महाभारतातल्या भीमाचं सध्या काय चाललय..?

२ ऑक्टोंबर १९८८ रोजी दुरदर्शनवर महाभारत नावाची मालिका सुरू झाली होती. चोप्रा बाप लेकांनी ही मालिका बनवली. ही मालिका तेव्हा एवढी फेमस झाली की सगळीकडं महाभारताचीच चर्चा असायची.

लोकांकडं तेव्हा टिव्ह्या नव्हत्या. गावातल्या एखाद्याच्याच घरात टिव्ही असायची. त्यावर ही मालिका बघायला गावातल्या लोकांची तुफान गर्दी व्हायची. या मालिकेला लोकांनी पार डोक्यावर घेतलं होतं कारण ही मालिका देवाची होती. त्यातले लोक हे देवच आहेत हे आपल्या बापड्या लोकांना वाटायचं.

मात्र या मालिकेतल्या भीमाला लई मागणी होती. तो होताच तसा. धिप्पाड, उंच, दहा माणसाला एकावेळेस लोळवणारा. हातात भली मोठी गदा घेऊन फिरणारा. त्यामुळे भीम लई लोकांच्या गळ्यातला ताईत झाला होता.

मात्र हा धिप्पाड, उंचापुरा, भली मोठी गदा हातात घेतलेला भीम कोण होता?

महाभारतातला भीम सध्या काय करतो वगैरे वगैरे प्रश्न आजही लोकांना पडतात. मग ते नेहमीसारखं जिथं कमी तिथं आम्ही टाईप भीमाची कुंडली काढली आणि तुमच्यापुढं मांडायचं आम्ही ठरवलं. 

महाभारतातला हा भीम म्हणजे प्रविण कुमार सोबती. प्रविण कुमार मुळचा पंजाबमधील एका छोट्या गावातला. पंजाबी म्हणल्यावर गडी लहानपणापासून हट्टा कट्टा होता. घरी रोज खायला दूध, दही आणि तूप. व्यायामाची आवडही लहानपणापासून होती. त्यामुळे त्यानं चांगले डोले शोले बनवले होते.

आपण जेव्हा गोध्याडात झोपलेले असतो ना तेव्हा प्रविण कुमार रोज सकाळी तीन वाजताच उठायचा, सुर्य उगोस्तोवर जोरदार जोर बैठका मारायचा. जेवतांना मटन, चिकन, मासे खायचा. त्याच्या आईला प्रविणच्या शरीराची एवढी काळजी असायची की, ती त्याच्यासाठी रोज एक कोंबडं शिजवायची. अन तो अख्खं कोम्बड फ़स्त करायचा. असं सतरा- अठरा वर्षाचा झाल्यानंतर सुरवातीचा दिवसात तो रोज करायचा. तीन वर्षातच त्यांचं शरीर पोलादासारखं झालं होतं. तीन वर्षापुर्वी पाहिलेले लोक त्याला ओळखत भी नव्हते.

आत्ताच्या सारखं दोन दिवस जीम मारून सप्लिमेंट घेत नव्हता. नुस्त गावरान खाऊन तो तयार झाला होता.

शाळेत शिकत असतांना खेळाच्या स्पर्ध्या व्हायचा. त्यामध्ये प्रविण भाग घ्यायचा. त्यांच्या ताकदीचा अंदाज मास्तरांना आला होता. मास्तरांनी त्याला गोळा फेक आणि थाली फेकायला शिकवलं. त्याची ताकदच एवढी होती की एशीयन गेम मध्ये त्याला खेऴण्याची संधी मिळाली. १९६६ साली आणी १९७० साली बँकाँक मध्ये होणाऱ्या एशीयन स्पर्ध्येत प्रविण कुमारनं भाग घेतला होता. दोन्ही वेळेस प्रविण कुमारनं सुवर्णपदक पटकावलं होतं. कारण संपुर्ण आशिया खंडातून त्यांना टक्कर देणारं असं कोणी नव्हतं.

