म्हणे, कलंगुट आणि बागा बीचवर भुतं असतात.. ती पकडायला आंतरराष्ट्रीय संस्था आलेली..

गो, गोवा, गॉन… गोव्यात जावं, मस्तपैकी बियर मारावी.. बीचवर लक्स च्या हंडरप्यांटवर पडून राव्हं..हांडरप्यांन्टचं भोकं खाली लपवावं.. दोन दिवस कलंगुटला आणि दोन दिवस बागाला फिरावं.. एखाद्या फॉरेनरसोबत फोटो प्लीज करून फोटो काढावा.. बिकनीतल्या पोरगीकडं अधाश्यासारखं पहावं…..

तर नाय सांगाय काय लागलोय तर गोव्यातली भूतं…

तुम्ही गो, गोवा, गॉन पिक्चर बघितला असल. नसला बघितला तर बघुन घ्या भारीय. तर आत्ता येतो मुळ मुद्यावर या पिक्चरमध्ये अचानक लोकांवर घोडे उडलेले तर इथे प्रत्यक्षात चणं टाकून घोडे उडवून घेण्याचा प्रकार केला जातोय…

नेमका काय मॅटर आहे..?

तर जगात जे भुतांना मानतात त्यांच्या मतानुसार दोन प्रकार असतात. एक म्हणजे घोस्ट बस्टर्स आणि दुसरे घोस्ट हंटर्स. त्यानंतर  पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेटर्स, पॅरासायकॉलॉजिस्ट, पॅरानॉर्मल रिसर्चर्स, आसुरीशास्त्रज्ञ, आध्यात्मिक उपचार करणारे आणि सल्लागार यांचा गट असतो.

यातील घोस्ट हंटर्स म्हणजे भुतांचे शिकारी बनण्याचे शौकीनांसाठी पॅरासायकॉलॉजी अँड इन्व्हेस्टिगेशन रिसर्च सोसायटी (PAIRS)  आहे. त्यांनी तर घोस्ट टूर आयोजित करणं देखील सुरु केलंय. यंदाच्या मार्चमध्ये ही टूर गोव्यामध्ये झाली.. 

काय आहे ही संघटना?

ही संघटना पॅरानॉर्मल म्हणजेच अलौकिक आणि मानसिक घटनांच्या तपासणीशी संबंधित आहे. २०१६ मध्ये ती लाँच करण्यात आली. या समूहाचं एकाच उद्देश्य आहे ते म्हणजे, लोकांना पॅरानॉर्मल गोष्टींबद्दल असलेल्या भीतीपासून मुक्त करणं आणि सर्व भुत वाईट नसतात हे सिद्ध करणं.

आहे ना जरा विचित्रच! पण असं काम ते खरंच करतात.

आता हे भुतांचा टूर नक्की काय असतं?

हा टूर अगदी हटके असतो. ज्या लोकांना अलौकिक गोष्टींबद्दल थोडंफार देखील कुतूहल असतं त्यांच्यासाठी हा टूर आखला गेलाय. यात काय होतं, तर प्रत्यक्ष आणि थेअरी बघून त्याबद्दल शिकू शकतात. यासाठी कार्यशाळा, सत्रे, सर्टिफिकेट कोर्सेस आयोजित केले जातात. शिवाय जर तुम्हाला आवडलं तर प्रोफेशनली देखील तुम्ही त्यांच्याशी जोडून राहत इन्वेस्टीगेशन करू शकतात. 

या वर्कशॉपमध्ये पॅरानॉर्मल गोष्टींचा व्यावसायिकपणे तपास कसा करायचा हे शिकवताना तुम्हाला मानवांना हाताळणे, ज्या रीडिंग्स त्या ठिकाणी येतात त्यांचं विश्लेषण करणे, माणसाने बनवलेल्या कोणत्याही गोष्टीद्वारे डिव्हाइसमध्ये फेरफार होत नाही ना, याची खात्री करणे, हंटिंगचे प्रकार, मानसिक विकास तसाच आध्यात्मिक शुद्धीकरण असं बराच शिकवलं जातं. याशिवाय, सायकिक रीडिंग, एंजेल कार्ड रीडिंग, ऑरा रीडिंग आणि क्लीनिंग अशा गोष्टी शिकण्याची देखील संधी असते.

