पीटबुलने मालकीणीचाच जीव घेतला ; कुत्रे पाळताय पण कोणते पाळायचे नाहीत ते समजून घ्या.

आजही आपण ऐकतो जगात कुणी आपल्याशी प्रामाणिक असोत अगर नसोत आपला कुत्रा मात्र प्रामाणिक, निष्ठावान असतो. कित्येकदा आपण असे अनुभव घेतले असतील कि, पाळीव कुत्रे आपल्या मालकाशी प्रामाणिक राहून जीवावर खेळून आपली निष्ठा दाखवून देतात.

मात्र आजच भयंकर अशी बातमी वाचली कि,

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पाळीव पिटबुल कुत्र्याने आपल्या ८० वर्षीय मालकिणीवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झाला. 

लखनौच्या कैसरबाग परिसरामध्ये ही घटना घडलीये. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला सुशीला त्रिपाठी यांच्या मुलाने ३ वर्षांपूर्वी पिटबुल जातीचा कुत्रा घरी आणला.  १२ जुलै रोजी मंगळवारी पहाटे ५.३० वाजता सुशीला त्यांच्या लाडक्या पिटबुलला नेहमीप्रमाणे टेरेसवर फिरवत होत्या. पिटबुलच्या गळ्यात बांधलेली साखळी उघडताच त्याने सुशील यांच्यावर हल्ला केला. 

हा हल्ला इतका भयंकर होता कि, त्याने सुशीला यांच्या पोटाचे, डोक्याचे आणि चेहऱ्याचे, एकूण १२ ठिकाणचे अक्षरशः लचके तोडले. त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलेलं मात्र अतिरक्तस्रावामुळे त्या महिलेचा प्राण वाचू शकला नाही.  

ज्या लाडक्या कुत्र्याला कधी मांडीवर बसवून स्वतःच्या मुलासारखं रुईचं दूध पाजलं, प्रेम दिलं, त्याच कुत्र्याने इतका भयंकर मृत्यू दिला…पिटबुलशिवाय सुशीला यांच्या घरात आणखी एक लॅब्राडोर पाळीव कुत्रा आहे.

मात्र घटनेमुळे सर्वांच्याच मनात एक भीती निर्माण झालीय की, पाळीव असणाऱ्या कुत्र्यांवर कितपत विश्वास ठेवायचा ? ते अचानक हिंस्र झाले तर ? 

सगळेच पाळीव कुत्रे हिंस्र नसतात तर कोणत्या कुत्र्यांना पाळायचं याबाबत नागरिक चुकच करतात. छंदापोटी जे कुत्रे पाळायला नाही पाहिजेत असेही कुत्रे पाळले जातात. जसं की, पिटबुल जातीचा कुत्रा पाळणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे ताजे उदाहरण म्हणजे हि घटना. 

जगात असे बरेच कुत्रे आहेत जे धोकादायक कुत्र्यांच्या जातींमधील असतात. ज्यांना पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही काही लोकं मोठ्या टशनमध्ये असे भयंकर कुत्रे पाळतात. 

१. पिटबुल.

मालकीण घरी एकटी असताना कुत्र्याने केलं असं की... तुम्ही पण ऐकून व्हाल सुन्न!

पिटबुल हा जगातील सर्वात धोकादायक कुत्रा मनाला जातोकारण त्याचं वर्तनच हिंसक, आक्रमक  असतं. कोणत्या जातीचे कुत्रे सर्वाधिक हल्ले करतात तर त्यात पिटबुल या जमातीचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. अमेरिकन पिट बुल हा कुत्रा वारंवार आपल्या मालकांवर झालेल्या बातमीचे मथळे बनतात.

पिटबुल पाळायचा असेल तर मालकांना योग्यरित्या ट्रेनिंग घेणं आवश्यक असते, योग्य पद्धतीचे ट्रेनिंग घेतले नसेल तर हे हल्ल्याच्या वेळेस या कुत्र्यांना कसं हाताळायचं हे समजत नाही त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जशी घटना घडली त्याच प्रकारच्या दुर्घटना घडतात.

आत्ता भारतातील घटना सोडाच तर यूएसमध्ये २०१५ या एका वर्षात पिट बुलच्या हल्ल्यांमुळे तब्बल २८ लोकांचा मृत्यू झाला होता. पिटबुल त्याच्या मजबूत जबड्यासाठी आणि स्नायूंच्या उंचीसाठी फेमस आहे. तसेच लढाऊ कुत्रे म्हणून त्यांच्या प्रजननाचा इतिहास आहे. या कुत्र्याचं १६ ते ३० किलो वजन असतं. 

जगभरातील अनेक देशांमध्ये पिटबुलची पैदास करण्यावर आणि पाळण्यावरही बंदी आहे. मात्र अमेरिकेसह इतर अनेक देशांमध्ये अजूनही पिट बुलची पैदास केली जात असली तरी, त्यांची आक्रमकता रोखण्यासाठी चांगले प्रशिक्षण आवश्यक आहे. 