त्यामुळे या स्पर्धेत ५६.७४ मीटरवर थाळी फेकत प्रविण कुमारनं रेकॉर्ड बनवला होता. त्यानंतर १९७४ मध्ये इराणमध्ये झालेल्या एशियन स्पर्ध्येतही त्यानं पदक पटकावलं होतं.

एशियन स्पर्ध्या आणि आॅलम्पिॆकमध्ये खेळत असल्यामुळे प्रविण कुमारचं नाव झालं होतं.त्यामुळे सरकारी नोकरीही भेटली होती.

मात्र, प्रविण कुमाराच्या नशीबात वेगळीच गोष्ट होती. साल होतं १९८६. त्यावेळेस प्रविणच्या मित्रानं प्रविणला सांगितलं की. बी. आर. चोप्रा महाभारत बनवत आहेत. त्यांना भीमाच्या रोलसाठी धिप्पाड माणूस हवाय. त्याचं म्हणणं आहे की तु त्यांना एकदा भेटावं.

इकडं चोपडा भीमाच्या रोलसाठी पात्र शोधत होते, महाभारतातला भीम म्हणजे कुंती पुत्र, पाच पांडवांपैकी सगळ्यात धिप्पाड आणि बलशाही होता. लहानपणी एकदा कुंतीच्या हातातून भीम निसटला दगड्याच्या मोठ्या शिळेवर पडला. कुंती घाबरली, भीमाला पटकन उचलून घेतलं भिमला काही झालय ते पाहु लागली तेव्हा त्या शिळेचे तुकडे झाले होते. ज्या भीमानं बकासुरसारख्या राक्षसाला मारलं होतं. त्यामुळे भीम म्हणजे धिप्पाड, पोलादी, उंच, दहा माणसाला एकाच वेळेस लोळवणारा होता. साहजिक चोप्रांना भीमासाठी असाच भक्कम माणूस हवा होता.

प्रविण कुमार त्यांना भेटले. चोप्रांना त्यांना समजून सांगितलं आणि महाभारतातल्या भिमाचा रोल प्रविण कुमारांनीच करायचं हे फिक्स झालं.

प्रविण कुमारसाठी जणू काही स्वर्गाचं दार उघडलं होतं. त्यानंतर हे पात्र एवढं फेमस झालं की लोकांनी अक्षरश: याला डोक्यावर घेतलं. प्रविण कुमारचं आणखी नाव झालं. पिक्चरच्या ऑफर यायला लागल्या. प्रविण कुमाराला रक्षा नावाचा पाहिला चित्रपट भेटला. त्यानी या चित्रपटत डाकुचा रोल केला होता. जवळपास पन्नासच्या वर चित्रपटात प्रविण कुमारांनी काम केलं.

त्याकाळची गाजलेली मालिका चाचा चौधरी यामध्ये प्रविण कुमारनं साबुचा रोल केला होता. खेळ, एॅक्टीग नंतर प्रविण कुमारनं आपला मोर्चा राजकारणाकडं वळवला.

मात्र भल्याभल्यांना राजकारणाचा मोह आवरत नाही तसा प्रविण कुमारांनाही आवरता आला नाही. तेव्हा आपले अण्णा दिल्लीत उपोषणाला बसले होते. देशहिताचं काम करत होते. केजरीवाल त्यांच्या मांडीला मांडी लावून साथ देत होते. केजरीवालांनी आम आदमी पक्ष काढायचं ठरवलं. प्रविण कुमारांनाही पक्षात सामिल व्हायचं आमत्रणं दिलं. त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. २०१३ सालची विधानसभा निवडणुक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर आप सोडून भाजप जाॅईन केलं. तिथंही मन रमलं नाही. मग सगळं सोडून दिलं. खेळ, एॅक्टींग, राजकारण अशा क्षेत्रात नाव कमावलेले प्रविण कुमार सोबती सध्या दिल्लीत आरामाचं जिवन जगत आहेत.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.