TRP चा घोळ घालून नेमकं कस गंडवल जातय ?

टीआरपी म्हणजे ताई रडली पाहिजे असा अर्थ मध्यंतरी एका मराठी कॉमेडी मालिकेत आम्ही ऐकला होता. कालचं आज तक रिपोर्टिंग बघून कदाचित हाच खरा अर्थ आहे की काय असंही बर्‍याच लोकांना वाटून गेलं असेल,

पण टीआरपी म्हणजे तसं काही नसून ते असतं टारगेट रेटिंग पॉईंट.

भारतात या प्रक्रियेवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मागील काही दिवसातच रविष कुमार यांनी आकाश बॅनर्जी यांना दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात काही सूचक विधाने केली होती. भारतात रिमोट मध्येच यंत्र बसवून टिआरपी कसा मोजला जातो व फार कमी प्रमाणात नमुने घेतल्यामुळे हे टीआरपी चे आकडे कसे खोटे असतात यावर त्यांनी प्रकाश टाकला होता. आता आपण यातील नेमकी गोम पाहूया.

एक शब्दानुसार बघुयात :

टारगेट

टारगेट म्हणजे कोण तर इतर कोणी नसून फक्त आपण तुम्ही कधी विचार केला आहे का की एवढे मला महागाचे स्टुडिओ विकत घेऊन न्यूज चॅनेल आपल्यासाठी कार्यक्रम सादर करतात. रोज तिथे चर्चेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात, याच वेळी हेच न्यूज चॅनेल हजारो पत्रकारांना कामावर ठेवून, त्यांना देशभरात पाठवून
,मग त्यांच्याकडून बातम्या घेऊन, त्यावर ग्राफिक्स बनवून, आणि अँकरला भरभक्कम पैसे देऊन, त्यासाठी सर्व सुविधा उभारून, सॅटलाईट मार्फत तो चॅनेल आपल्यापर्यंत पाठवूनही आपल्याकडून एक रुपयाही घेत नाहीत!

इतकेच नाही तर कित्येक न्यूज चॅनेल आता फ्री झाले आहेत; म्हणजे त्यांना पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे ग्राहकांना मोजावे लागत नाहीत मग एवढा सगळा खर्च करून या न्यूज चॅनल्सना नफा तरी कसा होतो व जर ते व्यापाराच्या उद्योगात असतील तर ते नक्की काय विकत असतात?

त्याचं सगळ्यात सोपं उत्तर आहे तो म्हणजे हा शब्द- ते विकत असतात ‘टार्गेट’ म्हणजेच तुम्ही!

तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्या बातम्या विकत घेणारे ग्राहक आहेत. आता मात्र तुम्ही त्यांच्या बातम्या विकत घेणारे कुणीही नसून ते तुम्हाला विकणारे तुमचे अधिपती आहेत. जनता जेव्हा एखादा कार्यक्रम पाहते तेव्हा जनता टारगेट बनवून या न्यूज चॅनेल साठी काम करणारी एक वर्कफोर्स झालेली असते.

ती बातमी तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी लागलेला खर्च तुम्ही तो चॅनेल पाहत बसण्यासाठी केलेल्या खर्चाच्या कितीतरी पटीने जास्त असतो. मात्र तुम्ही त्या चॅनेल वरती जे पाहता त्याचा परिणाम तुमच्या वागण्या-बोलण्यात, तुमच्या राहणीमानात, तुमच्या मतदान करण्याच्या पॅटर्नमध्ये व त्यासोबतच तुम्ही त्यावर कोणती भूमिका घेता या सर्व गोष्टींवरती अवलंबून असतो. व म्हणूनच हे न्यूज चैनल इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही तुम्हाला फुकट सेवा देऊ शकतात कारण तुम्ही त्यांचे टारगेट आहात व ते तुम्हाला विकू शकतात.

