द गार्डियन,वॉशिंग्टन पोस्ट,अल-जझिरा रशिया-युक्रेन युद्धावर आज काय म्हणतायेत?
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता निर्णायक टप्पयावर येऊन ठेपल्याचं जाणकार सांगतायत. रोजच्या रोज कासवगतीने का होईना पुढे सरकणारं रशियन सैन्य युक्रेनियन नागरिकांच्या मनोधैर्यावरही परिणाम करत आहे. युक्रेन सोडून जाणाऱ्या नागरिकांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. या परिस्थितीत युद्ध नेमकं कोणत्या वळणार येऊन ठेपलं आहे याचा एक आढावा घेऊ.
द वॉशिंग्टन पोस्ट
वॉशिग्टन पोस्ट मध्ये आज युक्रेनबद्दलच्या बऱ्याच बातम्या बिडेन यांनी सभागृहात दिलेल्या भाषणावर आधारित आहेत. युक्रेनच्या विरोधात अमेरीकन लोकांची जी युनिटी आहे ती त्यांनी देशांतर्गतही दाखवावी असं आवाहन बिडेन यांनी केलं मात्र ते विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लीकन पक्षाने धुडकावून लावली आहे. त्यामुळं युद्धाचा फायदा देशांतर्गत राजकारणातही घेण्याचे प्रयत्न अमेरिकेत पण चालू आहेत.
बाकी बिडेन यांनी रशियाला युद्धाची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी पुन्हा धमकी दिली आहे.
१४ मुलांसह ३५० हून अधिक नागरिक ठार झाले आहेत, युक्रेनियन अधिकार्यांनी रविवारी सांगितले, जरी U.N.ने म्हटले आहे की वास्तविक संख्या “खूप जास्त” आहे. तर निर्वासितांची संख्या चार लाखांच्या जवळ आहे. असं U.N. निर्वासित एजन्सीने म्हटलं आहे.
सुरवातीला दोनच दिवसात युक्रेन कोसळेल असं म्हणणारी वेस्टर्न मीडिया युक्रेनच्या प्रतिकारने आश्चर्यचकित झाली आहे.
अल जझीरा
अल जझिराने दिलेले प्रमुख अपडेट्स
- रशियन लष्करी काफिला कीवजवळ अगदी मैलांवर येऊन थांबलेला दिसतो, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने म्हटले आहे.
- युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी EU ला कीवचे सदस्यत्व मंजूर करा आणि “तुम्ही आमच्यासोबत असल्याचे सिद्ध करा” असे आवाहनही केले आहे.
- तसेच रशियावरील आर्थिक निर्बंदांचे संकट अजूनच गडद होत चालले आहे. एक्समोबी सारख्या ऑइल कंपनीय असू दे कि विमान बनवणारी बोईंग ते व्हिसा, मास्टर कार्ड यांनी रशियाला सेवा पुरवण्यास नकार दिला आहे.
- देश सोडून जाणाऱ्या युक्रेनियन नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया आणि मुले आहेत. कारण युद्धात लढण्यासाठी पुरुषांना युक्रेन सरकारने देशातच राहण्यास सांगितले आहे.
ग्लोबल टाइम्स
चीनही भारतसारखंच त्यांच्या युक्रेन मधल्या नागरिकांना बाहेर काढण्यात गुंतला आहे. त्याला ग्लोबल टाईम्सने चीनच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनपैकी एक असं नाव दिलं आहे. तसेच अमेरिकेला एक युद्ध हाताळता येत नाही ते तैवानचं दुसरं युद्ध कसं हाताळणार असं ग्लोबल टाइम्सने छापलं आहे. बाकीचे आर्थिक निर्बंधांमुळे रशिया अर्थव्यवस्था कोसळेल असं म्हणत असताना ग्लोबल टाइम्स मात्र तग धरेल असं म्हणत आहे.
कीव्ह मधून निघणारी शेवटची ट्रेन पकडण्यासाठी नागरिकांची धावपळ गार्डीयनच्या हेडलाईनवरून समजून घेण्याची गोष्ट म्हणजे कधीहि कीव्ह रशियाचा हातात पडू शकतेय.
गार्डियनने सुरवातीपासूनच युद्धामुळे होणार सामान्य नागरिकांना त्रास यावरच लक्ष केंद्रित केले आहे. रशिया कसं मानवी अधिकाराचं उल्लंघन करत आहे हे गार्डीयनच्या प्रत्येक बातमीतून दिसत आहे. मग ते युक्रेनच्या कॅन्सर हॉस्पिटलमधील लहान मुलांची स्तिथी असू की युद्धात मारले जाणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण.
म्हणजे थोडक्यात प्रत्येक न्यूज एजेंसी पर्यायाने देश या युद्धला वेगळ्या ऍंगलने पाहत आहे.