मूनलायटिंग म्हणजे काय? एका वेळी दोन कंपन्यांमध्ये जॉब करण योग्य आहे का? कायदा काय सांगतो?

गेल्या काही दिवसांपासून मूनलायटिंगसंदर्भात प्रचंड चर्चा होतेय. याच मुद्द्यावरून इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली. कंपनीच्या नियमांनुसार मूनलायटिंगची परवानगी दिलेली नाही. पण या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणारे, यामुळे कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलंही जाऊ शकतं, असा इशारा इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना ई-मेलमार्फत दिला आहे. त्याचप्रमाणे, विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनीही मूनलायटिंगचा विरोध केलाय. 

ज्यावरून वाद निर्माण झालाय ते मूनलायटिंग नेमकं आहे काय ?

सध्या जगभर जी आर्थिक परिस्थिती आहे ती दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात वाईट अशी स्थिती आहे. खूपसे बिझनेस हाऊस आहेत ज्यांनी त्यांचे एक्सपान्शन प्लॅन्स एकतर होल्डवर ठेवलेत नाहीतर कॅन्सल केलेत. आता हे कंपन्यांना शक्य आहे, प्लॅन पुढे ढकलणं, कॅन्सल करणं.

पण आपल्याला किंवा जे नोकरी करणारे आहेत त्यांना हे शक्य होत नाही तसंच अशा आर्थिक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी स्ट्रॅटजी सुद्धा नसते. 

जिथे अर्थव्यवस्था ढासळते तिथे लेऑफ तर कॉमन झालंय. लॉकडाऊन नंतरच्या काळात खूप सारे नवनवीन शब्द परिचयाचे झाले, लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम, लेऑफ आणि तसंच हे  मूनलायटिंग. यातले बाकीचे शब्द तसे आपल्या परिचयाचे आहेत पण मूनलायटिंग हा शब्द आपल्यासाठी तसा नवा आहे. 

या मूनलायटिंगमुळे आयटी कंपन्यांचं टेंशन वाढलय. मूनलायटिंग मागची कारणं काय आहेत आणि याचे फायदे तोटे काय आहेत ते सुद्धा पाहूया. 

एका कंपनीत काम करता करता दुसऱ्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी घेणे आणि त्यासाठी पगार घेणे अर्थातच या कंपनीचं त्या कंपनीला समजू न देता, याला मूनलायटिंग म्हटल जातं.

आता मूनलायटिंगची दोन कारणं आहेत,

पहिलं म्हणजे अमेरिकन लोकांनी त्यांचा ९ ते ५ जॉब व्यतिरिक्त अजून एक जॉब शोधायला सुरवात केली ती कमाईत वाढ करण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे आपल्या इथल्या महत्वाच्या आयटी कंपन्या म्हणजेच इन्फोसिस, टीसीएस, वीप्रो यांनी असं म्हटलं की,

They would delay, postpone or reduce the variable payout to employees for the first quarter of Fiscal year 2023 due to weaker margins. 

आणि मग कर्मचाऱ्यांत विषय सुरू झाला मूनलायटिंगचा. कारण आपले प्लॅन आपण पोस्टपोन नाही करू शकत जसं कंपनी करते.

पण मूनलायटिंग हे एक्स्ट्रा इन्कम पुरतच मर्यादित नाही. त्यामागे अजूनही काही कारणं आहेत.

१. प्लॅन बी:

पहिल्या जॉबबद्दल शंका असेल तर लोकं दुसरा जॉब पर्याय किंवा बॅक अप प्लॅन शोधून ठेवतात. सध्या कंपनीकडे स्टाफ नाही किंवा पैसे नाहीत त्यामुळे ज्यांच्याकडे काम आहे त्यांना टिकवून ठेवण्यासाठी ओव्हर परफॉर्म करावं लागतय ज्याचे कर्मचाऱ्याला वेगळे पैसे मिळत नाहीत. ज्यांचं वय ४५ पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम मोठा आहे.

२. मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम: 

आर्थिक सल्लागार सांगतात मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम असायला हवं एकावर अवलंबून राहता कामा नये म्हणून सुद्धा लोकं मूनलायटिंग चा पर्याय निवडतात. 

३. Paying Off Debt: 

लॉकडाऊनमध्ये खूप जणांचे जॉब गेले. ज्यांचे टिकले त्यात पण पगार झाले नाही अशी उदाहरणं आहेत. पण उद्योगधंदे बंद झाल्याने घडी विस्कटली ती विस्कटली. मग ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांच्यासमोर कर्ज फेडण्यासाठी अजून एक जॉब करण्याशिवाय पर्याय नाहीच. छोटं कर्ज असेल तर लॅपटॉपचं. ते फिटलं तरी बस असं म्हणून अजून एक जॉब केला जातोय.

४. करियर मधले बदल: 

करियरमध्ये बदल करण्यासाठी म्हणून जिथे करियर करायचं आहे त्या संबंधित एक्स्ट्रा जॉब करतात. हा एक्स्ट्रा जॉब freelancing सुद्धा असू शकतो. एक्स्ट्रा जॉब चांगला अनुभव पण देतो असं काही जण म्हणतात.

५. पॅशन: 

संध्याकाळी डीजे म्हणून काम करणं हे सुद्धा मूनलायटिंग मध्येच मोडतं. पण इथे पॅशन आहे म्हणून हे केलं जातं. आर्थिकरित्या खूप काही हातात येत नाही तरी पण करायचं असतं.

आता आपल्या लक्षात असं येतं की हे सगळं तर आपण नेहमी करतोच त्यात इतका इश्यू करण्यासारखं काय आहे? पण चर्चा सुरू झाली ती आयटी सेक्टरमुळे. आणि आयटीमध्ये सध्या हा हॉट टॉपिक आहे. एक कंपनी प्रोजेक्ट सुरू असताना दुसऱ्या कंपनीचा प्रोजेक्ट घेऊ नये असं म्हणणारा एक गट आहे आणि घेतला तरी काय फरक पडतो असं म्हणणाराही एक गट आहे. 

विप्रोचे चेअरमन रिषद प्रेमजी यांच्या ट्विटनुसार ही फसवणूक आहे पण इन्फोसिसचे माजी डायरेक्टर मोहनदास पै यांचं म्हणणं वेगळं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एम्पलॉयमेंट हा कर्मचारी आणि कंपनी यातील करार आहे ज्यानुसार काही तास काम करणं अपेक्षित आहे पण नंतर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने मोकळ्या वेळात काय करायचं हे तो ठरवणार. 

आता प्रश्न असा की आपल्याकडे मोकळा वेळ आहे, आपण बाहेरचं काम सुरू करू पण असं करणं लिगल आहे की नाही. तुम्ही कायदा मोडत नसाल तर लीगल आहे, फक्त एकाच प्रकारच्या दोन कंपन्यांमध्ये काम केल्याने गुप्ततेचा भंग होणार नाही ही अपेक्षा असते आणि तुम्हाला जे ऑफर लेटर किंवा जॉयनिंग लेटर मिळालं असेल त्यात Violation Of Confidentiality हा मुद्दा नीट बघावा लागतो.

जर का तुमच्या कॉंट्रॅक्टमध्ये दुसरीकडे कुठे काम करू शकणार नाही असं स्पेसिफिक म्हटलं असेल तर तुम्ही काम करू शकणार नाही त्यामुळे अजून एखादा जॉब साइड बाय साइड करायला सुरू करण्याआधी तुमचं कॉन्ट्रॅक्ट नीट वाचा आणि मग योग्य तो निर्णय घ्या.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.