एका राजाने पेग भरला आणि “पटियाला पेगला” सुरवात झाली. 

अस ऐकण्यात येत की जगभरात कुठेही 90ML च्या वरती पेग सिस्टीम नाही. असही म्हणतात की, पेग हा प्रकारच बाहेर अस्तित्वात नाही. एकतर स्मॉल, लार्ज आणि एक्स्ट्रा लार्ज इतकेच प्रकार चालतात. तसही तुम्हाला कटेंट पुरवणारे म्हणजे स्वत: बोलभिडू कार्यकर्त्यांपैकी कोणीच जगाच सोडा भारताच्या कोपऱ्यांना शिवून देखील आलेलं नाही. म्हणून जगभरातलं जे काय आम्हाला मिळतं ते नेटवरच !

असो, आमच्या आणि तुमच्या डिप्रेशनच्या गोष्टी सोडून आपण समजून घेवुया की ही पटियाला पेग म्हणजे!

120 ML च्या पेगची सिस्टीम कोणी आणली आणि कशी ? 

जगात कुठलीही आयकॉनिक गोष्ट झाली की, त्याबद्दल दंतकथा निर्माण होतात. पटियाला पेगबद्दल देखील अशाच दंतकथा आहेत. त्यातली पहिली कथा म्हणजे एका पार्टीत राजाने भरलेल्या पेगची. 

पटियाला पेग हि राजा भूपिंदर सिंग यांनी समस्त बेवड्यांना देलेली अमुल्य देणगी समजली जाते. तर झालं अस की पतियालाचे महाराज भूपिंदर सिंग हे क्रिकेटचे मोठ्ठे रसिक. भारतात  क्रिकेटचा खेळ हे राजा राजिंदर सिंग यांची देणगी समजली जाते. संस्थान आणि क्रिकेटचं हे नात पुढे भूपिंदर सिंग यांनी देखील सुरू ठेवलं. ते स्वत: क्रिकेट खेळत असत. 

तर १९२० साली अंबाला छावणीत डग्लस इलेव्हन या संघाविरुद्ध खेळत असताना महाराजा भूपिंदर सिंग यांनी २४२ रन्स केल्या. या मॅचमध्ये त्यांनी १६ सिक्सर आणि १४ फोर मारले. साहजिक महाराज स्वत:वर खुष झाले. त्यानंतर महाराजांनी भव्य दिव्य कामगिरीप्रमाण् खूष होवून सर्वांना पार्टीसाठी आमंत्रीत केलं. 

त्या काळात सर्वसाधारण दोन बोटांचा अंदाज लावून पेग भरण्याचा प्रकार असायचा. म्हणजे दोन बोटाच्या रुंदीएवढी दारू ग्लासमध्ये भरण्यात येत असे. पण महाराज त्या दिवशी खूष होते. म्हणून त्यांनी आपल्या हाताची करंगळी खाली लावली आणि अंगठ्याजवळच बोट वरती लावलं आणि पेग भरण्यास सुरवात केली. थोडक्यात काय तर, पेग सिस्टिम दोन बोटांच्या ऐवजी चार बोटांची झाली. 

Screen Shot 2018 10 02 at 6.22.12 PM
दोन बोट जुळवली की रेग्युलर आणि वरची खालची बोटं जोडली की पतियाला

हा पेग 120 ML चा भरला गेला. महाराज खूष झाले आणि सोबतच आलेलं पाहूणमंडळ पण जाम खूष झालं. त्या दिवशी महाराज इंग्रजांना म्हणाले, हे पतियाला आहे आणि इथे पेग असाच भरतात. झालं इंग्रजांना गावभर करण्याचा अगोदरच नाद असायचा. त्यांनी तात्काळ पतियाला पेग असा असतो म्हणून शिक्का मारून हि गोष्ट गावभर केली.

आत्ता हि झाली पटियाला पेगची पहिली गोष्ट,

यातही हि गोष्ट नेमकी महाराजांची की सरकारी अधिकाऱ्यांनी लढवलेली शक्कल याबद्दल मतप्रवाह आहेत काहीजण म्हणतात राजे खूप दारू पिवून अब्रुचं खोबरं करायचे म्हणून दोन बोटांच्या इतकाच पेग घ्यावा अस सरकारी फर्मान निघालं यावर एकाने शक्कल काढून दोन्ही टोकाची दोन बोटे म्हणजे पेग अशी सिस्टीम आणली. 

आत्ता दूसरी गोष्ट.

हि देखील भूपिंदर सिंग महाराजांच्या काळातील. यानुसार घोडेस्वारीत टेन्ट पेगिंग नावाचा एक प्रकार प्रचलित होता. त्यामध्ये मोकळ्या मैदानात घोड्यावरुन जमिनीत तंबू गाडण्यासाठी ज्या खुंट्या असतात त्या रवण्याचा प्रकार चालायचा. त्याला पेग म्हणायचे. या खेळात इंग्रज भाग घ्यायला लागले आणि हरायला लागले. मग इंग्रज म्हणाले हे इंडियन चिटिंग करतात. ते मोठ्ठा पेग घेतात. मग त्याला यांनी पतियाला पेग नाव दिलं. पुढं जास्त दारू म्हणजे पतियाला पेग अस समिकरण झालं. 

असो काही का असना. पेग बाकी पेग.. आज बारवाले 90 ML म्हणून पटियाला पेग भरतात. थोडक्यात काय तर ते गंडवतात. जागो ग्राहक जागो पटियाला म्हणल्यानंतर मापटंभरून दारू मागों !!! 

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.