धबधब्याखाली अंघोळ करुन ८० च्या पिढीला वयात आणणारी मंदाकिनी सध्या काय करते..?

आम्ही कार्यकर्ते मध्यंतरी उंडगायला गेलो होतो, साध्या भाषेत रोडट्रिपला. जाताजात पोरांना दिसला धबधबा, भिजणं वैगेरे झालं. डोकं कोरडं करता करता धबधब्याची मापं काढली जाऊ लागली. हा कमी उंचीचाय, तो मोठ्ठाय, आमच्याकडचा कसला वांड ए, तुमच्या दुष्काळी भागात कधी धबधबा वाहतोय होय? असं बरंच काही.

एक शहाण्या डोक्याचं पोरगं ग्यान देत म्हणलं, ‘जगातला सगळ्यात भारी धबधबा तोच ज्यात मंदाकिनी भिजली. आज जगातले धबधबे आपल्याला मंदाकिनीमुळं भारी वाटतात…’

शंभर टक्के खरंय. धबधब्यामुळं मंदाकिनी आठवली आणि प्रश्न पडला ती सध्या काय करते..? 

१९८५ चं साल होतं. याचवर्षी ‘राम तेरी गंगा मैली’ हा सिनेमा रिलीज झाला अन त्यातल्या एका सीनमुळे सगळी इंडस्ट्रीच हादरली…

तो सीन म्हणजे, घाऱ्या डोळ्याची मंदाकिनी पांढऱ्या पातळ साडीत धबधब्याखाली अंघोळ करते…बस्स याच अदाकारीने मंदाकिनी प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे.

मंदाकिनीचा हा पहिलाच सिनेमा होता. थोडक्यात असा बोल्ड सीन देणारी ती पहिलीच बॉलिवूडची अभिनेत्री असावी. राजीव कपूर आणि मंदाकिनी या जोडीला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. सिनेमा चांगलाच चालला होता.

त्याकाळी गाजलेली मंदाकिनी दोनच गोष्टीमुळे अनेकांना लक्षात राहते…

एक तर तिचा धबधब्याखालचा सीन नाही तर मग दाऊदसोबतचा तिचा क्रिकेट स्टेडियममधला फोटो…

मंदाकिनीचं दुसरं नाव यास्मिन जोसेफ. ती मूळची मेरठची आहे. ‘राम तेरी गंगा मैली’मुळे बॉलिवूड गाजवणाऱ्या मंदाकिनीला त्यानंतर पिक्चर्सची ऑफर आली. डान्स-डान्स, लोहा, जाल, शेषनाग आणि तेज़ाब सारख्या अनेक सिनेमात तिने कामही केलं….सगळं सुरळीत चालू होतं तितक्यात तिचा डॉन दाऊदसोबतचा एक फोटो प्रसिद्ध झाला.. 

Trending news: Dawood Ibrahim came as a canker in Mandakini's life, had to leave Bollywood 26 years ago due to don - Hindustan News Hub

आणि या एका फोटोमुळे तिचं आयुष्यच बदलून गेलं. 

मंदाकिनी ही दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड आहे, दाऊदमुळेच मंदाकिनीचं करिअर सेट झालं, दाऊदच्या इच्छेनुसारच मंदाकिनीला अनेक चित्रपटांमध्ये कास्ट करण्यात आले वैगेरे अशी कुजबुज चालू झाली. तिची बदनामी सुरु झाली अन तिला कामंही मिळणं बंद झालं.

पण तेव्हा सुरु असलेल्या अफवांवर मंदाकिनी आजही असंच उत्तर देते की, “आम्ही फक्त चांगले मित्र होतो बाकी काहीही नाही”. 

त्यानंतर तिला करिअरमध्ये अपेक्षित असं यश मिळत नव्हतं. मग मंदाकिनी गायला लागली. नो व्हेकन्सी आणि शंबाला असे हे दोन अल्बम तिनं रिलीज केले. मंदाकिनी शेवटची गोविंदा-आदित्य पांचोलीच्या १९९६ मध्ये आलेल्या जोरदार चित्रपटात दिसली आणि मग तिने बॉलिवूड सोडलं.

आणि एक मोठाबॉम्ब फोडला तो म्हणजे, १९७० – ८० च्या दशकात मर्फी रेडिओच्या छापील जाहिरातीमध्ये मर्फी मुलगा दिसायचा. तो नंतर बौद्ध भिक्षू बनला. त्याच्याचसोबत तिनं लग्न केलं अन संसार थाटला. 

दाऊदसोबत फोटो प्रसिद्ध झाला तेवढा धक्का तिच्या चाहत्यांना बसला नसावा तेवढा तिच्या लग्नामुळे बसला होता.

where is actress Mandakini who linked up with underworld don dawood ibrahim | अचानक कहां गायब हो गईं मंदाकिनी? कभी दाऊद इब्राहिम से इश्क के चर्चे | Hindi News,

दोघांचा सुखानं संसार चालू झाला. दोघांना दोन मुले होती. मुलगा रब्बील आणि मुलगी राब्जे. तिचं दुर्दैव असं की, २००० सालामध्ये तिचा मुलगा रब्बीलचा रोड ऍक्सीडेन्टमध्ये मृत्यू झाला. 

आता ती अन तिचा नवरा म्हणजेच डॉक्टर साहेब मुंबईत तिबेटी हर्बल सेंटर चालवतात. मंदाकिनी त्याच सेंटरमध्ये योगा क्लासेस चालवते, त्यात ती तिबेट योगा शिकवते.

ती बॉलीवूडमध्ये आता परत येणार..?

आज ती ५८ वर्षांची आहे आणि सोशल मीडियावर ती ऍक्टिव्ह असते. तिच्या मॅनेजरने अलीकडेच ETimes या मीडिया साईटला सांगितल्यानुसार, मंदाकिनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे तसेच ती सध्या स्क्रिप्टवर काम करत आहे. मंदाकिनी वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास तयार आहे, मात्र तिच्या म्हणण्यानुसार तिला मुख्य भूमिकेत यायचं आहे….

तो मंदाकिनीके फॅन लोग…. दिल थाम के बैठो…कधीकाळी अक्ख्या बॉलिवूडला अन चाहत्यांना वेड लावणारी मंदाकिनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारे… 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.