रामदेव असोत की बाळकृष्ण दोघांनी पण ॲलोपॅथीचे उपचार घेतलेत हा इतिहास आहे

‘अ‍ॅलोपॅथी एक ऐसी स्टूपीड और दिवालिया सायन्स है’

असली बेताल आणि अशास्त्रीय वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करणारे व्यापारी रामदेव बाबा हे वादात सापडले आहेत.

त्यांच्या या वक्तव्यावरुन देशातील डॉक्टरांचे सर्वात मोठी संस्था असलेल्या IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेत बाबा रामदेव वर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोबत कायदेशीर नोटीसही बजावलीय.

आरोग्य मंत्री (डॉ) हर्षवर्धन यांनी या प्रकरणी रामदेव यांना एक पत्र लिहिले. रामदेव बाबांनी आपल्या वक्तव्यातून कोरोना योद्धांचा अपमान केला आहे. यामुळे देशातील अनेकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. अस आरोग्यमंत्र्यांनी म्हणलय.

सर्वच बाजूंनी रामदेवबाबांच्या विरोधात वातावरण तयार झाले तेव्हा रामदेव बाबांनी (सॉरी, स्वामी रामदेव यांनी 2018 मध्ये स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट वरचे बाबा रामदेव हे नाव बदलून ‘स्वामी रामदेव’ असे केले होते) वक्तव्य मागे घेतले.

पतंजलीने ने हे वक्तव्य मागे घेत स्पष्टीकरण देखील दिले आहे परंतू त्याचा फारसा फरक पडणार नसल्याचे एकंदरीत वातावरणावरून दिसतयं. 

हा झाला बाबा रामदेव यांचा घटनाक्रम, आत्ता हे बाबा आज ॲलोपॅथीला २५ प्रश्न विचारत आहेत. पण विनोद असा आहे की बाबांना जेव्हा उपचारांची गरज निर्माण झाली तेव्हा मात्र त्यांनी डॉक्टरांना हे प्रश्न विचारले नाहीत.

काय म्हणता रामदेव बाबा आणि खुद्द बाळकृष्ण यांनी ॲलोपॅथीचे उपचार घेतलेत?

 रामदेव बाबा डॉक्टरांना कधी शरण गेलेत ते वाचा..

घटना क्र. 1

ही घटना आहे अण्णा हजारे आंदोलनाच्या दरम्यानची.

संपूर्ण देशभरात भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला जात होता. या आंदोलनामध्ये बाबा रामदेव देखील इंटरेस्ट घेत होते. त्या आंदोलना दरम्यान दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते.

४ जून २०११ च्या सायंकाळी तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी दावा केला कि, उपोषण संपवण्यासाठी बाबा रामदेव मान्य झाले असल्याचे पत्र सरकारला मिळाले आहे. उपोषण संपवत असल्याचा हा दावा खोटा असल्याचा आरोप स्वामी रामदेव यांनी केला.

त्या दरम्यान उपोषणाच्या ठिकाणी मध्यरात्री अचानक पोलीस दाखल झाले आणि सगळीकडे गोंधळ उडाला.

तेवढ्यात रामदेव बाबा यांनी स्टेज वरून उडी मारली. त्यावेळेस तिथे अश्रूधूर सोडण्यात आला होता. सलवार-कुर्ता घातलेले रामदेव तेथून नवी दिल्ली ला पळ काढण्यासाठी निघाले तोच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि देहाराडूनला पाठविण्यात आले. तिथेही बाबा रामदेव यांनी उपोषण सोडले नाही त्यामुळे त्यांची तब्येत बिघडत गेली. आणि मग त्यांना डेहराडूनच्या जॉलीग्रांट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. तो 10 जून चा दिवस होता. त्यांचा बीपी बिघडला, त्यात त्यांचे 5 किलो वजन ही कमी झाले होते.

त्यांच्यावर ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांनी मीडियासमोर सांगितले की,

रामदेव यांचा बीपी हाय झाला, तसेच त्यांचे वजनही घटले, अशक्तपणा वाढला. त्यांचे पॅरामीटर्स खालावले, तसेच त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आणि सलाईन मार्फत विटामिन्स पुरवले जात आहेत.

जेव्हा बॉडीमध्ये डिहायड्रेशन ची समस्या उद्भवते तेव्हा रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. तेंव्हा सलाईन हा उत्तम मार्ग आहे”.

त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थितरीत्या पार पाडल्यानंतर आर्ट ऑफ लिविंग चे श्री श्री रविशंकर त्यांच्याकडे पोहोचले आणि  शेवटी त्यांनीच रामदेव यांचे उपोषण सोडले. तेव्हा तिथे बालकृष्ण ही हॉस्पिटल मध्येच होते.

आत्ता तुम्ही म्हणाल ही तर जबरदस्ती झाली. सरकारने त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले होते. रामदेव बाबा थोडीच रुग्णालयात गेलेल.

तर थांबा घटना क्रमांक दोन वाचा…

२३ ऑगस्ट २०१९ मध्ये बालकृष्ण यांची तब्येत अचानक बिघडली होती. सांगितलं जात होतं की ते अचानक बेशुद्ध झाले आहेत. त्यांना पतंजली योगपीठ त्याच बाजूच्या एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले.  तिथे त्यांचे मेडिकल चेकअप करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की,

“जेव्हा त्यांना येथे आणण्यात आले होते तेव्हा ते अगदी सिरीयस कंडिशन मध्ये होते. त्यांना नीट बोलता येत नव्हतं की त्यांना नेमका त्रास काय होतोय”. 

त्यांच्या केलेल्या सगळ्या मेडिकल टेस्ट नॉर्मल होत्या. मग न्यूरोसर्जन च्या म्हणण्यानुसार त्यांना ऋषिकेश मधील एम्स मध्ये हलवण्यात आले. तिथे त्यांची ट्रीटमेंट झाली. काही पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, बाळकृष्ण यांना हार्ट अटॅक आला होता. नंतर रामदेव यांचे प्रवक्ता एस.के तिजारावाला यांनी पत्रकारांना सांगितले की आता काळजीची काहीही कारण नाही आचार्य बाळकृष्ण यांची तब्येत स्थिर आहे .

आत्ता तुम्ही म्हणाल हे तर बाळकृष्ण आहेत, बाबा रामदेव यांचा काय संबंध. तर भावांनो त्यासाठी ही स्टोरी वाचा,

आपली वेळ आली की अ‍ॅलोपॅथी चा सहारा घेतलेली मंडळी, स्वतःच्या कंपनीचे औषधे विकली जावीत म्हणून इतर औषधे, इतर पॅथी यांच्याबद्दल या आपातकालीन वेळ साधून संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करतात. आपण देखील अशा वक्तव्यांना भुलून आपल्या आरोग्याशी खेळतो. कारण कोणतिही पॅथी रुग्णांना मारा म्हणून सांगत नाही, रुग्णांना बरे करण्यासाठीच प्रत्येक पॅथीचा जन्म झाला आहे हे आपण विसरतो.

ॲलोपॅथी असो की आयुर्वेद किंवा होमियोपॅथी. प्रत्येक ठिकाणी त्या त्या पॅथी योग्य आहेत. त्यासाठी दूसऱ्या उपचारपद्धतीला कमी लेखण्याची गरज नाही हे आपण समजून घ्यायला हवं. असो खरं तर, साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत रामदेव आणि बाळकृष्ण व कंपनीवर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.