ब्राह्मणांवर टिका केली म्हणून रयत शिक्षण संस्थेच अनुदान बंद करण्यात आलं होतं..?
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणारी रयत शिक्षण संस्था आपल्याला माहितीच आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीत या संस्थेचा मोठा वाटा आहे. रयत ज्या जडण- घडणीसाठी अनेक नेते अविरतपणे झगडले आहेत.
रात्रीचा दिवस करून हि संस्था उभी करण्यात आली आहे.
रयत हि शिक्षण सम्राटांची नव्हे तर एका समाजसुधारकाची संस्था होती. गरिबांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी विविध माध्यमातून रयत तेव्हा पैसे उभे करत असे, देणगीच्या माध्यमातून हा प्रवास चालू होता. त्यातूनच महारष्ट्रातील अनेक नामवंत घडले. खरे तर महाराष्ट्रातील राजकारण्यांची, लेखकांची, कलाकरांची, विचारवंतांची एक पिढी याच संस्थेने घडवली आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी चालू केलेल्या जैन वसतिगृहाचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी होते. त्या काळात शाहू महाराजांचे निकटचे सहकारी ना. भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात महात्मा ज्योतीराव फुले यांच्या मुळच्या सत्यशोधक चळवळीचे पुनर्जीवन करून, राजश्री शाहू सत्यशोधक चळवळीची स्थापना केली.
या चळवळीचे एक कट्टर आणि जहाल कार्यकर्ते म्हणून कर्मवीरांची ओळख होती. कर्मवीरांचा सत्यशोधकी जलसा देखील होता. याद्वारे ते सत्यशोधक विचाराचा प्रसार आणि प्रचार करत होते.
शाहू महाराजांच्या नंतर मात्र हि चळवळ थंड झाली होती.
त्यातच सत्यशोधक चळवळीतील जेधे-जवळकर यांसारखे मातब्बर लोक गांधीजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले होते. त्यांच्या बरोबर कर्मवीर अण्णांनी देखील स्वतःला या कार्यात झोकून दिले होते.
कर्मवीर हे प्रचंड जहाल आणि स्पष्ट मत मांडणारे वक्ते होते. त्यांनी कधीच कुणाचे दडपण अथवा भीती न बाळगता आपल्या भाषणातून वेळोवेळी अनेकांवर टीका केली आहे.
असाच एक प्रसंग.
ज्या भाषणानंतर थेट त्यांच्या रयत शिक्षण संस्थेचे अनुदानच बंद करण्यात आले होते, आणि फुलणारी रयत संस्था अक्षरश: मोडकळीस येते कि काय अशी भीती वाटत होती.
स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणा स्थान असणाऱ्या महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने हत्या केली. त्यानंतर महाराष्ट्रभर ब्राह्मण समाजाच्या विरोधाची लाट पसरली. अनेक ठिकाणी ब्राह्मण समाजावर हल्ले करण्यात येते होते. या सगळ्या परिस्थितीत पुण्यातील ब्राह्मण समाज प्रचंड घाबरला होता.
भयभीत झालेल्या या समाजाला आधार देण्यासाठी तेव्हाच्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी शनिवार वाड्यात एका सभा घेतली.
या सभेत बोलतांना खेर म्हणाले,
“पुण्यातीलच नव्हे तर देशातील सगळ्या ब्राह्मण समाजाला असे आश्वासन देतो की, हा बाळासाहेब खेर अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत ब्राह्मणांचे बहुजन समाजातील गुंडांपासून रक्षण करेन”
त्यांनी केलेल्या या विधानानंतर प्रचंड गोंधळ उडाला, बहुजन समाजात या त्यांच्या विधानाबाबत असंतोष निर्माण होत होता. अशातच गांधीजींच्या हत्येच्या निषेधार्थ अनेक निषेध सभा संपूर्ण देशात सुरु होत्या. अशाच एका सभेत कर्मवीर अण्णा देखील उपस्थित होते.
प्रचंड स्पष्टवक्ते असणाऱ्या कर्मवीरांनी त्या सभेत त्यांच्या जहाल भाषेत बाळासाहेब खेर यांचा सणसणीत समाचार घेतला,
कर्मवीरांच्या या भाषणानंतर मुख्यमंत्री खेर शांत बसतील हे शक्यच नव्हते. आपल्यावर करण्यात आलेली ही टिका म्हणजे संपूर्ण ब्राह्मण समाजावर करण्यात आलेलीच टिका आहे अस त्यांनी मान्य करुन घेतलं. त्यांना कर्मवीरांनी घेतलेल्या समाचाराचा प्रचंड राग आला. याचे उत्तर भाषणातून किंवा कुठले विधान करून दिले गेले नाही तर खेर यांनी थेट कृतीतून उत्तर दिले.
खरे यांनी त्यानंतर रयत शिक्षण संस्थेला मिळणारे शासकीय अनुदानच बंद केले.
