HDFC चं HDFC मध्ये विलनीकरण, नक्की मॅटर काय आहे.?
एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांनी सोमवारी या दोन संस्थांच्या विलीनीकरणाची घोषणा केली आणि भारताच्या फायनांशियल सेक्टर मधल्या मोठ्या सौद्यांपैकी एक सौदा निश्चित केला. बस्स एवढी बातमी आपण वाचली आणि त्याचबरोबर शेअरबाजरात एचडीएफसीच्या शेअर्सची मोठी मुसंडी एवढं आपण वाचलं. पण या दोन घटनांमधला जो मेन भाग होता तो स्कीपच झाला. त्यामुळं तो घटनाक्रम नक्की काय होता? निर्णय नक्की काय झालाय आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत हे बघू.
तर एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड या दोन संस्थांचं विलानीकरण झालं आहे.
त्यातली एचडीएफसी बँक ही भारतातील सगळ्यात मोठी खाजगी बँक आहे. तर एचडीएफसी लिमिटेड ही घरकर्ज देणारी भारतातली सर्वात मोठी वित्तीय संस्था. आणि एचडीएफसी समूहाच्या या दोन प्रमुख संस्था एकत्र आल्या आहेत.
आता जो व्यवहार ठरला आहे त्यानुसार एचडीएफसी लिमिटेड जीची ५.२६ ट्रिलियन रुपयांची मालमत्ता मॅनेज करते आणि ४.४४ ट्रिलियन रुपयांची मार्केट कॅप आहे, ती एचडीएफसी बँकेत विलीन होईल. जी भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे तिची मार्केट कॅप ८.३५ ट्रिलियन रुपयांची आहे.
आता या दोन संस्था एकत्र येण्यामागं ही तीन मेन कारणं सांगण्यात येतात.
पाहिलं म्हणजे एचडीएफसी बँकेच्या प्लॅटफॉर्म अंतर्गतच गृह कर्ज पोर्टफोलिओ तयार करणे
या दोन एवढ्या मोठ्या कंपन्यांच्या विलनीकरणाने आता त्यांना काही प्रमाणात स्वस्तात कर्ज देता येणं शक्य होईल. सध्या एचडीएफसी बँक एचडीएफसी लिमिटे चे गृहकर्ज विकते आणि फी मिळवते. “प्रस्तावित व्यवहार एचडीएफसी बँक तिचा गृह कर्ज पोर्टफोलिओ तयार करण्यास आणि ग्राहक संख्या वाढविण्यास सक्षम करेल,” असं बँकेकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर बँकेला आता स्वतःचा
स्वस्तात भांडवल उपलब्ध होईल
एचडीएफसी बँक, जी भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे, तिचे ६.८ कोटी पेक्षा जास्त ग्राहक आहेत. त्यामुळे त्यांच्या चालू आणि बचत खात्यातून बँकेकडे मोठ्या प्रमाणत निधी जमा होतो. त्यामुळे बँकेला स्पर्धात्मक आपले गृहकर्ज मार्केटमध्ये उतरवणे सोप्पे जाईल.
बॅलेन्स शीटची साइझ पण वाढेल
विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँकेची बॅलेन्स शीट २५.६१ लाख कोटी रुपयांची होईल, जी आता देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या जवळ जाणारी आहे. ४५.३४ लाख कोटी रुपयांसह स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातली सध्या सगळ्यात मोठी बँक आहे. एचडीएफसी बँक तशी आधीच देशातील दुसरी सर्वात मोठी बँक होती.
त्याचबरोबर एकेमेकांचं इन्फ्रास्ट्रक्चर, कुशल मनुष्यबळ ही या कंपन्यांना वापरता येइल. ज्याचा दोघानांही फायदा होईल आणि ऑपरेशनला कॉस्ट पण कमी असेल.
आता आपल्या कामाची गोष्ट या व्यवहाराचे शेअर स्वॅप प्रमाण किती आहे?
एचडीएफसी लिमिटेडच्या शेअरधारकांना, रेकॉर्ड तारखेनुसार, एचडीएफसी लिमिटेडच्या २५ शेअर्ससाठी एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर्स मिळतील.
बाकी एचडीएफसी बँकांची या विलानीकरणामुळे अजूनच ग्रोथ होईल असं सांगण्यात फायनान्स मधली मोठी नावंपण मान्य करत आहेत.
मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जी मणी कंट्रोलला विलीनीकरणनावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की,
”एचडीएफसी बँकेच्या गेल्या तीन वर्षांतील प्रगती पाहिल्यास बँकेने बाजारातील भागभांडवल वाढीसह प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्जीनमध्ये देखील सुधारणा झाली आहे. त्यामुळे या विलणकरणामुळे त्यांची ग्रोथ स्टोरी चालूच राहील असं ते म्हणाले आहेत.”
बाकी या विलणीकरणाच्या चर्चा तशा अनेक वर्षे चालल्या होत्या. मात्र ज्याप्रकारे या निर्णयाबद्दल गोपनीयता पाळण्यात आली होती त्यावरून बँकेची कॉरोपोरेट गव्हर्नन्स किती स्ट्रॉंग आहे हे कळून येतं. एवढा मोठा निर्णय घेताना लाखो बैठका झाल्या असतील मात्र या बैठकांची कोणतीही माहिती बाहेर आली नाही. अखेर डायरेक्ट बँकेनेच या निर्णयाची माहिती दिली.
त्यामुळे एवढे सगळे फॅक्टर बाजूने असताना एचडीएफसी बँक किती पुढे जाते हे बघण्यासारखे असणार आहे.
हे ही वाच भिडू :
- ज्या बँकेने आबासाहेबांना कारकुनाच्या नोकरीसाठी अपात्र ठरवलं, त्याचेच ते डायरेक्टर झाले
- केंद्रीय सचिव म्हणतायत बँकांचे खाजगीकरण केल्यावर नोकऱ्या अजून वाढतील
- जिल्हा बँके एवढ्याच महत्वाच्या असणाऱ्या दुध संघाच्या निवडणुका होतात तरी कशा ?