रेटिंग-

रेटिंग म्हणजे त्या विशिष्ट चॅनेल ला दिलेला गुणानुक्रम होय तर चॅनेल्सपेक्षा सापेक्षपणे एखाद्या चैनल ला किती प्रमाणात लोक पाहत आहेत त्यावरून त्या चॅनलचे रेटिंग ठरवले जाते व हे रेटिंग पाहून वेगवेगळ्या चॅनल्स ला आपली पोहोच किती जास्त ग्राहकांपर्यंत आहे ते समजते. ज्याची पोहोच जास्त ग्राहकांपर्यंत असते तोच चॅनेल जास्त चांगला व म्हणूनच त्या चॅनेलला जास्त जाहिराती भेटू शकतात अशी शक्यता वाढते.

पॉईंट्स

पॉईंट्स अर्थातच त्या चॅनेलला मिळणारे गुण होय. टीव्हीच्या भाषेत सर्वसाधारणपणे एक मिनिटांपेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहणाऱ्या कोणालाही दर्शक म्हणून संबोधले जाते. इतकेच नाहीतर पाहणारा दोन वर्षावरील कोणीही असला तरी त्याला दर्शक म्हणूनच या संख्येत धरले जाते किती लोक हा चॅनेल पाहत आहेत याचे मोजमाप टीआरपी वरून केले जाते.

भारतात टीआरपी मोजण्याचे काम शासकीय संस्था करते व तिचे नाव आहे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही संस्था बार कोड वापरून टी आर पी काढते.

भारतातील जवळपास 44 हजार घरांमध्ये टीआरपी मोजण्यासाठी हे कोड लावण्यात आले आहेत. आता हे कोड तरी वॉटरमार्क च्या स्वरूपात टेलिकास्ट केल्या जाणाऱ्या व्हिडिओमध्ये आधीपासून उमटवलेले असले तरी मानवी कानांना ते ऐकू येत नाहीत ज्या प्रकारे आपण कोणता चैनल कितीवेळ पाहत आहोत हे या कोड वरून समजले जाते. त्याच प्रमाणे हे वॉटरमार्क सुद्धा हा कोड नमूद करून घेतो. काही घरे निवडून तिथे कोड बसवले जातात.

त्यांची निवड करण्यामध्ये कोणती प्रक्रिया असते?

तर हि निवड करण्यामागे दोन स्तरांवर ती प्रोसेस केली जाते- पहिल्यांदा एक प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येते की मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येला जागोजागी घरोघर जाऊन भेटी देण्यात येतात व या टारगेट लोकसंख्या मधील घरांच्या नोंदी केल्या जातात.

ही प्रक्रिया दरवर्षी केली जाते या केल्या जाणाऱ्या सर्वे मधून कोणतीही घरी सीआरपी मोजण्याच्या प्रक्रियेसाठी निवडली जातात बार्क या संस्थेच्या माहिती प्रमाणे त्यांनी वेबसाईटवर दिल्यानुसार किती लोक चॅनेल पाहत आहेत याची आकडेवारी दररोज या संस्थेकडे जमा होत असते मात्र त्याचबरोबर कोणती घरे यासाठी निवडायची यावर मात्र या संस्थेचे नियंत्रण नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. हे वगळता टेलिफोन किंवा थेट घरांना भेटी देऊन आपल्याला मिळणारी आकडेवारी कितपत बरोबर आहे याचेही काही फार थोड्या प्रमाणामध्ये चेकिंग केले जाते. ही प्रक्रिया मात्र बार्क संस्था स्वतः करते. काही कोड जर संशयास्पदरीत्या चालत असतील व त्यांच्या मध्ये खूप जास्त तफावत व घडामोडी वेळोवेळी दिसून येत असेल तर मात्र ही संस्था स्वतः अशा जागी भेटी देऊन या प्रकरणाची शहानिशा करते असेही त्यांनी वेबसाइटवर म्हटले आहे.

माहिती आणि दूरसंचार मंत्रालयाच्या आदेशानुसार या घरांचे क्रमांक दरवर्षी बदलले जातात व निरनिराळ्या घरांमध्ये हे कोड बसवून आकडे प्रसिद्ध केले जातात.

