लिक्विड ऑक्सिजनला पर्याय ठरत असलेल्या कॉन्सट्रेटरच काम अशा पद्धतीनं चालते….

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमितांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. देशभरात दररोज ३ लाखांपेक्षा जास्त बाधित आढळत आहेत. या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. बहुतेक रुग्णालयात ऑक्सिजन अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत कमी जोखमीच्या प्रकरणांत ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे.

ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर हे कॉम्प्युटर मॉनिटरच्या आकारापेक्षा थोडे मोठे असतं. जे हवेपासून ऑक्सिजन तयार करते. वातावरणातील हवेत सुमारे ७८ टक्के नायट्रोजन आणि २१ टक्के ऑक्सिजन, तर इतर वायू १ टक्के आहे. ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर ही हवा घेते, ते फिल्टर करते आणि नायट्रोजन परत हवेत सोडत आणि उर्वरित ऑक्सिजनवर काम करते.

महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरला दाखविला हिरवा कंदील 

राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. या दरम्यान ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची उपयुक्तता पाहता महाराष्ट्र सरकारने देखील त्याच्या मागणीवर भर दिला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले कि,

‘आम्ही ४०,००० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, १३२ पीएसए प्लांट, २५,०००  मे.टन लिक्विड ऑक्सिजन, १० लाख रेमॅडेव्हिव्हिर वायल्स आणि सुमारे १५ ऑक्सिजन स्टोरेज टँकरसाठी जागतिक निविदा काढली आहे. या उद्देशाने आम्ही एक सशक्त समिती गठीत केली आहे ‘

 

कॉन्सन्ट्रेटर कितपत उपयोगी? 

हे ऑक्सिजन ९० ते ९५  टक्के शुध्द असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे. कॉन्सनट्रेटरमधील प्रेशर व्हॅल्यू १- १० लिटर प्रति मिनिटापर्यंत पुरवठा नियमित करण्यात मदत करते. डब्ल्यूएचओच्या २०१५ च्या अहवालानुसार कॉन्सनट्रेटर ऑपरेशनसाठी तयार केले आहे, जे दिवसातून २४ तास, आठवड्यातून ७ दिवस आणि ५ वर्षांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन तयार करू शकेल.

दरम्यान तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमधील ऑक्सिजन हे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनएवढे म्हणजे ९९ टक्के शुध्द नसते. परंतु ८५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन लावायचा झाल्यास यातून मिळणार ऑक्सिजन पुरेसे आहे.

त्यात, अनेक राज्यांत ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा कमी होत असल्याने ऑक्सिजन थेरपीसाठी विशेषतः घरातील रूग्णांसाठी देखील हे फायदेशीर आहे.

परंतु आयसीयूच्या रूग्णांसाठी कॉन्सन्ट्रेटर वापरण्याचा सल्ला दिला जात नाही.

महत्वाच म्हणजे एकाच वेळी दोन रुग्णांना सेवा देण्यासाठी एकापेक्षा जास्त नळ्या यात जोडल्या जाऊ शकतात, परंतु तज्ञ त्याची शिफारस करत नाहीत कारण यामुळे क्रॉस-इन्फेक्शनचा धोका होण्याची शक्यता आहे.

ऑक्सिजन सिलेंडर्स आणि एलएमओपेक्षा कसे वेगळे ? 

ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर हा ऑक्सिजन सिलिंडर्ससाठी सर्वात सोपा पर्याय आहे, परंतु केवळ प्रति मिनिट ५ -१० लिटर ऑक्सिजन पुरवतो, तर गंभीर रूग्णांना प्रति मिनिट ४०-५० लिटरची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे तर कमी आणि मध्यम जोखमीच्या रूग्णांसाठी सर्वात योग्य आहेत.

एलएमओला क्रायोजेनिक टँकरमध्ये साठवून ठेवणे आवश्यक असते मात्र कॉन्सेन्टेटर हे पोर्टेबल आहेत, तसेच त्यांना विशेष तापमानाची आवश्यक लागत नाही. आणि हे रिफिलिंगची आवश्यकता असणाऱ्या सिलेंडर्ससारखे ते नाही, कॉन्सेन्टेटरला केवळ उर्जा स्त्रोताची आवश्यकता असते.

मात्र, हे ऑक्सिजन कॉन्सेन्टेटर  सिलिंडर ऑक्सिजन पेक्षा जास्त महाग आहेत. सिलिंडर ऑक्सिजन ८,००० ते १२,००० रुपयांपर्यंत उपलब्ध होते, तर कॉन्सेन्टेटर साधारण ४०,००० ते ९०,००० पर्यंत मिळते. ज्यामुळे ते सामन्यांच्या खिशाला परवडणार नाही. तर वीज आणि नियमित देखभाल व्यतिरिक्त, वाहतुकीच्या खर्चाच्या मानाने थोडेसे कमी आहे,

सिलिंडर्समध्ये रिफिलिंग खर्च आणि वाहतुकीचा समावेश असतो.

उद्योग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या ऑक्सिजन कॉन्सेन्टेटरची मागणी प्रतिवर्ष ४०,०००  वरून ३०,००० ते ४०,००० दरमहा पर्यंत गेली आहे. डॉ. राजीव नाथ यांनी माध्यमांना सांगितले की, दररोज १,००० ते २००० कॉन्सेन्टेटरची मागणी होते. परंतु त्याचे पुरेसे उत्पादन होत नाही. बीपीएल आणि फिलिप्स या देशातील प्रमुख कंपन्या आहेत. तर भारतीय बाजारात इतर कंपन्यांचे कन्सेंट्रेटरही उपलब्ध आहेत. मात्र वाढत्या मागणीमुळे त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.

हे ही वाचा भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.