लोक त्यांना दलित नेता म्हणू लागले तेव्हा ते म्हणाले मी पहिला “काँग्रेसी” आहे

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुफडा साफ झाला होता. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला होता. लोकसभेत विरोधीपक्ष नेते पद मिळेल एवढं सुद्धा काँग्रेसचे खासदार निवडून आले नव्हते. लोकसभेत काँग्रेसचा पक्षनेता ठरवण्याची वेळ आली होती. इकडे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या डोक्यात वेगळंच सुरु होते.

दुसरीकडे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ किंवा कर्नाटचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली हे लोकसभेत काँग्रेसचे पक्षनेता होतील असे बोलले जात होते. त्यातच सोनिया गांधी यांनी घोषणा केली की, मल्लिकार्जून खर्गे हे लोकसभेत पक्षनेते होतील. त्यानंतर दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांनी खर्गे यांच्या नावाला विरोध दर्शवत राहुल गांधी यांनीच पक्षनेता व्हावे असे सांगितले. 

सगळ्यांचा विरोध असतांना सुद्धा मल्लिकार्जून खर्गे यांना पक्षनेता करण्यात आले होते. 

 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त ४४ खासदार निवडून आले होते. त्यातील ९ खासदार हे कर्नाटक राज्यातून आले होते. त्यामुळे २०१४ मध्ये पक्षनेते पदाची जबाबदारी खर्गे यांना देण्यात आली होती. 

लोकसभेतील काँग्रेसचे पक्षनेते मल्लिकार्जून खर्गेंना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर लवकरच खर्गे यांचे पुनर्वसन करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. तर दुसरीकडे पक्षाला अध्यक्ष नसल्याने काँग्रेस ज्येष्ठ काँग्रेस नेते नाराज होते. त्यात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद सारखे काँग्रेस नेते होते. G-२३ असा गट तयार झाला होता. त्यातही आझाद आघाडीवर होते. 

पुन्हा एकदा पक्षाने राज्यसभेवर पाठवावे यासाठी हे सगळे दबाव निर्माण करत असल्याची चर्चा होती. तसेच आझाद यांच्या बरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण झाला होता. या दोन्ही नेत्यांना डावलून काँग्रेसने खर्गेंना राज्यसभेची उमेदवारी दिली. एवढंच नाही तर त्यांना राज्यसभेत विरोधी पक्षनेता सुद्धा करण्यात आले. 

या दोन घटनांवरून मल्लिकार्जून खर्गेंच काँग्रेस मधील वजन समजते.           

२१ जुलै १९४२ मध्ये मल्लिकार्जून खर्गेंचा जन्म कर्नाटकातील बिदर येथे झाला. तर त्यांचे शिक्षण हे गुलबर्गा येथे झाले. इथेच त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी दशेपासून ते राजकारणात क्टिव्ह होते. १९६९ मध्ये त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. राजकारणातील जाण आणि उत्साह पाहून त्यांना पहिल्यांदा काँग्रेसचे गुलबर्गा शहराध्यक्ष म्हणून निवड केली होती.

तसेच १९७२ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट देण्यात आले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे पलटून पहिले नाही. मल्लिकार्जून खर्गें १९७२ ते २००८ दरम्यान सलग ९ वेळा गुरमितकाल मतदारसंघातून निवडून आले.  याकाळात त्यांनी शिक्षण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री, गृह मंत्री, जलसंधारण, परिवहन मंत्री म्हणून काम पाहिलं. 

तसेच खर्गेंनी १९९६ ते ९९ दरम्यान कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा काम पाहिलं. २००५ ते २००८ या काळात ते कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर खर्गेंनी पक्षाचा आदेश मान्य करून  २००९ ची लोकसभा निवडणूक लढवली. आणि ते जिंकून सुद्धा आले. युपीए २ च्या सरकार मध्ये खर्गेंना रेल्वे मंत्रालय, श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा पदभार देण्यात आला होता.

पुन्हा पुन्हा दलित नेता म्हणू नका मी पहिला “काँग्रेसी” आहे असे ठणकावून सांगितले होते    

निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्याबरोबर कर्नाटक मध्ये खर्गे यांची दलित नेते म्हणून सुद्धा ओळख आहे. जगजीवन राम यांच्या नंतर काँग्रेस मध्ये दलित नेत्याची जागा भरून काढण्याचे काम खर्गे यांनी केल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीवेळी खर्गे यांचा दलित नेता म्हणून उल्लेख करण्यात येत होता. त्यावेळी त्यांनी याला विरोध करत सांगितले की,

मला पुन्हा पुन्हा दलित नेता म्हणून नका मी काँग्रेसवासी आहे. २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात म्हणाले होते की, मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा विचार होत असेल तर फक्त त्याच्या अनुभवावरून व्हावा. ओळखीमुळे नको

मी दलित तर आहे पण खरं म्हणजे १९७२ पासून काँग्रेस पक्षात आहे – माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच काँग्रेस मधून झाली आहे.  माझ्याकडे एकही निवडणूक न हरण्याचा विक्रम आहे. मी अनेक मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली मंत्री म्हणून काम केले आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

एवढी मोठी राजकीय कार्यकिर्द असतांना सुद्धा मी दलित नेता म्हणून मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असल्याचे बोलले जाते. जर हायकामांडने मुख्यमंत्री पदासाठी माझ्या नावाचा विचार केला तर तो अनुभव बघून करावा असं खर्गे म्हणाले होते.   

९ वेळा आमदार आणि २ वेळा खासदार राहिलेल्या मल्लिकार्जून खर्गेंना १९९९ आणि २००४ मध्ये दोन वेळा मुख्यमंत्री पदाची संधी आली होती. मात्र शेवटच्या वेळी त्यांना डावलण्यात आले. मात्र त्यांनी कधीही नाराजी बोलून दाखवली नाही. पक्ष देईल ती काम करत गेले. गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहणारे नेते म्हणून ओळखलं जातं. त्यांनी कधीही पक्षाविषयी निष्ठा ढळू दिली नाही.

२०१८ मध्ये त्यांना महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस म्हणून नेमण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकार मध्ये काँग्रेसने सामील होण्यासंदर्भात खर्गेंची भूमिका महत्वाची समजली जाते. मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी घराकडून देण्यात आलं होतं. यामागचं एक कारण म्हणजे ५० वर्षांची त्यांची पक्षनिष्ठा. अपेक्षे प्रमाणे मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झाले आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.