सध्या अशा आगळ्यावेगळ्या गोष्टी करण्यात बऱ्याच जणांना भरपूर रस यायला लागला आहे. म्हणून तर घोस्ट टूर ऑर्गनाईझ करणाऱ्या अनेक संघटना सध्या कार्यरत आहेत. PAIRS ही काही एकटीच संघटना नाहीये. मग असं काय वेगळं ही संघटना देते की, तिथे जाणं जास्त फायद्याचं ठरेल?

त्यांची खासियत म्हणजे इथे फक्त झपाटलेल्या ठिकाणांना भेट देण्याऐवजी तुम्ही प्रत्यक्षात घोस्ट हंटिंग करू शकता.

यंदाचंच बघा ना, ‘गोव्यातील सर्वात झपाटलेले ठिकाण’ त्यांनी निवडले. तिथे भेटी झाल्या शिवाय दोन घोस्ट हंटिंग मोहिमा देखील केल्या गेल्या. ही गुप्त ठिकाणं शोधण्यासाठी त्यांनी उत्तर गोव्याची निवड केली. कारण कलंगुट आणि बागा ही दोन बीचेस खूप पर्यटक आणि विक्रेत्यांनी पछाडलेले आहेत, असं म्हटलं जातं. 

निवडलेली ठिकाणे “न्यूट्रल” असेल अशी होती कारण त्यामुळे लोक पॅरानॉर्मल अनुभव घेऊ शकतात परंतु त्यांना भूतं घाबरवतील किंवा दुखावतील अशा प्रकारे घडत नाहीत. इथे न्यूट्रल म्हणजे तुम्ही भुतांचं अस्तित्व आणि आत्म्यांची अपेक्षा करू शकता पण तिथे कोणत्याही प्रकारचा उगाच ड्रामा, बॅकग्राउंड नॉईस नसतो. हेच त्यांचं खरं तर उद्देश्य आहे. 

“जमिनीवर प्रत्यक्षात काय घडते ते लोकांना दाखवून आम्हाला अलौकिक गोष्टींबद्दलची भीती दूर करायची आहे. ही काळजीपूर्वक तपासलेली ठिकाणे असतात ज्यांना टीमने यापूर्वी त्यांना भेट दिलेली असते आणि संस्थांशी संवाद साधलेला असतो. शिवाय या हंटिंगच्या मागे कोणताही मानवनिर्मित प्रकार नसतो, याचीही खात्री केली जाते”, असं कंपनीचे संस्थापक सांगतात.

हे सगळं ठीक आहे, पण जर घोस्ट हंटिंग करताना एखाद्या भुताने आपल्याला पछाडलं तर?

यावर संस्थेचं म्हणणं आहे की, असा कोणताच प्रकार इथे घडत नाही. उलट तुम्ही आत्म्याशी संवाद साधू शकता. यावेळी जर तुम्ही बॉडी कॅमेरा घातला तर जे काही तिथे घडतंय ते सगळं रेकॉर्ड करून तुम्ही “खरंच अशा गोष्टी अस्तित्वात असतात” असं लोकांना सांगू शकतात.

प्रत्येक ठिकाणी, मानसिकतज्ज्ञ आणि पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेटर यांच्या नेतृत्वाखाली संघ विभागले जातात. पहिले त्याठिकाणी काही अलौकिक ऊर्जा आहे की नाही तपासलं जातं. जर तिथे अशी ऊर्जा असलं तर  त्यांच्याशी आधी शांत आणि नम्रपणे गटाची ओळख करून दिली जाते. भुतांच्या जगातही विनयशीलता खूप महत्वाची असते, असं संस्थेचं म्हणणं आहे. 

