पॉर्नला XXX कधी पासून म्हणायला लागले?

‘XXX’ वाचलं की काहीतरी इंटरेस्टिंग असणार म्हणून पोट्टे काय लिहिलंय ते हमखास वाचायला येणारच ! हल्ली लहान मुलांना पण XXX  काय असतंय ते सांगायला लागत नाही. त्यामुळं आता XXX कशाशी निगडित आहे ते सांगायला वेळ न घालवता, गोष्टीचा कार्यक्रम सुरु करूया.

XXX म्हणजे काहीतरी अश्लील असल्याचं चिन्हांकित करतं. म्हणजे बऱ्याचदा लैंगिक म्हणजेच हार्ड कोअर सेक्स कंटेन्टसाठी शॉर्टहँड म्हणून या शब्दाचा थोडक्यात चिन्हाचा वापर होतो.

पण हे शॉर्टहँड कधीपासून वापरायला लागले त्याचा पण किस्स्साय…

१९६८ मध्ये, मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका (एमपीएए) यांनी केवळ अडल्ट म्हणजे मोठ्यांसाठी असणाऱ्या कंन्टेटच वर्णन करणार्‍या चित्रपटांचे वर्गीकरण करण्यासाठी एक्स-रेटिंगची सुरुवात केली.

त्याच झालं असं कि, अमेरिकेत जसजशी पोर्नोग्राफी अधिक कायदेशीर आणि व्यावसायिकदृष्ट्या लोकप्रिय होऊ लागली तसतसं अडल्ट कंन्टेटवर जोर देण्यासाठी निर्मात्यांनी त्यांच्या अडल्ट चित्रपटांवर जास्तीची एक्स रेटिंग द्यायला सुरुवात केली. कारण चित्रपट बघण्यासाठी पालकांनी मुलांना आणू नये, किंवा एखाद्या अंडरएज मुलांनी हा चित्रपट बघू नये यासाठी हि सुविधा एमपीएएने केली होती.

त्यानंतर काहींनी त्यांच्या एका एक्स रेटिंगपेक्षा जास्ती एक्स रेटिंग द्यायला सुरुवात केली. जेवढे जास्त एक्स पिक्चर तेवढाच जास्त हार्डकोअर. म्हणजे XXX हार्डकोअरसाठी तर XX सॉफ्ट कोअर पॉर्नसाठी. कधीकधी तर चित्रपटांचे समीक्षण करणारे सुद्धा हे रेंटिंग्स द्यायचे. यात विलियम रोटस्लर नामक चित्रपट समीक्षक हा फंडा वापरायचे.

ज्यात सामान्यत: स्पष्ट भाषा आणि सेक्स ही क्रिया असते. एक्सच्या निवडीमुळे ‘स’ चा उच्चार न होता डायरेक्ट एक्सचा स्पष्टपणे, निर्बंधासाठी सुस्पष्ट किंवा प्रतीकात्मक अर्थ होत होता. म्हणून हा शब्द निवडल्याचे तरी ऐकिवात आहे.

रॉबर्ट डी नीरोचा पहिला चित्रपट, ‘ब्रायन डी पाल्मा’ज ग्रीटिंग्ज’ हा एक्स रेटिंग असणारा पहिला चित्रपट होता.

१९७० च्या दशकात, सर्वच अडल्ट चित्रपट उद्योगाने एक्स-रेटिंग स्वीकारली. उत्पादकांनी विशेषत: वाईल्ड आणि सेक्सी मूव्हीजच्या मार्केटिंगसाठी ट्रिपल X चा वापर केला. त्याचबरोबर ट्रिपल एक्स ची फक्त जाहिरातच केली नाही तर इतर उत्पादने आणि सेवा (उदा. स्ट्रिप क्लब, मासिके) अश्लील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवांसाठीही या शब्दाचा वापर करण्यात आला.

 ही पद्धत १९९० च्या दशकात ऑनलाईन पोर्नोग्राफी येईपर्यंत अगदी तेजीत चालली.

२०१० मध्ये, इंटरनेट कोऑपरेशन फॉर असाईंग नेम्स अँड नंबर्स (ICANN) ने XXX  ला टॉप लेव्हलचा डोमेन तयार करायला अधिकृतरीत्या परमिशन दिली. हे डोमेन अश्लील वेबसाइट्सद्वारे (. कॉम किंवा . नेट च्या जागी) वापरले गेले.

जेणेकरून भिडू लोकांना पॉर्न साईट्स शोधायला कष्ट पडणार नाहीत. म्हणजे जर तुम्ही गूगलवर किवर्डस टाकले तर २ मिनिटांत भसाभस साईट्स ओपन होतात. म्हणजे हे कस झालं जे बघायचं आहे ते मिळालं. वेळ वाचला, नको असलेला कंटेंट गाळला जाऊन हवं ते उपलब्ध झालं.

थोडक्यात फिल्टर आउट करणं अगदी सोप्प झालं. 

कोणासाठी असतंय XXX?
प्रिंट किंवा डिजिटल कंटेंटमध्ये सेक्स हा शब्द सेन्सॉर करण्यासाठी XXX चा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे जेथे हा शब्द इनॅप्रोप्रिएट आहे तिथं हा शब्द वापरला जातो. काही उत्पादनांचे, सेवा किंवा वस्तूच्या सेक्शुअल स्वरूपाकडे लक्ष वेधण्यासाठी XXX वापर देखील उलटपक्षी केला जाऊ शकतो. बोलताना सेक्स बोलण्याऐवजी, लोक सहसा ट्रिपल एक्स हा शब्द वापरतात. ते जरा जास्त सोप्प पडत.

(उदा. ट्रिपल एक्स व्हिडिओ)

आता 2000 च्या अ‍ॅक्शन-फिल्म फ्रॅंचायझी XXX मध्ये, विन डीझल झेंडर केजच्या भूमिकेत होता. यातल्या एक्स’ने देखील सेक्सशी अत्यंत जवळीक साधली आणि भाबडी लोक भुलून पिक्चर बघायला गेलीत.

आता ही झाली X ची गोष्ट..पण भारतात एक्सचा वापर तुमची साईज रिकमेण्ड करण्यासाठी पण केला जातो. जसं कि तीनवेळा एक्स आला तर तो ट्रिपल एक्सेल म्हणजे मोठा शर्ट वैगरे असा होतो. तर १९ व्या शतकात, ट्रिपल एक्सचा अर्थ अतिशय स्ट्रॉंग माल्ट दारू असा व्हायचा.

म्हणजे योगायोग बघा हं,

दुनिया में बस दो ही चीजे बिकती है एक दारू और दुसरी गंदी बात

आणि विशेष म्हणजे दोन्ही पण गोष्टी XXX मध्ये बसतात. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.