म्हणून टिका होते “कॉमनवेल्थ”चा सदस्य असणं ही लाज वाटणारी गोष्ट आहे..

कॉमनवेल्थ आल्यानंतर देशात एक आनंदाची लहर येते. रोज कोणत्या ना कोणत्या खेळात भारताला मेडल मिळतं.  देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या खेळाडूंची प्रतिभा आपल्याला या निम्मिताने कळते. कुस्तीमध्ये भारताच्या डंका जगभरात नेणाऱ्या फोगट सिस्टर्सचं टॅलेंट कॉमनवेल्थ गेमच्या माध्यमातूनच पुढं आलं होतं.

सांगलीतला पानपट्टीवर बसणार संकेत सरगर जागतिक पातळीवर वेटलिफ्टिंगसारख्या खेळात मेडल मिळवू शकतो हे कॉमनवेल्थ गेम्समुळेच आपल्याला पाहायला मिळू शकतंय.

मात्र कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होणं, कॉमनवेल्थचा सदस्य असणं यावरून अनेकदा टीकादेखील केली जाते. ज्या ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्षे राज्य केलं, भारताला लुबाडलं त्या ब्रिटिशांची मक्तेदारी आपण अजूनही कॉमनवेल्थमुळे मान्य करतो असा टीका करणाऱ्यांचा सूर असतोय.

त्यामुळं आधी कॉमनवेल्थ हे काय प्रकरण आहे ? ते एकदा बघू…

कॉमनवेल्थची स्थापना १८९७ साली तत्कालीन ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया  हिने केली. ब्रिटनची एकाधिकारशाही मान्य करायला काही वसाहतींनी विरोध करण्यास सुरवात केली होती. विशेषतः ऑस्ट्रेलिया, कॅनडा या गोरी लोकं जास्त असणाऱ्या वसाहतीतून राणीच्या एकछत्री अंमलला विरोध चालू झाला होता.मग यावर एक तोडगा म्ह्णून राणीनं कॉमनवेल्थची कॉन्सेप्ट आणली.

यानुसार काही वसाहतींना मर्यादित स्वराज्य देण्यात आलं. जरी काही वसाहतींना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची मुभा देण्यात आली असली तरी ब्रिटनची राणी तिच्या इच्छेनुसार काही निर्णयांवर तिच्या इच्छेनुसार व्हेटो वापरू शकते. म्हणजेच थोडक्यात वसाहतींना  डोमिनियन स्टेटस देण्यात आला. 

मात्र १९३१ मध्ये पहिल्या महायुद्धानंतर वसाहतींमधील वाढत्या राष्ट्र्वादापुढे वसाहतींना अजून अधिकार देण्यात आले आणि ऑस्ट्रेलिया, कॅनडा, साऊथ आफ्रिका या वसाहतींना ब्रिटननं बरोबरीचा दर्जा दिला. 

आणि अशाप्रकारे १९३१ ला ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशनची ऑफिशियली स्थापना झाली. 

त्यानुसार ब्रिटनची राणी आता या देशांची फक्त औपचारिक प्रमुख होती. मात्र इथं दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत पहिली म्हणजे औपचारिक प्रमुख जरी असली तरी ब्रिटनची राणी कॉमनवेल्थच्या सदस्य देशांची प्रमुख होती. दुसरी म्हणजे कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, आयरिश फ्री स्टेट आणि न्यूफाउंडलंड या ज्या गोऱ्या बहुसंख्य वसाहती होत्या त्यांनाच हा बरोबरीचा दर्जा देण्यात आला होता.

ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशनच्या स्थापनेबद्दल जेव्हा मिटींग्स, चर्चा घडत होत्या तेव्हा भारतही त्या चर्चाना उपस्तिथ राहत होता. 

मात्र त्याचवेळी भारतीयांची पूर्ण स्वराज्य हि मागणी होती आणि भारताच्या पुढाऱ्यांनी डोमिनियन स्टेटस घेण्यास पहिल्यापासूनच विरोध केला होता. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस या नवीन रक्ताच्या नेते पूर्ण स्वराज्याच्या मागणीपुढं डोमिनियन स्टेटसचं नाव देखील काढून देत नव्हते. 

