कॉंग्रेसच्या मनमोहनसिंग यांनी देखील “एक नोटबंदी” केली होती ती पण लपवून…
आजच्या दिवशी नोटबंदी झालेली. अशीच एक नोटबंदी इतिहासात पण झालेली. ती पण मनमोहनसिंग यांनी केलेली. आणि ती पण लपवून. चोरून चोरून ही नोट पाठीमागे घेतली, अन् या कानाचं त्या कानाला कळून दिलं नाही. आत्ता तुम्ही म्हणालं हे तुम्हाला कसं माहिती तर
भिडूंनो असल्या आतल्या गोष्टी सांगण्यासाठीच तर आम्ही इथे बसलोय. (सरकार कोणाचं येणार एवढं सोडून आम्ही सगळं सांगू शकतोय बघा)
तर किस्सा असा की,
१९७५ साली RBI चे गव्हर्नर होते, श्री के.आर.पुरी त्याच्या कार्यकाळात पन्नास रुपयेची एक नोट चलनात आली होती. या नोटेच्या पाठिमागे आपल्या संसदेच चित्र होतं. इथपर्यन्त सगळं ठिक होतं. नोट चलनात आली आणि लोक ते वापरत देखील होते. त्यानंतर RBI चे गव्हर्नर झाले ते नरसिंहन त्यानंतर तिसरे गव्हर्नर आले आय.जी. पटेल इथपर्यन्त देखील सगळं सुखासुखी चालू होतं.
पण पुढचे गव्हर्नर त्यातल्या त्यात वरचढ होते. त्यांच नाव मनमोहन सिंग.
मनमोहन सिंग यांनी RBI चे गव्हर्नरच्या गव्हर्नर पदाचा कारभार स्वीकारला तो सप्टेंबर १९८२ साली.
तेव्हा नव्याने सह्या मारत असताना एक गोष्ट लक्षात आली. चलनात असलेली जी पन्नास रुपयांची नोट होती त्याच्या पाठीमागे संसदेच चित्र होतं. त्या संसदेच्या चित्रावर मध्यभागी भारताचा झेंडा असायला हवा होता. तिथ फक्त आणि फक्त काठी होती.
म्हणजे संसदेवर झेंड्याच चित्रच नव्हतं तर फक्त काठी होती.
मनमोहन सिंग यांनी मग चलनावर काठी हाणली. कुणालाही न कळता या नोटा हळुहळु जमा करण्यात आल्या व त्याठिकाणी नवीन नोटा आणण्यात आल्या. एक एक करत सगळ्या नोटा इतिहास जमा झाल्या. आत्ता या घोडचूकीची तेव्हा चर्चा झाली नाही पण नोट दुर्मिळ झाली. मग बातम्या झाल्या.
आणि या नोटेला एतिहासिक महत्व मिळालं इतकं की आज ही नोट कुणाकडे असेल तर त्याला सहज पन्नास हजार ते लाखभर रुपयांमध्ये आत्ता ती नोट ब्लॅक मार्केटमध्ये किंमत मिळून जाते.
बघा हि अशी नोटबंदी पाहीजे. पन्नास रुपयांच्या नोटेला लाखाची किंमत मिळवून देणारी.
हे ही वाचा.
- कोरियातून आलेला काळा पैसा किस्सा नोटबंदीचा
- कधीकाळी भारताचा रुपया अरब देशाचं अधिकृत चलन होतं.
- हिशोब लागला, इंग्रज भारतातून ३,२१,७६,१२,५०,००,००,०००.५० रुपये घेवून गेलेले !