खरे यांचे हे कृत्य खरे पहिले तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीला थांबवण्यास कारणीभूत ठरले असते.
आता रयत च्या एकंदरीत शिक्षण वाटचालीला खीळ बसली होती. मास्तरांना पगार कुठून देणार? पगार नाही दिले आणि शिकवणारे मास्तर सुडून गेले तर काय? यातून सहाजिकच रयत ची आर्थिक कोंडी झाली होती.
पण कर्मवीर देखील स्वाभिमानी होते त्यांनी ना माफी मागितली ना अनुदानासाठी विनंती केली. आपल्या असंख्य सहकार्यांच्या ताकदीने ते रयत चा गाढा ओढत होते.
हि गोष्ट थोड्याच दिवसात खराटा घेऊन देशाला स्वच्छतेचा विचार देणाऱ्या गाडगे महाराजांच्या कानावर पडली.
गाडगे महाराज आणि खेर यांचा चांगला परिचय होता. खेर गाडगे महाराजांचे भक्त होते. खेर यांनी साधारण गाडगे बाबांची सगळी न्यायालयीन कामे पहिली होती. तितकेच चांगले संबंध गाडगे बाबांचे रयत संस्थेशी आणि कर्मवीरांशी देखील होते. एवढेच नव्हे ते रयतच्या शैक्षणिक प्रचाराचे महत्वाचे काम आपल्या कीर्तनातून राष्ट्रसंत गाडगे बाबा करत होते. त्यामुळे त्यांना देखील खेर यांनी अनुदान बंद केल्याचे अजिबात पटले नाही.
गोष्ट थोड्याच दिवसात खराटा घेऊन देशाला स्वच्छतेचा विचार देणाऱ्या गाडगे महाराजांच्या कानावर पडली. गाडगे महाराज आणि खेर यांचा चांगला परिचय होता. खेर गाडगे महाराजांचे भक्त होते. खेर यांनी साधारण गाडगे बाबांची सगळी न्यायालयीन कामे पहिली होती.
तितकेच चांगले संबंध गाडगे बाबांचे रयत संस्थेशी आणि कर्मवीरांशी देखील होते. एवढेच नव्हे ते रयतच्या शैक्षणिक प्रचाराचे महत्वाचे काम आपल्या कीर्तनातून राष्ट्रसंत गाडगे बाबा करत होते. त्यामुळे त्यांना देखील खेर यांनी अनुदान बंद केल्याचे अजिबात पटले नव्हते.
अखेर गाडगे बाबांनी खेर कुठे आहेत याचा शोध घेतला. तेव्हा खेर पुण्यात होते. हे कळताच बाबा पुण्याला गेले. खेर यांच्या भेटीस ते गेले, तातडीने उठून हात जोडीत खेर बोलले,
“कशासाठी येण केलं बाबा? मला निरोप धडायचा होता, मी आलो असतो”
बाबा म्हणाले,
“आपल्याकडे एक लहानस काम निगाल”
अज्ञा करा करून टाकता येईल, असे खेर म्हणताच बाबा म्हणाले,
“असं पाहेजा, हे लाखो गोरगरीब खेड्यापाड्यांतून पसरले. त्यांच्या पोराबाळांची शिक्षणाची वेवस्था कोणी करीत नाही. त्याहिची दुर्दशा काय सांगाव? काला अक्षर भैसबराबर! पांडव किती म्हणून पुसा; तोंडन सांगितल चार, बोट दाखवतील तीन, डोळा मिचकवतील एक! असा सगळा आनंद आहे.
आमचे भाऊराव पाटील, त्याहिच्या मनात द्या उपजली, त्याहिन शाळा काढल्या, कॉलेज काहाडली, बोर्डिंग काहाडली, हजारो मूळ तिथ शिकून राहिले. सरकारन त्याहिची मदत बंद केली.
त्यांच्या पाठीवर मारा पोटावर मारू नका. बाबांच्या या बोलण्यानंतर मुख्यमंत्री खेर यांना आपली चूक लक्षात आली व त्यांनी “रयत शिक्षण संस्थेचे” शासकीय अनुदान पुन्हा सुरु केले.
हे ही वाचा.
- त्या गर्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जमिनीवर बसून गाडगेमहाराजांच किर्तन ऐकत होते.
- कर्मवीरांच्या पठ्ठ्याला गांधीजी म्हणाले, बोलणं खरं केलंस तर दोन्ही हातानी आशीर्वाद देईन.
- ते गांधींना म्हणाले, महाराजसे मैंने पैसा नहिं लिया, लेकिन उनकां बडा दिल लियां हैं;
खूप भारी वाटत पोस्ट वाचायला मी नेहमी बोल भिडू website ला भेट देत असतो.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल मला पूर्ण आदर व कृतज्ञता आहे
पण मला वाटते एकट्या गोडसे यांनी गांधी यांना मारले म्हणून सर्व ब्राह्मण समाजाला दोष देणं हे कधीही चूकीचे च आहे