या पिट बुल डॉगमध्ये ५ प्रकार असतात, अमेरिकन बुली, अमेरिकन पिट बुल टेरियर, अमेरिकन स्टॅफोर्डशायर टेरियर, अमेरिकन बुलडॉग. या जातीचे कुत्रे आक्रमक स्वभावाचे असल्यामुळे दुर्दैवाने या जातीचा वापर सामान्यतः डॉगफाइटिंगसाठी केला जातो. 

आता भयंकर अशा प्रकारच्या कुत्र्यांमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे,

२. रॉटवेलर (rottweiler)

283 Angry Rottweiler Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

रॉटवेलर हा एक हुशार पण अत्यंत निर्भीड स्वभावाचा कुत्रा म्हणून ओळखला जातो. चांगला संरक्षण असा कुत्रा म्हणून अनेक जण रॉटविलर पाळतात. या कुत्र्यांचं आयुष्य ८ ते ११ वर्षांचं असून ती आकाराने सुद्धा खूप मोठी असतात.

मात्र सर्वात धोकादायक कुत्र्यांमध्ये रॉटवेलरचा दुसरा क्रमांक लागतो. त्याचा साधारण चावा देखील बरीच खोल जखम होऊ शकते, अनेकदा व्यक्तीचा मृत्यू होतो.

काही आकडेवारीनुसार, कुत्र्यांच्या चाव्याव्दारे होणाऱ्या मृत्यूंपैकी अर्ध्याहून अधिक मृत्यूसाठी रॉटवेलर्स जबाबदार असल्याचं कळतंय.

३. डॉबरमॅन

An Angry Doberman Pinscher

डॉबरमॅन प्रजातीचे कुत्रे खासकरून पोलिसांचे कुत्रे आहेत, परंतु सामान्य लोकांनीही हे डॉबरमॅन  घरात पाळण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भारतात देखील काही सधन शेतकरी हे कुत्रे शेतात पाळतात. 

हे धोकादायक कुत्रे अनोळखी लोकांना पाहून आक्रमक केंव्हा होतात तर जेंव्हा त्या कुत्र्यांना किंव्हा त्याच्या मालकांना धोका निर्माण झाला अशी त्यांची भावना झाली तर मग ते समोरच्यांवर हल्ला करतात, कित्येकदा तो हल्ला जीवघेणाही असतो आणि मालकांना कोणत्याही किंमतीत सुरक्षित ठेवत असतात.

म्हणूनच या कुत्र्यांचे संरक्षक म्हणून प्रजनन केले जाते. परंतु त्याची खासियत म्हणजे हे कुत्रे आपल्या मालकांना पाहून शांत होतात. या कुत्र्यांनी मनुष्यावर केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या देखील आपण पहिल्याच असतील. 

डॉबरमॅनची शक्ती आणि बुद्धिमत्ता पाहता ते अनोळखी लोकांवर आक्रमक हल्ला तर करतातच शिवाय कधीकधी त्यांच्या मालकांबद्दलही आक्रमक बनतात. या कुत्र्यांची अंगकाठी अगदी बारीक असते मात्र त्यांचे वजन ३४ ते ४५ किलो असते. अनेक देशांमध्ये ही प्रजात पाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील लोकं या प्रकारची कुत्रे पाळतात.

कितीही भयंकर कुत्रे पाळण्याचं तुम्ही धाडस करत असाल तर, एक गोष्ट लक्षात घ्या… 

ऍक्शन फॉर ऍनिमल्स अगेन्स्ट क्रुएल्टी अँड ट्रॉमा AaCT चे प्राणी कल्याण अधिकारी सांगतच असतात कि, बहुतेक ब्रीडर नोंदणीकृत नसतात आणि त्यांचा स्वभाव किंवा जनुक तपासणीच्या गोष्टी देखील श्वानप्रेमी लक्षात घेत नाहीत. कुत्रा कितीही चांगला दिसत असला तरीही त्याची पैदास केली जाऊ नये हे लक्षात असूनही फक्त हौस, फॅशन म्हणून आक्रमक, भयंकर असे कुत्रे पाळले जातात. 

जरी ते कुत्रे भयंकर प्रजातीचे नसतील तरीही विनम्र जाती देखील आक्रमक बनतात. मात्र अशा घटना का घडतात ?

एक तर आक्रमक कुत्र्यांच्या जाती पाळल्या तर जातायत मात्र त्या काळजीपूर्वक हाताळल्या जात नाहीत, परिणामी कुत्र्यांनी लोकांवर हल्ला करण्याच्या घटना घडतात. यात संपूर्ण दोष प्राण्यांचा नसून त्यांच्या बेजबाबदार मालकांचा असतो. 

आणि अशा घटना घडल्याच आणि हल्लेखोर कुत्र्याचे तुम्ही मालक असाल तर तुमच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २८९ अन्वये प्राण्याबाबत निष्काळजी वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येउ शकतो हे मात्र लक्षात असू द्यात.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.