ज्याप्रमाणे विधानपरिषदेचे सदस्य निवडले जातात त्याचप्रमाणे पहिल्यांदा सर्वात जुने पॅनल पाठवले जातात व त्यानंतर नवे पॅनल तितक्याच प्रमाणात बसवले जातात व यामुळे पॅनल ची संख्या समप्रमाणात राहते आणि थेट तितकीच आकडेवारी दरवेळी मिळवली जाते. दर महिन्याला थोडेथोडे अशाप्रकारे हे पॅनल बदलण्यात येतात व त्याशिवाय मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार हे पॅनल बदलण्याचे आणि लावण्याचे काम अत्यंत गोपनीय पद्धतीने केले जाते जेणेकरून या ग्राहकांना कुणीही प्रभावित करू नये व त्यांना आपण काय पाहायचे आहे याचा निर्णय स्वतः घेता यावा.

मात्र याप्रकारे प्रेक्षकांची संख्या मोजणे याला की कोणती कोणती बंधने आहेत? या प्रक्रियेत नक्की कुठे आणि कसे गैरवर्तन केले जाऊ शकते?

मुंबई पोलिसांनी केलेल्या आरोपानुसार आपले टीआरपी रेटिंग वाढवून घेण्यासाठी ज्या घरांमध्ये हे पॅनल लावले गेले होते अशा घरांना पैशाच्या स्वरूपात काही रक्कम देण्यात आली होती व त्यामुळे मिळालेले टीआरपी रेटिंग सदोष असून याबाबतीत गैरव्यवहार झाला होता.

आतापर्यंत याबाबतीत चार चॅनल्सचे नाव आले असून अर्णब गोस्वामी यांची रिपब्लिक टीव्ही याबाबतीतील स्टार आरोपी आहे .

याबाबत चार लोकांना अटकही झाली आहे तसेच काही चॅनेल विरुद्ध मुंबई पोलिसांनी FIR सुद्धा काढली आहे. मुंबई पोलीस अधीक्षक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

“आम्हाला काही न्यूज चॅनल्सचे लोक हंसा रिसर्च ग्रुप या TRP डेटा जमा करणाऱ्या संस्थेच्या लोकांना व कर्मचाऱ्यांना लाच देऊन चुकीची माहिती करण्यासाठी भाग पडत होते व टीआरपी आपल्या बाजूने वळवून घेत होते अशी माहिती मिळाली आहे प्रमुख्याने ही बाब मुंबई च्या आसपास च्या क्षेत्रांमध्ये घडली आहे हे कर्मचारी काही ठराविक निवडल्या गेलेल्या घरांमध्ये तेथील सदस्यांना पैसे देऊन ठराविक वेळी काही न्यूज चॅनल चालू ठेवण्यासाठी सांगत होते, उदाहरणार्थ रिपब्लिक टीव्ही चॅनेल सुरू ठेवण्यासाठी काही घरातील लोकांना पैसे दिले गेले व यामुळे या चॅनेलचे रेटिंग वाढले. या घरातील लोकांना प्रति दिवशी पाचशे ते सहाशे रुपये देऊन चॅनेल ठेवायला सांगितले होते काही घरात तर आम्हाला असे आढळले आहे की इंग्रजी न कळणारे लोक ही  रिपब्लिक टीव्ही व इंग्रजी चॅनेल लावून बसले होते. त्यांनी पोलिसांना जवळ दिलेल्या स्टेटमेंट मध्ये ह्या सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत,” असेही सिंग यांनी सांगितले आहे.

मुंबई पोलिसांकडून कांदिवली पोलीस स्टेशन मध्ये गैरव्यवहार आणि माध्यमांवरील विश्वासाचा दुरुपयोग असे काही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

यासंबंधी हंसा कंपनीचे दोन कर्मचारी विशाल भंडारी आणि भोपाळी राव मिस्तरी यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे त्यासोबतच फक्त मराठी चॅनेल चे मालक शिरीष पट्टणशेट्टी आणि बॉक्स सिनेमा या चैनल चे मालक नारायण शर्मा यांना गुरुवारी अटक करण्यात आली. वरील दोन कर्मचाऱ्यांनी जून मध्ये आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता व यातील एका कर्मचार्‍याचा बँक अकाउंट मध्ये वीस लाख रुपये तर लॉकरमध्ये साडेआठ लाख रुपये सापडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका चॅनेल ला सुरू ठेवण्यासाठी व त्याचे टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी त्यांना आपला मिळाला होता.

