अशी एक ‘स्ट्रॅटेजी’ ज्यामुळे सर्वात श्रीमंत इलॉन मस्कला ट्विटर खरेदी करता येत नाहीए..

इलॉन मस्क हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. त्याच्याकडे इतका पैसा आहे की, तो वाट्टेल ते विकत घेऊ शकतो पण ट्विटर त्याला अपवाद आहे.

मस्क ला ट्विटर आपल्या खिश्यात पाहिजेल पण ते शक्य होत नाहीये.  मग त्याने ट्विटरला ४३ बिलियन डॉलरची ऑफर दिली.  

पण ट्विटरचा सेल्फ रिस्पेक्ट जागा झाला.  ट्विटरने ती ऑफर अक्षरशः धुडकावून लावली. मग इलॉन मस्कने ते इगो वर घेतलं. तो हात धुवून ट्विटरच्या मागे लागलाय..मस्क ट्विटरला ओव्हरटेक करू नये म्हणून ट्विटर कंपनीने एक गेम खेळाला तो म्हणजे…

Poison Pill Strategy” 

याचं मराठीत सरळ सरळ असच भाषांतर येतं कि ‘विष गोळी धोरण’….सोडा.. इंग्रजी-मराठी भाषांतर कायमच गंडत असतंय. 

मुद्दयांचं बोलू…

आता प्रश्न असा पडतो की, ट्विटरमध्ये असं काय आहे कि, जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती जो कोणत्याही परिस्थितीत ट्विटरला विकत घ्यायच्या मागे लागलाय. 

हे जाणून घेणं गरजेचं झालं कारण, हे प्रकरण वाटतंय तितकं सोपं- सरळ नाहीये. ट्विटर विकत घ्यायला निघालेल्या इलॉनच्या डोक्यात मोठाच कायतर गेम दिसतोय. 

आता ट्विटरचे युजर्स भलेही फेसबुक, युट्युब, व्हाट्सअँप, इंस्टाग्रामच्या तुलनेने खूप कमी आहेत. पण तरी ट्विटरचे युजर्स जे आहेत ते प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज मध्ये काउन्ट केले जातात. म्हणजेच ज्यांना सोशली ऍक्टिव्ह राहायला आवडतं, स्वतःची मतं सांगायला आवडतं. थोडक्यात ट्विटर वापरणारी मंडळी हुशार समजली जातात त्यामुळे अर्थातच ट्विटरला मोठा मान आहे.   

हीच ट्विटरची ताकद इलॉन मस्क ला समजली. पण इलॉन मस्क यांची श्रीमंती सोडली तर त्यांची सोशल मीडियावरची ताकद काय कमी नाही. इलॉन स्वतः ट्विटरचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.  त्यांना ट्विटरवर ८.१ कोटी फॉलोअर्स आहेत. 

त्यांच्या एका ट्विटमुळे क्रिप्टोकरन्सीच्या किंमती खाली वर होतात. Dogecoin आणि Shiba Inu सारख्या Mime cryptocurrencies ही याची उदाहरणे आहेत. 

दुसरं म्हणजे ते स्वतः ट्विटरच्या कंपनीत शेअरहोल्डर आहेत तरी देखील ट्विटरचे सर्वात मोठे टीकाकारही आहेत.

आता इलॉन मस्क आणि ट्विटरच्या प्रकरणाचं बघायचं तर, 

आता इलॉन ट्विटर कंपनीतला सर्वात समभाग धारक आहे, म्हणजेच त्याच्याकडे ट्विटर’मध्ये सुमारे ९.२ टक्के इतके शेअर्स आहेत. सर्वात मोठा शेअर होल्डर असल्याने त्याने ट्विटर वर मालकी हक्क दाखवायला सुरुवात केली. आता इलॉन मस्क ट्विटरला ४३ बिलियन डॉलरची किंमत लावतोय. 

मग ट्विटर बोर्ड मेंबर्सची एक बैठक बसली. या बोर्ड मेंबर्सने इलॉन यांनाच या डील मध्ये रस वाटू नये अशा प्रकारच्या काहीतरी स्ट्रॅटेजीज् वापरायच्या ठरवल्या.

थोडक्यात Make me a offer, that i can not refuse, म्हणजेच मला एक अशी ऑफर द्या, जी मी नाकारू शकत नाही, असंच काहीसं इलॉनचं म्हणणंय. त्याने ट्विट करत “Best and Final” असं स्पष्ट केलेलं. थोडक्यात त्याचं असं म्हणायचंय की, याच्यापेक्षा मी जास्त पैसे नाही देऊ शकत.

आणि म्हणूच बोर्ड मेंबर हा प्रयत्न करतील कि, ही डीलच अनॲट्रॅक्टिव्ह होईल आणि इलॉन ट्विटर खरेदी करण्याचा नाद सोडून देतील.  म्हणजे काय तर ४३ बिलीन डॉलर खूप कमी आहे तर आम्हाला ८५ बिलियन डॉलर्स हवेत. मग काय ही ‘डील’ परवडणारी म्हणून इलॉन मस्क माघार घेऊ शकतो. हा एक मार्ग आहे.

आता दुसरा मार्ग असा की, जे त्याचे शेअर होल्डर्स आहेत त्या शेअर होल्डर्सकडून शेअर्स विकत घेईल. आणि मग माझ्याकडे कंपनीची अमूक इतकी मालकी आहे.  

मग कंपनी ही पॉयझन पिल स्ट्रॅटेजी वापरते….

थोडक्यात हि स्ट्रॅटेजी म्हणजे सेफ गेम असतोय. ही पॉयझन पिल स्ट्रॅटेजी १९८० च्या दरम्यान डेव्हलप केली गेली. थोडक्यात कंपनीतल्या एखाद्या व्यक्तीने किंव्हा गटाने कंपनीवर ताबा मिळवू नये यासाठी हि स्ट्रॅटेजी वापरली जाते.

या स्ट्रॅटेजीप्रमाणे, कंपनी स्वतःकडे असलेले जे शेअर्स आहेत ते आजपर्यंत कधीही बाहेर नाही काढले गेले नाहीत आहेत ते शेअर्स प्रतिकूल परिस्थितीमध्ये विक्रीला काढते. सवलतीच्या दरात. म्हणजेच स्वस्तात. इलॉन मस्कला सोडून सर्वांना ते खरेदी करण्यास उपलब्ध करणार. 

मग आता इलॉन मस्क आजच्या घडीला काय करू शकतो? 

तर आणखी १० टक्के शेअर्स खरेदी करून माझ्याकडे आणखी अमुक अमुक टक्के मालकी आहे असा दावा ठोकू शकतो. सोप्पय ज्याच्याकडे जास्त शेअर्स त्याच्याकडे कंपनीची मालकी असणार. 

परंतु कंपनी स्वतःकडची मालकी आहे ती अजून डेल्युट करण्याचा प्रयत्न करते. आता १०० टक्केच्या शेअर्स मध्ये कंपनी अजून खूप मोठे शेअर्स मार्केट मध्ये उतरवते. त्यामुळे इलॉनकडे असलेल्या शेअर्सची टक्केवारी अर्थातच कमी होते. 

थोडक्यात ही पॉयझन पिल स्ट्रॅटेजी कंपनीला सुरक्षित करण्याची स्ट्रॅटेजी आहे. आणि तेच ट्विटर सद्या अवलंबण्याचा प्रयत्न करतंय.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.