द गार्डियन,वॉशिंग्टन पोस्ट,अल-जझिरा रशिया-युक्रेन युद्धावर आज काय म्हणतायेत?

रशिया युक्रेन युद्ध सुरु होऊन दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या आक्रमणाने मानव आणि संपत्ती अशी दोन्ही हानी होत आहे. त्यात प्रमुख युरोपीय देशांनी आणि अमेरिकेने युक्रेनला लष्करी मदत  दिली नसल्याने बलाढ्य रशियाचा सामना युक्रेन एकटाच करत आहे. त्यामुळे यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर काय छापून आले आहे त्याचा आढावा घेऊ.

वॉशिंग्टन पोस्ट 

WhatsApp Image 2022 02 26 at 12.18.02 PM

रशियाचं युक्रेनवर आक्रमण याच मथळ्याखाली आज वॉशिंग्टन पोस्टने बातम्या दिल्या आहेत. पहिल्या पानावर छापलेल्या युक्रेन,रशिया आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत.

 “आम्ही आमच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी एकटे पडलो आहोत, आमच्या सोबत लढायला कोण तयार आहे? तर मला कोणीही दिसत नाही.”

अशी प्रतिक्रिया युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे.

“जो कोणी आम्हाला अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल…… त्याला हे माहित असले पाहिजे की रशियाचा प्रतिसाद त्वरित असेल आणि तुम्हाला अशा परिणामांना सामोरे जावे लागेल की जे तुम्ही तुमच्या इतिहासात कधीही सोसले नसतील”

असा धमकीवजा इशारा पुतीन यांनी दिला आहे.

“पुतिन आक्रमक आहेत, पुतिन यांनी हे युद्ध निवडले आणि आता त्याचे परिणाम ते आणि त्यांचा देश भोगतील”

असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  बिडेन यांनी दिला आहे.

त्याचबरोबर पुतिनच्या  रिस्क घेण्याचा क्षमतेने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे असंही वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. 

रशियावरील आर्थिक निर्बंध अजून कडक होण्याची शक्यता असतानाही पुतीन याने युक्रेनवर आक्रमण केले आहे. त्याचबरोबर रशियन सैन्याने युक्रेनच्या प्रमुख शहरांवर केलेले बॉम्बिंग  आणि त्यामुळे जिवाच्या आकांताने होणारे नागरिकांचे पलायन यावरही वॉशिंग्टन पोस्टने डिटेलमध्ये लिहले आहे.

अगदी बाराक ओबामांच्या सरकारपासून युक्रेन हाताळण्याचा अनुभव असलेल्या बिडेन यांना अनुभव आहे.मात्र त्यांच्या या त्या अनुभवाचा कितपत फायदा होणार कारण आता जग पूर्णपणे बदलले आहे अशी इंटरेस्टिंग बातमी वॉशिंग्टन पोस्टवर अगदी फ्रंट पेज वरच आहे.

अल-जझीरा 

WhatsApp Image 2022 02 26 at 12.23.58 PM

काल पर्यंत रशिया-युक्रेन संघर्ष असं म्हणणाऱ्या अल-जझीराने आज रशियाचे युक्रेनवरील आक्रमण या मथळ्याखाली आज बातम्या दिल्या आहेत. मध्यपूर्व आशिया म्हणजेच भारतासाठी पश्चिम आशियायी देश असलेल्या सौदी, यूएई,इराण या देशांनी अजूनपर्यंत या युद्धावर कोणताच स्टॅन्ड  घेतलेला नाहीये असं दिसतंय. कारण पश्चिम आशियातील  प्रमुख न्यूज एजन्सी असेलल्या अल-जझीराने यावर वृता दिलेलं नाहीये. रक्दानापासून ते सैनिकांसाठी निधी उभारण्यापर्यंत युक्रेनियन नागरिक कसे एकजुटता दाखवताहेत याची इंटरेस्टिंग बातमी अल-जझीराने दिली आहे.

द गार्डियन 

WhatsApp Image 2022 02 26 at 12.26.21 PM 1

किव्ह ऑन द ब्रिन्क- 

म्हणजेच  किव्ह अगदी काठावर ही आजची ब्रिटनच्या द गार्डीयनची हेडलाईन आहे. रशियाने युक्रेनच्या कॅपिटलला वेढा दिला असल्याने युक्रेनची कॅपिटल कधीही ढासळू शकते असं गार्डियन नं म्हटलं आहे.  राजधानी वाचवण्यासाठी युक्रेन पुरेपूर प्रयत्न करा आहेत आणि सरकारने सामान्य नागरिकांनाही हत्यारबंद होण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. 

युक्रेनियन नागरिकांना मोलोटोव्ह कॉकटेल,जे पेट्रोल बॉम्ब सारखे असतात त्याचा साठा करून ठेवण्यास सांगितले आहे.

त्याचबरोबर जे श्रीमंत रशियन आहे ते युद्धामुळे होणाऱ्या हानीमुळे युद्धाच्या विरोधात आंदोलन करू शकतात अशी ही एक बातमी गार्डियननं छापली आहे.

ग्लोबल पोस्ट 

WhatsApp Image 2022 02 26 at 12.29.02 PM

चीनच्या या न्यूज एजन्सीने पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची फोनवर चर्चा झाली असून वादावर  शांतेतून मार्ग काढण्यावर दोन्ही देशांचं एकमत असल्याचे म्हटले आहे. युक्रेनशी वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवण्यासाठी चीनचा रशियाला पाठिंबा असल्याचे शी झीनपिंग  म्हणाले असल्याची ग्लोबल पोस्टने म्हटले आहे.

 युक्रेन वादामुळे अमेरिकेचा स्वार्थीपणा आणि हिपोक्रसी बाहेर आल्याचं एडिटोरिअलच ग्लोबल पोस्टमध्ये आले आहे. 

तसेच युक्रेन क्रायसिसमध्ये चीन तटस्थ आहे मात्र अमेरिका चीनला मुद्दामून या वादात ओढत असल्याचे अजून एक एडिटोरिअल ग्लोबल पोस्टने छापले आहे.

हे ही वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.