प्रायव्हेट जॉब की सरकारी नोकरी ? दोन्हीचे फायदे तोटे काय आहेत…

दहावी झाल्यानंतर कॉलेजला ॲडमिशन घेताना नोकरी नेमकी कोणती मिळू शकते याचा विचार करून ब्रँच निवडली जाते. पदवीच्या शेवटच्या वर्षाला येता येता प्रायव्हेट जॉब की गव्हर्नमेंट जॉब असा वेगळाच प्रश्न उभा रहातो.

जे प्रायव्हेट जॉबमध्ये आहेत त्यांना गव्हर्नमेंट जॉबचं प्रचंड आकर्षण असत, त्यांना वाटत गव्हर्नमेंट जॉब म्हणजे निवांतपणा आहे आणि जे गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत त्यांना प्रायव्हेट जॉबचं आकर्षण असतं. म्हणजेच काय तर इकडच्यांना तिकडचं आकर्षण असतं आणि तिकडच्यांना इकडचं.

त्यामुळे प्रायव्हेट जॉब आणि गव्हर्नमेंट जॉब यांच्यामध्ये चांगला पर्याय कोणता ते जाणून घेऊया.

स्थैर्य देणारी सरकारी नोकरी पाहिजे, असं म्हणणारा एक गट आहे. सरकारी नोकरी म्हणजे मान-इज्जत आहे, पैसा आहे असही मानणारा एक गट आहे आणि करिअर मध्ये ग्रोथ पाहिजे असेल तर आणि खूप साऱ्या संधी उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर प्रायव्हेट जॉबमध्ये जायला पाहिजे असंही म्हणणारा एक गट आहे.

आता या दोन्हींची तुलना करताना नोकरी ज्यावेळी आपण शोधत असतो तेव्हा कोणकोणते मुद्दे आपण विचारत घेतले पाहिजेत किंवा कोणत्या मुद्दांचा विचार केला पाहिजे ते जाणून घेऊयात. 

नोकरीची शाश्वती

सरकारी नोकरी म्हणजे टेन्शन नाही, यासोबतच सुरक्षितता आहे, नोकरी जाणार नाही याची गॅरंटी आहे. सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यास बांधील आहे. अगदीच कुणी भ्रष्ट असेल किंवा पदाचा दुरुपयोग करत असेल तरच तसं वैध कारण दाखवून नोकरी संपुष्टात येते म्हणून सरकारी नोकरी भारी आहे असे वाटते.

याच्या अगदी उलट खासगी क्षेत्रामध्ये नोकरीची सुरक्षितता नाहीये. सुरक्षा ही कंपनीची कामगिरी आणि एकूण बाजारपेठ यांच्यावर अवलंबून असते. कंपनीची किंवा संस्थेची आर्थिक परिस्थिती खराब झाली किंवा जर कंपनीची कामगिरी खालावली तर मात्र त्या व्यक्तीचा जॉब धोक्यात येऊ शकतो त्यामुळे त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहू शकत.

नोकरी मिळवण्यासाठी कष्ट

सरकारी नोकरी मिळवायची म्हटल तरी कमीतकमी १ ते २ वर्ष कष्ट करण्याची तयारी आणि १० ते १५ तास अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. एवढ केलं तरी जागा अगदीच मोजक्या असतात आणि त्यासाठी कित्येक अर्ज आलेले असतात. पण एकदा एन्ट्री झाली की मग मात्र निवांतपणा असू शकतो.

तर प्रायव्हेट जॉबमध्ये सुद्धा मार्क्स किती आहे पहातात, इयर डाऊन झालेलं आहे की नाही पहातात, स्किल्स पहातात आणि याचबरोबर रेफरन्स सुद्धा लागतो. मग दहा ठिकाणी अप्लाय केल्यानंतर एखादा ठिकाणाहून इंटरव्ह्यूसाठी कॉल येते आणि मग कुठे जाऊन नोकरी मिळते. जरी नोकरी मिळाली तरी जॉबचा रोल काय असू शकतो किंवा पगार किती असू शकतो याच्यामध्ये सुद्धा कॉम्प्रमाइज करावं लागत, म्हणजे याठिकाणी सुद्धा टेन्शन खूप आहे.

पण असाही एक मोठा वर्ग आहे ज्यांना वाटत जॉब हा डिग्री, रेज्युम, रेफ्रंसने नाही, तर आपल्या स्किल्सवर मिळाला पाहिजे. 

प्रमोशन

गव्हर्नमेंट जॉबमध्ये जर प्रमोशन हवं असेल तर त्यासाठी प्रचंड असा संयम लागतो. अनेक वर्ष गेल्यानंतर कुठे जाऊन प्रमोशन मिळतं आणि प्रत्येकालाच प्रमोशन मिळत असतं. त्यामुळे प्रमोशनचा गव्हर्नमेंट जॉबमध्ये लोड नाहीये. पण प्रमोशनच्या बाबतीत प्रायव्हेट सेक्टर गव्हर्नमेंटपेक्षा फार पुढे आहेत. तुमच्यात टॅलेंट, स्किल्स आणि यासोबतच टीमकडून काम करून घेण्याची हातोटी असेल तर जलद गतीने प्रमोशन होऊ शकते.