“ बार्क इंडिया संस्थेने आत्तापर्यंत इतकी वर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार काम केले आहे. ज्या घरांवर टीआरपी पैसे घेऊन वेगळा दाखवण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे, या घरांची माहिती आम्ही गोळा करून त्यावर ती नजर ठेवून आमच्या आखून दिलेल्या तत्त्वानुसार व निर्देशानुसार योग्य ती माहिती मुंबई पोलिसांना पोचवू. भारतात नक्की काय पाहिले जाते याचा सुयोग्य आणि प्रामाणिक अहवाल आम्ही भारताला वेळोवेळी देत आलो आहोत . आम्ही मुंबई पोलिसांचे आभार मानतो की त्यांनी या प्रकरणाकडे आमचे लक्ष वेधले आमच्या पातळीवर शक्य ती सर्व मदत मुंबई पोलिसांना केली जाईल याचे आम्ही आश्वासन देतो,” अशी प्रतिक्रिया बार्क इंडिया संस्थेच्या प्रवक्त्याने बोलताना दिली आहे.

यापुर्वीही टीआरपी काढण्याच्या पद्धती वरती ताशेरे ओढले गेले आहेत.

गेल्याच आठवड्यात भारताचे केंद्रीय दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी “भारतात टीआरपी काढण्याची पद्धत बदलायला हवी व टीआरपी पत्रकारिता अर्थात टाळ्याखाऊ पत्रकारिता कमी करण्याची गरज” दर्शवली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र पांचजन्य यांच्या आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जावडेकर म्हणाले की

“आपण स्वनियंत्रणावर जास्त विश्वास ठेवतो, त्यामुळे माझी सर्व माध्यमकर्मी व माध्यम समूहांना विनंती आहे की त्यांनी स्वतःच या प्रकरणांमध्ये एक सर्व संमतीचा मार्ग काढून आपल्या पत्रकारितेवर तसेच प्रक्षेपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एखाद्या संस्थेची निर्मिती करावी. सरकारचा भारतातील माध्यमे आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पूर्ण विश्वास आहे व माध्यमांना स्वातंत्र्य देणे ही सरकारची जबाबदारी आहे मात्र माध्यमांनी देखील आपल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग केला पाहिजे”

असेही ते यावेळी म्हणाले. सरकारची मालकी असणारी दूरदर्शन की वाहिनी या टी आर पी प्रक्रियेवर विश्वास ठेवत नाही व स्वतःचे कार्यक्रम स्वतः निवडण्याची मूभा या वाहिनीला आहे.

पण आता नेमकं तुम्हाला विकत घेणार कोण आहे?

टीव्हीवर दिसणाऱ्या चॅनल्सचा जवळपास 70 टक्के इतका वाटा त्यावरील जाहिरातदार आणि विविध प्रायोजक यांच्याकडून येतो तर केवळ 30 टक्के वाटा ग्राहक आपल्या खिशातून देत असतात त्यामुळे सहाजिकच ग्राहकांना पेक्षा पल्याला पोहोचणार्‍या जाहिरातदार व प्रायोजकांची नर्सिंग संभाळणे चैनल्स साठी गरजेचे होऊन बसले आहे व त्यामुळे या जाहिरातदारांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी आपल्या चॅनेल्सवर लोक टिकून राहतील यासाठी त्यांच्यात चढाओढ लागलेली असते या स्पर्धेतूनच आक्रस्ताळेपणा करत अगदी अशोभनीय व प्रासंगिक वर्तन चॅनेल्सवर करायचे खळबळजनक विधाने करून लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे व तेही न जमल्यास थेट तांत्रिक प्रक्रियेशी छेडछाड करून आपली पोट भरण्याची विद्या पुढे न्यायची असा डाव मुंबई पोलिसांनी केलेल्या शोधातून व कारवाई केलेल्या चॅनेल कडून उजेडात आला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.