भाजप या गोष्टींच्या जीवावर बारामती जिंकण्याच्या गोष्टी करतय…
ऑपरेशन लोटस, ऑपरेशन मुंबई आत्ता यात भर पडलीय ती ऑपरेशन बारामतीची. स्वत: भाजप अध्यक्षांनी बारामतीतूनच बारामती जिंकण्याची घोषणा केलीय. केंद्राच्या मंत्री पुढच्या दिड वर्षात बारामतीत तीन तीन दिवसांचा मुक्काम ठोकणार आहेत..
थोडक्यात यंदा बारामती जाणार…
काय पण काय बोलता, बारामती म्हणजे पवारांचा बालेकिल्ला. इथं विरोधकांच डिपॉझिट जप्त होतं. अगदी अमेठी सारखे बालेकिल्ले ढासळत होते तरी बारामती टिकला. मग बारामती भाजप कोणाच्या जीवावर जिंकणार..
बोलुया याच विषयावर..
पहिला समजून घेवू भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत कसा आणला आहे त्याबद्दल.. तर यासाठी केंद्राची पॉलिसी समजून घ्यायला हवी. भाजपच्या केंद्रिय कार्यकारणीने आगामी लोकसभा निवडणूकीत मित्रपक्षांच्या मदतीने 400 प्लस जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी देशभरातल्या 116 लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष्य देण्यात येत आहे. हे 116 मतदारसंघ भाजपच्या ताब्यात नाहीत पण इथे प्रयत्न केला तर भाजप निवडून येवू शकते अस भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाचं मत आहे..
या 116 मतदारसंघासाठी विशेष रणनिती आखण्यात आली आहे. या रणनिती अंतर्गत प्रत्येक केंद्रिय मंत्र्याकडे हे मतदारसंघ देण्यात आले आहे. या केंद्रिय मंत्र्यांनी काय करायचं तर पुढच्या दीड वर्षात किमान पाच ते सहा वेळा ठरवून दिलेल्या मतदारसंघाचा दौरा करायचा.
तीन-तीन दिवसांचे हे दौरे मुक्कामी असतील. स्थानिक कार्यकर्त्यांना पाठबळ देणारे असतील..
याच 116 मतदारसंघातले 16 मतदारसंघ आहेत महाराष्ट्रात. त्यातला एक मतदारसंघ आहे बारामती अन् या मतदारसंघाची जबाबदारी मिळाली आहे ती केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांना..
निर्मला सितारामन् ठरलेल्या योजनेप्रमाणे दिनांक 22,23,24 सप्टेंबर रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या नियोजित दौऱ्याच्या पुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला.
शरद पवार ज्या कनेरीच्या हनुमानाच्या मंदिरातून आपल्या प्रचाराची सुरवात करतात तिथेच नारळ फोडत बावनकुळेंनी पवारांना आव्हान दिलं. अनेक गड उद्धस्थ झालेत अस सांगत त्यांनी निर्मला सितारामन यांच्या दौऱ्यापूर्वीची मशागत केली..
त्यांच्या या दौऱ्यामुळे भाजपचं मिशन बारामती चर्चेत आलं..
नेमकी काय कारण आहे, पाहूया व्हिडीओत..