पद्मभूषण जाहीर झाला तेव्हा विखे पाटील शेतात काम करत होते

बाळासाहेब विखे पाटील एक ललामभूत व्यक्तिमत्त्व. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील तज्ज्ञ म्हणून त्यांची  ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात होती. आपल्या आयुष्यातला सगळ्यात जास्त काळ त्यांनी समाजकारणात आणि राजकारणात घालवला. अहमहनगरमधल्या कोपरगाव भागातले असलेले बाळासाहेब पदवीधर नसतील. पण त्यांच्या अंगी असलेली कल्पकता, जबर इच्छाशक्ती, नावीन्याची आस आणि प्रचंड आत्मविश्वास या जोरावर ते कुठच्या कुठे पोहोचले.

एवढं सगळं करून या माणसातील माणूसपण कुठं हरवलं नाही. असा हा मुलखावेगळाच माणूस. निखळ गुणवत्ता म्हणा वा ग्रामीण शहाणपण, या जोरावर अटकेपार झेंडा त्यांनी लावला. केंद्रात मंत्रीपदही भूषविलं. केवळ सतरा देशांचा दौरा केला नाही तर संयुक्त राष्ट्रसंघात प्रवरेचा झेंडाही रोवला. पण तरीही आपली साधी राहणी आणि आपल्या मातीशी जोडलेली नाळ त्यांची कायम तशीच राहिली. 

असाच एक किस्सा त्यांच्या पदमभूषण पुरस्कारा वेळचा..

२०१० सालची गोष्ट. ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याबद्दल भारत सरकारला कौतुक होत. त्यामुळे प्रतिष्टीत मानल्या जाणाऱ्या पदमभूषण पुरस्कारासाठी त्यांचं नाव डिक्लेर झालेलं. आता एवढ्या उच्च दर्जाच्या पुरस्कारासाठी नाव डिक्लेर झालाय म्हंटल्यावर कौतुकसोहळा आणि मुलाखनतीसाठी फोन येणं साहजिकच होत. 

पण आपल्याला हा पुरस्कार जाहीर झालाय याची कल्पना बाळासाहेबांना अजिबात नव्हती. जेव्हा नाव जाहीर झालं त्यावेळी ते शेतात काम करत होते. आता सगळ्यांनाच माहितेय कि बाळासाहेबांच शेतीशी नातं एक वेगळ्याच लेव्हलवरच होत. आपल्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या कामातून मोकळा वेळ मिळाला कि, बाळासाहेब शेतात जायचे तिथली काम पाहायचे. त्यांना शेतीकामाची जाम आवड होती. 

असचं काहीस त्यादिवशी सुद्धा झालं. पद्मभूषण पुरस्कारासाठी नाव जाहीर झालं म्हणून एका पत्रकाराने बाळासाहेबांची प्रतिक्रिया विचारण्यासाठी त्यांना फोन केला. साहजिकच ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील तेव्हा आपल्या शेतात होते. फोनवर असणाऱ्याने शेतात कसे- काय म्हणून विचारले तर, बाळासाहेब म्हणाले, ‘पंधरा दिवस शेतावर चक्करच मारली नव्हती. भुईमुगाला थोडी अडचण झाली आहे. त्यामुळे यावे लागल..’

त्यानंतर समोरच्यानं बाळासाहेबांना म्हंटल, ‘आपल्याला पद्मभूषण किताब जाहीर झाला. त्याबद्दल आपले अभिनंदन आणि प्रतिक्रियाही हवी आहे.’ आता बाळासाहेबांना पुरस्कार जाहीर झाल्याचे तोपर्यंत त्यांना माहीत नव्हते. त्यांना त्या फोन कॉलवरचं ती बातमी मिळालेली. 

पण बाळासाहेब शेतात काम करत होते म्हंटल्यावर फोनची रेंज कमी-जास्त होती. त्यामुळे संवादात अडथळा येत होता. त्यामुळे बाळासाहेब म्हणाले, ‘शेतातून घरी पोहोचलो की तुला सविस्तर प्रतिक्रिया देतो’ त्यांनतर त्यांनी फोन ठेवला आणि लागलीच घरी गेले. 

घरी पोहचल्यानंतर बाळासाहेबांनी त्या पत्रकाराला परत कॉल केला. आणि सविस्तर प्रतिक्रिया सुद्धा दिली. त्यानंतर त्या पत्रकाराला ते म्हणाले, ‘तुझ्या फोनसाठीच घरी आलो होतो, आता पुन्हा शेतावर जातोय. 

आता बाळासाहेबांची ही गोष्ट कौतुक करण्यासारखीच आहे. कारण वेगवेगळ्या व्यापात चोवीस तास बिझी असणारे विखे पाटील घरच्या शेतीलाही एवढा वेळ देतात, हे चित्र त्यावेळच्या लोकांसाठी काही नवीन नव्हतं. पण हेच सध्याच्या राजकारण्यांसोबत कम्पेअर केलं तर नक्कीच आश्चर्य वाटण्यासारखं आहे. 

त्या पत्रकाराला सुद्धा बाळासाहेबांचं कुतूहल वाटलं. त्यानं न राहवून विचारलं बाळासाहेब एवढं सगळं कसं जमत? त्यावर बाळासाहेब म्हणाले,

‘पन्नास वर्षांच्या सार्वजनिक जीवनात ऐन धकाधकीच्या काळातही ही नाळ तुटू दिली नाही. या बारीकसारीक गोष्टीत लक्ष घालतो, त्या समजून घेतो म्हणून तर लोकांच्या दैनंदिन अडचणींवर प्रभावीपणे मार्ग काढता येतो.’ 

एवढंच नाही तर या फोन कॉलवर ‘पद्मभूषण’ किताबाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना बाळासाहेब म्हणाले. हा व्यक्तिगत माझा नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सन्मान आहे त्यामुळे मी तो शेतकऱ्यांनाच अर्पण करतो. मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सन्मान आहे. ‘ 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.