जग्गू दादा म्हणाला हे काम तर फक्त गडकरीच करू शकतात

राजकीय जीवनात वावरताना प्रॅक्टीकल विचार करुन त्याला कृतीची पुरक जोड देणारी जी काही मोजकी नेतेमंडळी आहेत, त्यात नितीन गडकरींचा अव्वल क्रमांक लागतो. आजही मोदी सरकारमधल्या सगळ्यात कार्यक्षम नेत्यांमध्ये गडकरींचा गणले जातात. त्यांच्या या धडाकेबाज कामाची सुरवात झाली होती महाराष्ट्रातूनच.

नितीन गडकरी हे शिवसेना-भाजप युती सरकारच्या १९९५ ते १९९९ या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नितीन गडकरी यांनी मुंबईत सर्वाधिक उड्डाणपूल बांधण्याची कामगिरी करुन दाखविली. 

त्यामुळे अजूनही राजकीय वर्तुळात अनेकजण त्यांचा उल्लेख ‘पुलकरी’ म्हणून करतात.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक होते. नितीन गडकरी यांच्यासारखा एखादा नेता शिवसेनेतही असायला हवा होता, असे उद्गार बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते.

मात्र फक्त फक्त राजकीय नेतेच गडकरींच्या कामाचे फॅन्स आहेत असं नाही.

तर ज्यांची लाखात फॅन फॉलोइंग असते ते अभिनेतेही गडकरींच्या कामाचे जबरदस्त चाहते आहेत. आणि असाच एक किस्सा गडकरींनी सांगितलं ज्यामध्ये बॉलीवूडचा भिडू जॅकी श्रॉफ आपलं काम फक्त गडकरीच करतील या आशेने त्यांच्याकडे आला होता.

सध्या केंद्रता रस्ते वाहतूक मंत्री असलेले गडकरी एका कार्यक्रमात सांगत होते “मी १८ वर्षे मुंबईत राहिलो… पण आता मी मुंबईला तेवढं जात नाही. मी वरळी-वांद्रे सी लिंक प्रकल्प तयार केला. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे बांधला. आता मी त्या कामांना विसरलो आहे. पण जेव्हाही मी विमानात जातो तेव्हा काही लोकांना भेटतो आणि म्हणतो की हे बनवा, ते बनवा.तेव्हा मला त्यांना सांगवं लागतं की आता मी मुंबईत नाहीये.”

त्यांना एकदा अशीच रिक्वेस्ट केली OG भिडू आणि आपल्या सगळ्यांचा आवडता जॅकीदादा म्हणजेच जॅकी श्रॉफ याने.

गडकरी सांगत होते ”मी विमानाने येत होतो. तेव्हा जॅकी श्रॉफ माझ्याकडे आला आणि मला सांगू लागला, नितीनजी, पहा, या दक्षिण मुंबईला थेट मुंबई-पुणे हायवेशी जोडा. ये व्हीटी से पब्लिक डायरेक्ट उधर जा सकेंगी ”. जॅकी श्रॉफची ही बंबैय्या लिंगो ऐकून गडकरही थोडे हसले व पुढे म्हणाले की, आज असा एक पूल बांधला जात आहे. 

त्यानंतर जॅकी श्रॉफच्या मागणीवर केंद्रीय मंत्री म्हणाले- ”जॅकी जी, तुम्हाला माहित नसेल पण न, आज मी मुंबईत नाही. राज्यात आमची सत्ता पण नाहीये आणि मी दिल्लीला गेलो आहे. मग मी हे काम कसं करणार?”

यावर जॅकीदादा म्हणाले –” तुम्हाला काय वाटतं, मला माहित नाही? मला सर्व काही माहित आहे, पण माझा एक विश्वास आहे की ज्या दिवशी तुम्ही ते काम करायला घ्याल, तेव्हाच ते पूर्ण होईल, म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे”
या प्रसंगावर गडकरी सांगतात लोकांचा हा जो विश्वास आहे, हीच राजकारणातील सर्वात मोठी गोष्ट आहे. बहुतेक हाच विश्वास असेल ज्यामुळे अजातशत्रू म्हणून ओळखले जाणारे गडकरी एवढे लोकप्रिय आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.