हॉंगकॉंगला टूरला गेले आणि येताना काटा लगा घेऊन आले

साल होत २००२. दूरदर्शनचा जमाना माग पडला होता. घरोघरी केबल पोहचल होतं. नव्वदच्या दशकात भारतात जन्मलेलं जागतिकीकरण हळूच वयात येत होत. रात्री घरी सगळे झोपल्यावर फॅशन टीव्ही बघत होतं. जगातली फॅशनचे नखरे बघूनचं हलक होत होतं.

इकडे बॉलीवूडला जाणवल की आपल्याला पण बदलायला लागेल. पण सेन्सॉरमुळे धाडस होत नव्हत. पण एक इंडस्ट्री होती त्यांनी वेगवेगळे बोल्ड प्रयोग चालवले होते. म्युजिक व्हिडीओ अल्बम इंडस्ट्री.  

अलिशा चिनॉयच्या मेड इन इंडिया सुपरहिट झाल्यावर या इंडस्ट्रीने चांगलेच मूळ धरले. मुंबईसारख्या शहरात पब आणि डिस्कोचे पेव फुटले होते. तिथे ही गाणी वाजत होती. आमच्या सारख्या गावाकडच्या पोरांनी डिस्को म्हणजे काय हे कधी आतून बघितलं नव्हत पण या गाण्यांमुळे त्यांना जनरल नॉलेज मिळालं.

त्याकाळी विनय सप्रू आणि राधिका राव ही जोडगोळी म्युजिक अल्बम बनवायची. फाल्गुनी पाठकचे फेमस मैने पायल है छनकायी, याद पिया की आने लगी, वगैरे गाणी त्यांनी बनवली होती. त्यांच्या करीयरची सुरवातच नुसरत फतेह अली खान यांच्या कितना सोना तेनु रब ने बनाया पासून झाली होती.

झटपट गाणी बनवायची झटपट विकायची स्पर्धा सुरु होती. प्रत्येक वेळी नवीन गाणी कुठून आणायची? आणि आणली तरी ती हमखास हिट होतील याची शाश्वती कुठे होती. तेव्हा एक नवीन फॉर्म्युला आला. रिमिक्स !! त्याचा फॉर्म्युला पण सोपा होता.

जुनी साठच्या दशकातली गाणी घ्यायची, त्याचा टेम्पो वाढवायचा, त्यात मध्ये मध्ये काही डीजे वाली योयो इंग्लिश शब्द घालायची, त्या गाण्यावर छोट्या कपड्यातल्या मॉडेल मुली नाचवायच्या आणि बनले रिमिक्स सॉंग !!

बॉम्बे व्हायकिंग वगैरे सिंगर यामुळे फेमस झाले. विनय सप्रू आणि राधीका रावने सुद्धा या फॉर्म्युलावर गाणी बनवायला सुरवात केली. त्यांनी बनवलेले डीजे अकिलचे “नही नही अभी नही ” चांगलेच हिट झाले, यात आयेशा टाकिया होती.

c glam anchor 30

एकदा विनय आणि राधिका हॉंगकॉंगला टूर साठी गेले होते. तेव्हा म्हणे विनयच्या डोक्यात चालू होते की काही तरी नवीन केले पाहिजेलाय. हॉंगकॉंगमध्ये पार्टीत डान्स करत असताना त्याच्या लक्षात आले की अजून आपल्या भारतात आपण मुलगी डीजे असलेलं गाण बनवलेले नाही. स्त्री मुक्तीचा उदात्त विचार घेऊनच तो भारतात आला. त्याने आपली आयडिया राधिकाला सांगितली. दोघांच्या डोक्यात गाण्याने आकार घेतला.

जुन्या समाधी सिनेमामधलं लता मंगेशकर यांचं बंगले के पीछे हे गाण निवडण्यात आलं. अल्बमच्या मेन हिरोईनसाठी एक फ्रेश चेहरा त्यांना हवा होता. एकदा मुंबईतल्या रस्त्यावर एक सुंदर मुलगी चालत निघालेली विनयला दिसली. त्याने तिचा पाठलाग केला. मग त्याला कळाले ती सरदार पटेल इंजिनियरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनियरिंग शिकत आहे. त्यांनी खूप मागे लागून तिला रोल साठी तयार केलं.

तीच नाव होत शेफाली झरीवाला. अल्बमचं नाव ठरलं बेबी डॉल!!

गाण्याची सुरवातच  बॉम्ब टाकून केलेली  होती. एक मुलगी (म्हणजेच शेफाली झरीवाला ओ) एका डिस्कोच्या बाहेर पोर्न मॅगझिन वाचत उभी आहे. त्यावर एका उघडबंबू बाप्याचं चित्र आहे. खर म्हणजे भारतात तेव्हा पोर्न म्हणजे एसटी स्टँडवर मिळणारे हैदोस सारखे मासिक हेच होते. त्यातपण फक्त मुलीच असायच्या. एखादी मुलगी पोर्न म्हणून मुलांचे नग्न फोटो पाहतेय हे कन्सेप्टचं आम्हाला समजण्याच्या पुढे होती.

ते मॅगझिन बघून म्हणे त्या मुलीला कसला तरी काटा लागतो.

