कोण असतात हे सेपिओसेक्शुअल आणि ऑटोसेक्शुअल लोकं?
“मला कळत नाही पण बुद्धिमान बायका,पोरी मला लैंगिक दृष्ट्या लई आकर्षित करतात” भिडू मधला एक जण म्हणाला. .
ग्रुप मध्ये एक शहाण बेन होत. ते लगेच बोंबल “याला सेपिओसेक्शुअल म्हणतात रे!”
मग या विषयाच्या तळापर्यंत भिडू टीम गेली, तर कळालं कि आपण आपल्या लैंगिक निवडी समाजाने नियंत्रित केल्यामुळे व्यक्त करत नाही. आपल्या आजूबाजूला आपली लैंगिक निवड काय आहे याचा मेळ न लागलेली बरीच जण पाहता येतात.
आपण उगाच चार चौघात बोललो तर पोर आपली टर उडवणार, पोरांचा दररोजचा चेष्टेचा विषय होणार, आपण सामान्य नाही हि काय ओरडून सांगायची गोष्ट हाय व्हय ,मित्र हाय पण तो मला समजून घेऊ शकत नाही या सारख्या कारणामुळे अशे कित्येक भिडू गप गार पडलेले असताता . त्याच्यात बापाला कळलं तर बाप ढुंगणावर लाथ मारून हाकलून देईन कि घराबाहेर हि भीती तर वेगळीच कि मग राहा कि गप…
पण भिडुनो अस गप राहून आपलीच लै लागत अस्तिया..
हे तर खरच आहे.पण नुस्त गे,लेस्बियन,सेपीओसेक्सअल तर असतायच पण आणखी भी लैंगिक निवडी असत्यात.यातल्या सगळ्या निवडी इथं आपण बघणार नाही. तर जास्त आढळ असणाऱ्या आणि चर्चेत असणाऱ्या निवडी आपण पाहू.
सेपिओसेक्शुअल म्हणजे काय ?
“सेपिओसेक्शुअल” हा शब्द १९९८ मध्ये लाइव्ह जर्नलच्या एका वापरकर्त्यानी एका डॉट कॉम द्वारे हा शब्द बनवला होता. परंतु,सॅप या “लॅटिन” शब्दाचा अर्थ “समजणे” असा आहे.
याचा अर्थ म्हणजे ज्यां लोकांना बुद्धिमान लोकांकडे पाहून लैंगिक इच्छा होते,अस असणं म्हणजे सेपिओसेक्शुअल असतंया. या संबंधांची सुरवात तर भिन्न लिंगी व्यक्तीचा स्मार्टपणा पाहूनच होती पण त्या बुद्धीमान व्यक्ती सोबत संवाद वाढला कि सेपिओसेक्शुअल लोकांना सेक्शुअली आकर्षित होतात.
एक लेखिका सांगतात कि,आज पर्यन्त माझे ज्या पुरुषांसोबत लैंगिक संबंध आले आहे ते सगळे बुद्धिमान लोक आहेत कारण
“माझ्या मते बुद्धी हा माणसाचा सगळ्यात मोठा लैंगिक अवयव आहे “
आता याला नेहमी लैंगिकतेशीच जोडून पाहता येऊ शकत नाही तर हुषार लोकांचा सहवास हवासा वाटण सुद्धा सेपीओसेक्शुअलच असत. याच विषयाला धरून एक गोष्ट सांगण्यात येते,‘लहान वयात एका मुलीला सांगण्यात आल कि तू हुशार नाही मग तिला ज्या लोकांनी आकर्षित केल ते सगळे बुद्धिमान होते.’
हा झाला सेपिओसेक्शुअल. आता हे सोडून एक ऑटोसेक्शुअल नावाचा एक आणखीणचं वेगळा झांगडगुत्ता आहे.
ऑटोसेक्शुअल म्हणजे काय असतय ?
हे लोक म्हणजे या लोकांना पार्टनर ची गरज नसती स्वतः आरश्यासमोर जाऊन स्वतःलाच बघत बसायचं म्हणजे थोडक्यात काय तर “खुदके बॉडी से प्यार करणे वाले लोग !!”
१९८९ मध्ये लैंगिकविषयांचे तज्ज्ञ बर्नार्ड अॅपलबाऊम यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला. नक्की याचा अर्थ काय तर जे लोक इतर कोणत्याही व्यक्तींकडे आकर्षित होत नाहीत त्यांच्यासाठी हा शब्द बर्नार्ड यांनी वापरला. थोडक्यात काय तर या लोकांना शरिर सुखासाठी दुसऱ्याच शरीर लागत नाही.
नुकतच कोर्टाने कलम ३७७ मनमानी होत म्हणून ते रद्द केलय. काय म्हणतय कोर्ट तर
“लैंगिकता हि निवड व मूलभूत अधिकार आहे.लोकांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा आदर करायला पाहिजे. समजा समाजातील सर्व घटकांना बंधनमुक्त आयुष्य जगात येणार नसेल तर तोच समाज स्वतंत्र असू शकत नाही.”
हे ही वाच भिडू.
- रोज किती भारतीय पॉर्न साईट पाहतात ? नेमकं काय सर्च करतात ? अहवाल आहे वाचून घ्या.
- कामसुत्रमध्ये हनीमुन बद्दल काय लिहलय माहितय का ?
- किसमी चॉकलेट म्हणजे आपल्या हातात आलेलं पहिलं सॉफ्ट पॉर्न होतं.