मग प्रशिक्षण संपलं की सुरु होत प्रॅक्टिकल. गट आत्म्यांशी संवाद स्थापित करण्याचा प्रयत्न करतो आणि मग जे काही होत ते उपकरणांवर रेकॉर्ड केलं जातं. यासाठी अनेक उपकरणं वापरली जातात. जसं की, ट्राय-फील्ड मीटर, घोस्ट मीटर (इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सेन्सर्स), इलेक्ट्रॉनिक व्हॉईस फेनोमेनन किंवा कमी तीव्रतेच्या आवाजांसाठी ईव्हीपी रेकॉर्डर, फुल स्पेक्ट्रम नाईट व्हिजन कॅमेरा, थर्मल सेन्सर्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी सेन्सर्स, डिजिटल मिररलेस कॅमेरा, आयआर मोशन सेन्सर आणि टेम्परेचर गन्स.

रात्रभर हे सर्व झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळ्यांना त्या ठिकाणी नेलं जातं. कारण  “फक्त रात्रीच नव्हे तर कोणत्याही वेळी अलौकिक घटना घडू शकतात” हे लोकांना पटवून देणं गरजेचं असतं. तसंच प्रत्येक सेशनच्या शेवटी, एक ‘आध्यात्मिक शुद्धीकरण’ केलं जाते. हे यासाठी कारण गटातील कोणतही आत्मा अली नाहीये ना? त्यांच्या मागे लागली नाहीये ना? हे तपासण्यासाठी.

आता दोन महत्वाचे प्रश्न… अशा सेशनचा भाग होण्यासाठी तुमचा भुतांवर विश्वास असणं गरजेचं आहे का? आणि याने ही संस्था अंधश्रद्धा तर पसरवत नाहीये ना?

तर यामध्ये सहभागी होण्यासाठी तुमचा इंटरेस्ट फक्त महत्वाचा असतो. तो तपासण्यासाठी संस्था फॉर्म भरून घेते आणि मुलाखती घेते. हे फक्त यासाठी की, तिथे उपस्थित लोकांचे मन मोकळे असावे आणि त्यांनी क्षेत्राचा आदर केला पाहिजे. जेणेकरुन कोणीही सिन क्रिएट करत खूप वाद घालू नये आणि इतर कोणाच्याही भावनांचा अनादर करू नये.

तर अंधश्रेद्धेबाबत संस्थेचं म्हणणं आहे की, हे क्षेत्र अंधश्रद्धा नाही. लोक नेहमीच भुतांच्या किंवा अलौकिक गोष्टीच्या अस्तित्वावर,  शक्तीवर विश्वास ठेवत आले आहेत. परंतु या घटकांबद्दलची आपली मानवी प्रतिक्रिया आणि त्यांच्याबद्दलची आपली वैयक्तिक व्याख्या ही कथा आणि शहरी दंतकथा बनली आहे ज्याने अंधश्रद्धा निर्माण होते.

उदाहरणार्थ, भुते पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसतात किंवा रात्रीच्या वेळी ते जास्त सक्रिय असतात. हे सगळं चित्रपटांनी घालून दिलेलं खूळ आहे.

याच गोष्टी दूर करण्याचा PAIRS चा प्रयत्न आहे.  त्यांच्या तपासणीद्वारे लोकांच्या मनातील भीती आणि चुकीचा विश्वास काढून टाकण्याचे काम करत आहेत. त्यासाठीच ते भारतभर फिरत आहेत. अगदी गजबजलेल्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत. जसं यंदाच्या वर्षीचा गोवा टूर!

बघा भावांनो, सगळं सविस्तर मंडळ तर आहे. संस्था काय? काय करते? कसं करते? हेतू आणि म्हणणं काय? तेव्हा जर तुम्हालाही असं काही हटके पण भन्नाट करायचं असेल, रिस्क घ्यायची असेल तंत्र त्यांच्या नेक्स्ट टूरचा भाग हमखास व्हा…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.