NATO च्या NRF फोर्स विरुद्ध लढायच्या नुसत्या विचारानंच रशियाला घाम फुटलाय
युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेलं युद्ध सध्या सगळ्या देशांसाठीचं चिंतेचा विषय बनलाय. नक्की कोणाची बाजू घ्यावी याच बुचकळ्यात बरेचसे देश अडकलेत. पण यात सगळ्यात जास्त टेन्शन वाढलंय ते NATO चं. जेव्हा पासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झालाय.
तेव्हापासून NATO जगाच्या रडारवर आहे. कारण फक्त स्टेटमेंट देण्याशिवाय NATO काहीच हालचाली करत नव्हतं. त्यामुळे जगभरातून त्यांना विरोधाचा सामना करावा लागत होता.
मात्र शेवटी वाढत्या दबावामुळे NATO ला जाग आली असून त्यानं युक्रेनच्या मदतीसाठी आपली स्पेशल फोर्स पाठवणार असल्याचं म्हंटलय. हि स्पेशल फोर्स म्हणजे NATO रिस्पॉन्स फोर्स (NRF). ज्यात NATO चे सदस्य असलेल्या 30 देशांमधले सर्वोत्तम सैनिक असतात. NATO च्या या निर्णयामुळे NRF सध्या चर्चेचा विषय बनलाय.
आता या NRF बद्दल सांगायचं झालं तर NATO रिस्पॉन्स फोर्स (NRF) ही अनेक लष्करी शाखांनी बनलेली टास्क फोर्स आहे. NATO रिस्पॉन्स फोर्सची सुरुवात 2002 मध्ये प्राग शिखर परिषदेत झाली होती. त्याच्या एका वर्षानंतर म्हणजे जून 2003 मध्ये सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी ब्रुसेल्समध्ये NRF च्या कंसेप्टला मान्यता दिली. या दलाच्या नेतृत्वासाठी सुप्रीम अलाईड कमांडर युरोप (SACEUR) ची नेमणूक करण्यावर एकमत झाले.
त्यावेळचे NATO सुप्रीम अलाईड कमांडर जनरल ऑफ युरोप (SACEUR) जनरल जेम्स जोन्स यांना म्हंटलं की, NATO कडे यापुढे शीतयुद्धासाठी आवश्यक असलेले सैन्य आणि मोठ्या प्रमाणात युनिट्स असणार नाहीत. पण, स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि मित्रांना मदत करण्यासाठी, असे सैनिक असतील जे एकदम शार्प असतील आणि प्रत्येक मिशन पार पाडतील. 21व्या शतकात कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी ही पॉवर नाटोला अधिक चांगल्या प्रकारे तयार करेल.
NRF ही जमीन, हवाई आणि नौदल युनिट्सची एक आंतरराष्ट्रीय सेना आहे, जी कमी कालावधीत मोठ्या घटनांना उत्तर देण्यासाठी तयार केली गेलीये. यामध्ये सहभागी असलेले सैनिक आपल्याकडे असणाऱ्या स्किलमध्ये पटाईत असतील. त्यांच्याकडे प्रत्येक स्किल आणि टेक्निक असेल, जे मल्टी मिशन पार पाडतील. NRF चा उपयोग लष्करी सराव, ट्रेनिंगबरोबर आपत्तींच्या काळात मदतकार्य आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी सुद्धा केला जाईल.
NRF गेल्या वर्षी अफगाणिस्तानातही तैनात करण्यात आले होते. काबूलमधून अमेरिकन सैनिक आणि सहयोगी अफगाण लोकांना बाहेर काढण्यासाठी या दलाने खूप मदत केली होती.
NRF हे एक सैन्य दल आहे जे रोटेशनल सिस्टीमवर तयार केले जाते. यामध्ये तैनात असलेल्या सैनिकांना केवळ 12 महिने सर्विस द्यावी लागते. त्यानंतर त्यांना संबंधित देशाच्या लष्कराकडे परत पाठवले जाते. नॉर्थ अटलांटिक कौन्सिलच्या मान्यतेनंतर हे फोर्स जगात कुठेही तत्काळ तैनात केले जाऊ शकते.
NRF च्या ऑपरेशनल कमांडचे मुख्यालय एक वर्ष नेदरलँड्समधील ब्रुनसम येथे असते आणि एक वर्ष इटलीतल्या नेपल्स इथल्या अलाईड जॉइंट फोर्स कमांडमध्ये असते.
2014 वेल्स समिटमधील NATO सहयोगींनी NATO च्या NRF ला आणखी पॉवरफुल आणि सक्षम बनवण्याचा निर्णय घेतला, जे फक्त स्किलसाठीच नाहीतर टेक्नोलॉगींच्या बाबतीत सुद्धा आघाडीवर असतील. त्यानुसार NATO रिस्पॉन्स फोर्सचा पहिला भाग, व्हेरी हाय रेडिनेस जॉइंट टास्क फोर्स (VJTF) मध्ये सुमारे 20,000 मजबूत सैनिकांचा समावेश असेल. यामध्ये हवाई, सागरी आणि भूदलांचा समावेश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सैनिकांना फक्त एक ते दोन दिवसांच्या अल्प सूचनेवर कुठेही तैनात केले जाऊ शकते.
दुसरा भाग इनिशियल फॉलो-ऑन फोर्सेस ग्रुप (IFFG) म्हणून ओळखला जातो. ही एक अतिशय प्रशिक्षित फोर्स आहे. ज्यांना संकटकाळी VJTF नंतर तैनातीसाठी पाठवले जाते. ते दोन मल्टीनॅशनल ब्रिगेडचे बनले आहे. पहिला मॅरीटाईम कंपोनंट आणि NATO माइन काउंटरमेझर्स ग्रुप आहे.
VJTF पहिल्यांदा 2015 मध्ये पूर्व युरोपमधील पोलंडमध्ये तैनात करण्यात आले होते. यादरम्यान, सैन्याने कोणत्याही संकटाचा सामना करण्याचा आणि तैनात करण्याच्या क्षमतेचा सराव केला होता. VJTF चे नेतृत्व दरवर्षी बदलते. यामध्ये, एक भागीदार प्रमुख देश म्हणून नियुक्त केला जातो आणि बाकीचे सदस्य देशाची भूमिका बजावतात. एकूण काय या विस्तारलेल्या NRF मध्ये एकूण 40000 सैनिकांचा समावेश आहे.
आता एवढ्या तगड्या मिलिट्रीचा फोर्सचा सामना करायला लागणार म्हंटल्यावर रशिया सुद्धा विचार करेल. कारण युक्रेनच्या सुरक्षेसाठी हि फोर्स केली जाय असल्याने युक्रेनला मोठी लष्करी मदत मिळणार असल्याने हे सैनिक रशियासाठी मोठा धोका असल्याचं मानलं जातंय. पण रशियाला यांच्याविरुद्ध लढायचं म्हणजे एका देशासाठी 30 देशांची दुश्मनी गळ्यात मारून घेणं आणि रशियाला परवडणार नाही.
- हे हि वाच भिडू
- जगातला तिसरा मोठा अण्वस्त्रांचा साठा युक्रेनने संरक्षणाच्या हमीवर रशियाला सोपवला होता
- रशिया, युक्रेन वादात भारताला अधिक गहू निर्यात करण्याची संधी मिळू शकते
- युक्रेनवरनं वाद पेटला असताना ,रशिया आणि अमेरिका यांच्यात कोणाची मिलिट्री तगडी आहे