तिचा बॉयफ्रेंड ते मासिक हातातुन काढून फेकून देतो.(बघा बघा आपल्या इथे स्त्रीच्या भावना कशा दडपुन टाकल्या जातात.) तिथे आत लेडी डीजे डॉल गाण्याची सुरवात करत असते. इकडे माजावर आलेली मादा नराने केलेल्या अन्यायाने पेटून उठते. आत डिस्कोमध्ये आत जाण्यासाठी लागणारा शिक्का देखील ती छातीवर मारून घेते.

Screen Shot 2014 05 14 at 10.08.57 PM

नर रुसून एका कोपऱ्यात जाऊन बसतो. मग मादा त्याला मनवन्यासाठी सूचक हातवारे करत नाचू लागते.

तिचा पोशाख सुद्धा वैशिष्ट्य पूर्ण होता. नेहमी अशा गाण्यात मॉडेल छोटे छोटे कपडे घालून असायच्या. पण या गाण्याची हिरोईन व्यवस्थित जीन्स टॉपमध्ये होती. पण तरी या ड्रेसने कॉट्राव्हरसी झालीच. (कारण या जीन्स मधून तिची थोंग दिसत होती.) याशिवाय एका हाताला कसली तरी पट्टी चिकटवलेली असते. गाण्याच्या शेवटी कळते तिने तिथे आय लव्ह यु लिहिलेले टॅटू काढले होते. ते टॅटू बघून अखेर नर ताळ्यावर येतो. डोळ्यात पाणी आलेली ती त्याच्या बाहुपाशात पडते. ते दोघे निघून जातात. ते जात असतात तेव्हा प्रेक्षकांना दिसलं तिच्या जीन्सच्या खिशात ते मॅगझिन अजून आहे.

आज बघितलं तर लक्षात येत की एकप्रकारे स्त्रीमुक्तीचे विचार मांडणार हे गाण होतं. पण तेव्हा कोणी हे समजून घेतलंचं नाही हो.

गाण सुपरडुपर हिट झालं. सगळ्या म्युजिक चॅनलवर गाण वाजू लागलं. देशात मात्र गाण बघून गोंधळ उडाला.  लता दीदीसारख्या महान सिंगर आपल्या गाण्याची लावली गेलेली वाट पाहून कशा दुख्खी झाल्या आहेत हे चॅनलवाले सांगत होते . “देश की संस्कृती को खराब कर रहे है ये लोग. ” असं सांगत ते गाण परत परत वाजवत होते.

गाण बघितल्यावर सगळ्यात जास्त घाबरलेली आपली पालक मंडळी. वयात येणाऱ्या आमच्या सारख्या नमुन्यांना कसं अडवायचं हा प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचा होता. गाण टीव्हीवर दिसलं की बोल्टच्या ताकदीने धावत येऊन चनल बदललं जात होतं. तरी लहान थोर सगळ्याच पोरांच्या तोंडात हे गाण बसलं. युपी बिहार पासून ते दिल्ली मुंबईपर्यंत सगळ्यांना या गाण्याने काटा लावला.

गणपती मध्ये लग्नात सगळीकडे चार्टबस्टरवर हे गाण एक नंबर ला होतं. याच गाण्याने भारतात टॅटूचं कल्चर आणलं. अखेर पालकामंडळीनां आयडिया काढावी लागली. त्याकाळात त्यांनी अफवा पसरवली होती.

“त्या काटा लगा वाल्या हिरोईनने हातावर टॅटू काढला आणि त्यामुळे तिला स्कीन कॅन्सर झाला. त्यातच बिचारी मेली. “

आपल्याला तर ही अफवा खरी वाटली होती. ती नटी बरेच दिवस दिसली देखील नाही म्हणून टेन्शन पण आलेलं. अखेर सल्लू भाईच्या मुझसे शादी करोगी मध्ये बिजलीच्या रोल मध्ये ती दिसली. अक्षयकुमार बरोबर परत काटा लगा वर ती नाचत होती.

ती जिवंत होती. असल्याच अनेक अल्बम मध्ये तिने काम केलं पण तो पर्यंत जागतिकीकरण मोठ झालं होतं. थोड शहाण देखील झालेलं. रिमिक्स आणि त्यावर नाचणाऱ्या पोरी माग पडत गेल्या. विनय सप्रू, राधिका राव देखील सल्लूला घेऊन लकी नावाचा सिनेमा काढले, तो पडला मग इंडस्ट्री मध्ये तेही मागे पडले.

ती सध्या  काय करते??

मित ब्रदर्समधल्या हरमित गुलझार बरोबर तिने लग्न केले पण ते काही खूप दिवस टिकले नाही. शेफाली झरीवाला शिक्षणाने आयटी इंजिनियर आहे. पण सध्या गृहिणी आहे. झी वरच्या सुप्रसिद्ध पवित्र रिश्ता मध्ये जो अर्चूचा भाऊ झाला होता त्या पराग त्यागी बरोबर तिने दुसर लग्न केलंय. दोघेही बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्याच्याबरोबर तिने नच बलिये मध्ये एंट्री पण केली होती पण त्यात काय ती यशस्वी झाली नाही.

1513867633

अल्ट बालाजीच्या बेबी कम ना या श्रेयस तळपदेच्या एका कॉमेडी कम डबल मिनिंग जोक वाल्या वेब सिरीज मधून तिने कमबॅक केलं. पण काटा लगाची जादू तिला परत जमली नाही.

सध्या तिने बिग बॉसच्या तेराव्या सिझनमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. आता बघू तिच्या येण्याने कोणा कोणाला काटा लागतो ते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.