो तरुण  रणगाड्यावर चढला आत असणाऱ्या सैनिकांशी तो काही तरी बोलला. आणि काही वेळातच खाली उतरला. इतक्यात दोन जणांनी त्याला ओढून तिथून बाहेर काढले. त्याला सगळेजण टॅंक मॅन म्हणून बोलले जाऊ लागले. 

हा फोटो छापून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. जगभरातील आंदोलनात हा फोटो दाखवून तुम्ही जरी एकटे असला तर काय करू शकता याचं उदाहरण म्हणून दाखविण्यात येतो. 

मात्र त्यानंतर रणगाडा अडवणार नेमका कोण होता, पुढे त्याचे काय झाले ? असे प्रश्न उपस्थित झाले होते आणि आजही करण्यात येतात.  

चीनच्या कम्युनिस्ट सरकारने तियानमेन चौकात विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकले होते. यात १० हजार पेक्षा जास्त जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर त्यातील काही आंदोलनकर्त्यांना त्याब्यात घेऊन जेल मध्ये पाठविण्यात आले. यातील काही आंदोलन कर्त्यांना फाशीची शिक्षा तर काही जणांना मरेपर्यंत जेल मध्ये डांबून ठेवले होते.   

तियानमेन चौकात रणगाड्यावर चढण्याची हिंमत दाखविणाऱ्या ‘टॅंक मॅन’ला जेल मध्ये टाकले की फाशी दिली हे कोणीही सांगू शकले नाही. 

एका अहवालानुसार, हॉंगकॉंग येथील एका प्राध्यापकांनी दावा केला आहे की, रणगाड्या अडवणारा तरुण हा त्यांचा मित्र असून चांगशा येथील पुरातत्वशास्त्रज्ञ आहे. ते दोघेही आंदोलनात सहभागी होण्यासाठी बीजिंगला आले होते. प्राध्यापकाच्या म्हणण्यानुसार तो टॅंक मॅन चीन मधून तैवानला पळून गेला आणि तिथे नॅशनल पॅलेस मध्ये काम केले. 

मात्र तैवान नॅशनल पॅलेस कडून ही गोष्ट नाकारण्यात आली.

या घटनेचा साक्षीदार असणाऱ्या कॅनेडियन पत्रकार जॅन वांग याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जर तो तरुण चीन सोडून इतर देशात गेला असता त्याने घडलेली घटना सगळ्या जगाला सांगितली असती. जरी त्याला सरकारे पकडले  असते तर सर्वांसमोर आणले असते. वांगच्या मतानुसार तो तरुण ओळख लपवून अजूनही चीन मध्ये आहे. 

चीन मधील मानवी हक्क आणि लोकशाही चळवळीच्या माहिती केंद्राने १९९८ मध्ये या संदर्भात कम्युनिस्ट पक्षाकडून अधिकृत पेपर मिळविले होते. त्यात अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना ‘टॅंक मॅन’ बद्दल काहीच माहित नाही. 

१९९० मध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेकेरेटरी असणाऱ्या जियांग झेमीन यांनी अमेरिकन पत्रकार बार्बरा वाल्टरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, रणगाडा अडविणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली होती  याबाबत सरकारकडे कुठलीही माहिती नाही.  

रणगाडा अडवून ताकतवान राजसत्तेला घाबरणार नाही असा संदेश देणाऱ्या तरुणांचं पुढे काय झालं हे कोणीच सांगू शकलं नाही.  

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.