शिवसेनेचा अस्त की नवी सुरुवात ? निवडणूक आयोगाच्या निर्णयानं नेमकं काय होणार..

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे चिन्हाचे तीन पर्याय आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नावांचे तीन पर्याय आयोगापुढं सादर केल्याची माहिती दिली.

चिन्ह गोठवण्याचा निर्णय हा अंधेरी पूर्व मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी घेण्यात आला असला, तरी निर्णयामुळं अनेक प्रश्न उभे राहतायत. 

आता धनुष्यबाण हे चिन्ह कायमचं गोठवलं जाणार का ? नवं चिन्ह कसं मिळतं ? आणि हा उद्धव ठाकरेंच्या गटाचा अस्त आहे की नवीन सुरुवात ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओमधून जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.

Leave A Reply

Your email address will not be published.