काँग्रेस सोडलीच तर कॅप्टन साठी दोन पर्याय आहेत.

 

पंजाबच्या राजकारणात आज मोठा स्फोट झालाय. पंजाब काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात, काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेस मधील अंतर्गत वादामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

मुख्यमंत्रीपदासोबतच पक्षाचाही राजीनामा ?

काँग्रेस विधिमंडळ दलाच्या बैठकीपूर्वी नाराज अमरिंदर सिंह यांनी फोनवरून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केली. आपल्याशी चर्चेविना थेट विधिमंडळ दलाची बैठक बोलावणं हा आपला अपमान असल्याची कॅप्टन अमरिंदर सिंह यांची भावना त्यांनी व्यक्त केल्याचंही सांगण्यात येतंय. यामुळेच, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तर दिला सोबत अशीही कुजबुज चालू होती कि ते काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णयही घेऊ शकतात.

मात्र त्यांनी स्पष्ट केलं आहे कि, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जरूर दिलाय पण मी अजून कॉंग्रेस सदस्य आहे. पण सोबतच त्यांनी असा देखील सूचक संदेश दिला आहे कि, मला राजकारणात अनेक पर्याय खुले आहेत, आता यावरून असं समजायचं का कि खरंच ते कॉंग्रेस सोडून इतर पक्षात जाणार आहेत. आणि जरी गेले तर पर्याय कोणते असतील?

काँग्रेस सोडल्यावर कॅप्टन जाणार कुठं ?

तर ते भाजप किंव्हा आम आदमी पक्षात देखील शकतात असंही म्हणलं जातंय. 

याला आधार असलेले दोन घटनाक्रम आपण पाहू शकतो. 

राजकीय तज्ज्ञांचं म्हणन आहे कि, कॅप्टन यांनी काँग्रेस सोडली तर त्यांच्यासाठी सर्वात मोठा पक्षाचा पर्याय म्हणजे भारतीय जनता पक्ष होय. कारण त्यांनी मागेच एकदा असं विधान केलं होतं कि, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाब काँग्रेसमध्ये दुर्लक्ष करत ते भाजपमध्ये सामील होण्याचा विचार करत होते. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जवळीक आहे हि गोष्ट लपलेली नाही. अशा परिस्थितीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कॅप्टनशी संपर्क केल्याचीही चर्चा आहे.

कॅप्टन आणि भाजप पक्ष या दोन्ही घटकांना एकमेकांची गरज असल्याचा एक मुद्दा समोर येतो.

त्यात अजून एक म्हणजे, पंजाबमध्ये सध्या सर्वात मोठा मुद्दा आहे कृषी सुधारणा कायदा. त्याचा निषेध पंजाबमधूनच सुरू झाला. हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करण्यासठी भाजपला कॅप्टन यांची खूप मोठी गरज भासू शकते कारण कॅप्टन सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. या मुद्द्यावरून ते नेहेमीच केंद्रावर टीका करत आले आहेत.

जर कॅप्टनने कायदा रद्द केला, तर विरोधकांना कॅप्टनच्या राजकीय प्रभावापुढे उभे राहता येणार नाही.

  कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जातात.

जेव्हाही कॅप्टन दिल्लीला जातात, तेव्हा त्यांना सहजपणे पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मिळते. याशिवाय ते अनेकदा मोदींसोबत गृहमंत्री शहा यांना भेटतात. यासह, कॅप्टन भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क साधून भाजपमध्ये सामील होऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.

 याशिवाय ते आप मध्ये जाणार अशीही चर्चा आहे. 

या वर्षीच्या जून महिन्यापासूनच अशी चर्चा चालू होती कि, कॅप्टन आप मध्ये जाऊ शकतात. 

कुंवर विजय प्रताप सिंह हे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे सर्वात विश्वासू अधिकारी म्हणले जातात.  त्यांनी २०१५ च्या कोटकपुरा आणि बहबल कलान गोळीबाराच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी एसआयटीचे नेतृत्व केले. या अधिकाऱ्याने अकाली निवृत्ती मागितली होती आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ९ एप्रिल रोजी एसआयटीचा तपास रद्द केल्यानंतर ११ एप्रिल रोजी राजीनामा दिला होता.

पण मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला कुंवर विजय प्रताप यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी राजीनामा नाकारला होता पण तरी कुंवर यांनी त्यांना तसे करण्यास राजी केले.  कुंवर विजय प्रताप सिंह यांच्या ‘आप’मध्ये सामील होण्याच्या निर्णयाला कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा सॉफ्टकॉर्नर असल्याचं बोललं जात होतं. कुंवर विजय प्रताप सिंह यांचा आप प्रवेश अरविंद केजरीवाल यांच्या पक्षासाठी एक मोठा आधार म्हणून पाहिले जात होते. दरम्यान कुंवर विजय प्रताप आणि आप च्या काही नेत्यांच्या तसेच केजरीवाल यांच्या देखील ते संपर्कात होते. त्यामुळे सद्या कॉंग्रेस सोडली तर पंजाब मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणजे आप हा पक्ष उदयास आला आहे.

त्यामुळे त्यांनी म्हणल्याप्रमाणे, त्यांचे हे दोन राजकीय पक्ष पुढील राजकीय पर्याय असू शकतात. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.