नोकरीत मिळणारे लाभ

गव्हर्नमेंट जॉबमध्ये पगार मिळणारच आहे, मेडीकल कवरही असणार आहे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स असणार आहे म्हणजेच खूप सारे भत्ते आहेत आणि त्याचे फायदे सुद्धा आहेत. सरकारी नोकरी सारखे भत्ते खासगी नोकरीत पण मिळतीलच याची काही शाश्वती नाही. मेडीकल कवर किंवा इन्शुरन्स कवर  कंपनी देईल किंवा देणारही नाही. त्या त्या कंपनीवर अवलंबून असतं. हा सगळा विचार करता लाभ कुठे आहे तर गव्हर्नमेंट जॉबमध्ये.

संधी

गव्हर्नमेंट जॉबमध्ये संधी खूप कमी असतात. जागांच्या जाहिराती निघण्यावर सगळा खेळ अवलंबून असतो. जरी तुम्ही हुशार आहात, दोन महिने तुम्ही खूप मेहनत घेतलीये पण जागा निघतीलच याची काही खात्री नाही. आणि जरी जागा निघाल्याच तरी तुमच्या पात्रतेच्या असतीलच अशीही काही खात्री नसते. पण प्रायव्हेट जॉब म्हटल तर वर्षभर नोकरीची संधी उपलब्ध असते.

पगार

गव्हर्नमेंट जॉबमध्ये पोस्टनुसार आणि अनुभवानुसार वेगवेगळा पगार असतो. त्याचबरोबर वेतन आयोगावर सुद्धा अवलंबून असते. त्याउलट प्रायव्हेट जॉबमध्ये जास्त पगार मिळतो, अर्थात नोकरी कोणती आहे यावर ते अवलंबून असते.

काम आणि जीवनाचा ताळमेळ

गव्हर्नमेंट जॉबमध्ये प्रचंड रिक्त पदे असतात, त्याप्रमाणात भरती होत नाही यामुळे कामाचा ताणही प्रचंड असतो. यासोबतच जास्तीच काम केलं तर त्याचे पैसे मिळत नाहीत. भारत बंद असो, पूर आलेला असो तेव्हाही प्रशासन सुरूच असत. त्यामुळे फॅमीली टाईम याठिकाणी मिळत नाही.

याच उलट प्रायव्हेट जॉबमध्ये शर्यत मोठ्या प्रमाणात वाढलीये. कामाची पद्धत सुद्धा बद्दलीये. या सोबत जॉब सेक्युरीटी नसल्याने प्रत्येकाकडून ओव्हर परफॉर्म केलं जातंय. रविवारी सुट्टी नक्कीच असते, पण मधल्या काळात जी असुरक्षितता निर्माण झाली, त्यामुळे शनिवार – रविवार सुद्धा काम करण्याकडे लोकांचा कल वाढलाय आणि इथेही फॅमीली टाईम मिळेल किंवा नाही मिळणार याची शाश्वती नाही.

रिटायरमेंटनंतरचं आयुष्य

जर गव्हर्नमेंट जॉबमधला अधिकारी असेल आणि तो रिटायर झाल्यानंतर प्रायव्हेट जॉबमध्ये जॉईन झाला तर ठीक आहे नाहीतर सगळाच मामला अवघड होऊन जातो. असाच अनुभव प्रायव्हेट वाल्यांचा सुद्धा आहे, रिटायरमेंटनंतर अवघड होऊन जात. म्हणजे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट जॉबमधला व्यक्ती पूर्णवेळ घरी कधीच नसतात. त्या व्यक्तीला आणि कुटुंबाला हा सगळा काळ सुरुवातीच्या दिवसात खूप अवघड जातो.

प्रोफेशनॅलिझम

गव्हर्नमेंट जॉबमध्ये पूर्वीच्या काळात कामाचे तास हे अनियमित होते, कधीही या आणि कधीही जा. पण आता मात्र आल्यावर आणि जाताना सुद्धा पंचिंग करावं लागत. याचे इम्प्लीमेंट होत नाही हा भाग वेगळा आहे पण प्रशासन प्रयत्नात आहे की प्रोफेशनॅलिझम असावं. याउलट प्रायव्हेट जॉबमध्ये एकदम वेगळ आहे, सगळं एकदम प्रोफेशनल आहे. सगळं एकदम काटेकोरपणे पाळावं लागतं. जर नियम पाळले नाही तर जॉब गेलाच समजा.

करिअर ग्रोथ

गव्हर्नमेंट जॉबमध्ये करिअर ग्रोथ आहे किंवा नाही अस ठामपणे सांगता येत नाही. भरपूर वेळा अस होत की कामाच्या ठिकाणी मिळतात तीन वर्ष मग त्यानंतर बदली होते रे होतेच, कुठे बाहेर नाही तर राज्यात किंवा देशातच पण ग्रामीण भागात सुद्धा काम करावं लागू शकत किंवा शहरी भागातही लागू शकत. पण प्रायव्हेट जॉबमध्ये करिअर ग्रोथ निश्चितच नक्कीच आहे आणि विदेशात जाण्याच्या संधीही असू शकतात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.