भाजप या गोष्टींच्या जीवावर बारामती जिंकण्याच्या गोष्टी करतंय…
“२०१९ मध्ये आम्ही अमेठीमधील गांधी कुटुंबाची मक्तेदारी राहुल गांधींच्या पराभवाने संपुष्टात आली. जर आम्ही हे अमेठीत करु शकतो तर हे बारामतीमध्येही आम्ही करु शकतो.” असं विधान मागेच भाजप नेते राम शिंदेंनी केलेलं.
बारामती जिंकायचीच म्हणून भाजपने कंबर कसलीय. त्यामुळेच त्यांची या प्रचारदौऱ्याची टॅगलाईनच ‘अमेठी मिळतो तर बारामती का नाही‘ अशी आहे. बारामती मिळवण्यासाठी भाजपने खास ‘मिशन बारामती’ आखलंय, त्याचनुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामतीच्या ३ दिवसीय दौऱ्यावर आहेत.. या नियोजित दौऱ्याच्या पुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला.
निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यामुळे भाजपचं ‘मिशन बारामती’ चर्चेत आलं..
मिशन बारामती नेमकं काय आहे, पाहूया व्हिडीओत..