 परिणाम काहीही झाले तरी ,कोणत्याही परिस्थितीत भारत ब्रिटिश कॉमनवेल्थमध्ये राहणार नाही. हा माझ्यासाठी किंवा आपल्यापैकी काहींनी ठरवण्याचा प्रश्न नाही. कॉमनवेल्थमध्ये राहण्याचा कोणताही प्रयत्न हा प्रस्ताव मांडणाऱ्यांचा नाश करेल आणि भारतात मोठी समस्या निर्माण होऊ शकेल.” 

असा टोकाचा विरोध जवाहरलाल नेहरू यांनी सुरवातीला केला होता.

मात्र माऊंटबेटनच्या पार्टीशनच्या प्लॅननंतर गोष्टी बऱ्याच प्रमाणात बदलला. 

पार्टीशन करताना भारत आणि पाकिस्तान हे दोन डोमिनियन स्टेट्स तयार करण्यात आली. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी, जेव्हा भारत स्वतंत्र झाला जॉर्ज सहावा हाच भारताचा राजा राहिला. १९५० पर्यंत  जेव्हा भारताने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले तोपर्यंत ब्रिटनचा राजा भारताचा राजा होता. 

मात्र १९४९ मध्ये कॉमनवेल्थ जॉईन करण्यासाठी भारताला अजून एक सूट देण्यात आली.  1949 च्या कॉमनवेल्थ पंतप्रधानांच्या परिषदेत या संघटनेनं भारताला प्रजासत्ताक राहूनही कॉमनवेल्थचा सदस्य राहण्याची दिली.

यामुळे भारताच्या निर्णयप्रक्रियेत ब्रिटिशांचा कोणताही हस्तक्षेओ राहणार नव्हता, अगदी नावालाही ब्रिटिश क्राऊन भारताचा प्रमुख होणार नव्हता. त्याचवेळी नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला कॉमनवेल्थ सारखी संघटनाही जॉईन करता येत येणार होती. आणि मग भारताने कॉमनवेल्थ जॉईन करण्याचा निर्णय घेतला.

WhatsApp Image 2022 07 31 at 1.43.39 PM
source -British Government [Public domain], via Wikimedia Commons

नेहरूंचा हा साचा आशिया आणि आफ्रिकेतील इतर स्वतंत्र वसाहती देशांनी देखील अनुसरला. 

आज युनायटेड किंगडमची राणी केवळ कॉमनवेल्थमधील 16 देशांच्या राष्ट्रप्रमुख आहेत. तर बाकीचे देश प्रजासत्ताक आहेत म्हणजेच त्यांचे राष्ट्रप्रमुख ब्रिटिश राणी नसते तर देशाने निवडलेले प्रमुख असतात.

त्यामुळे ”ज्या गोष्टीची लाज बाळगायला पाहिजे त्याचा अभिमान कसला बाळगता” अशी जी टीका कॉमनवेल्थवर केली जाते तिला एक पॉइंटनंतर काही जास्त अर्थ उरत नाही. 

आता येऊ कॉमनवेल्थ गेम्सवर.

 कॉमनवेल्थचे सदस्य असलेले देशच या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होतात. जरी कॉमनवेल्थचे 56 सदस्य असले तरी बर्मिंगहॅम 2022 मध्ये एकूण 72 विविध संघ सहभागी होतील. कारण कॉमनवेल्थ मधील इतर देशांवर अवलंबून असलेले प्रदेश त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय ध्वजाखाली स्पर्धा करण्यासाठी संघ पाठवतात. यामध्ये अमेरिका, चीन या दोन महत्वाच्या स्पोर्टींग  सुपरपॉवरचा समावेश नसतो. त्यामुळॆ खरी लढत भारत, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांच्यामध्येच असते. 

तर हे असं आहे कॉमनवेल्थ आणि कॉमनवेल्थ गेम्सची संकल्पना ज्यामध्ये कधीकाळी ब्रिटिशांच्या अंमलाखाली राहिलेले देश सहभागी होतात.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.