पद्मनाभ मंदिरातल्या सातव्या नाग दरवाज्याची किल्ली घावलीय पण उघडायला कोण तयार होईना

बॉलिवूडचा एक काळ निव्वळ इच्छाधारी नागांच्या पिक्चर्सनं गाजवला होता. टॉलीवूडमध्ये सुद्धा बॉलिवूडच्या नागांना काट्याची टक्कर देतील असे तगडे नाग होतेच. 

प्रत्येक नागपंचमीला टीव्हीवर दिवसभर नागांचेच पिक्चर चालायचे. तेव्हा गावात एखाद्याच्या घरी टीव्ही असायचा. मग आसपासच्या घरातले लोकं मिळेल ती जागा पकडून नागाचा पिक्चर बघायला बसायचे. 

मध्येच पिक्चर मध्ये बिन वाजायला लागली कि खरेखुरे साप बिळातनं बाहेर पडतील या भीतीने बऱ्याच जनाची हवा टाईट व्हायची..

ती भीती कुठे हळूहळू जायला लागली होती, तोच सरकारनं साऊथच्या पद्मनाभ स्वामी मंदिराचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे दरवाजे उघडले तेव्हा तळघरातलं सोनं नाणं पाहून अख्ख्या जगानं तोंडात बोटं घातली..

मात्र सातव्या दरवाजाची वेळ आली नी नागोबाची कथा लागली. मग काय विषयच संपला..

कौन फूकेगा मंतर.. कौन खोलेगा दरवाजा..!! एक गलती हुई नहीं कि सीधा उपरवाले का दरवाजा खुल जायेगा..

आणि आजही अनंत पद्मनाभस्वामी मंदिराचा सातवा दरवाजा बंदच आहे..

जून २०११ मध्ये सुप्रीम कोर्टानं पद्मनाभ स्वामी मंदिराचे दरवाजे उघडण्याचा निर्णय दिला होता. मग एक एक करून दरवाजे उघडायला सुरुवात करण्यात आली. दरवाजे उघडू लागले तसे तळघराच्या खोल्या च्या खोल्या सोन्या-नाण्यानं, हिऱ्या-माणकानं भरल्या होत्या.

पद्मनाभ स्वामी मंदिर नावाचा मंदिर सुद्धा आहे हे सुद्धा कुणाला माहित नव्हते. मात्र त्या खजान्यामुळं अक्ख्या जगाचे डोळे याच मंदिराकडं लागले. 

सोनं नाणं असेल तिथं धनाचा पहारेकरी सुद्धा असतोच..

बी ब्लॉक मधले सहा दरवाजे उघडले मात्र सातवा दरवाजा उघडायची वेळ आली आणि भीती सुरु झाली.सातव्या दरवाज्याला ना कोणता कुलूप ना कोणते नटबोल्ट फक्त दोन बाजूला दोन नाग बनवलेले आहेत. 

सातवा दरवाजा खोलण्याच्या आधी दोन जणांचा साप चावल्याने मृत्यू झाला. त्यांनतर जी भीती पसरली ती आजगायत कायम आहे. दरवाजा उघडला कि महाप्रलय येण्यापासून पृथ्वीचा विनाश होईल इथपर्यंतच्या कथा सगळीकडे पसरल्या. त्यांची चर्चा आजही केली जाते.

हे इतकं रहस्यमयी मंदिर त्रावणकोरच्या राजाने बांधलं होतं..

त्रावणकोरची राजगादी ही केरळमधली सगळ्यात जुनी राजगादी मानली जाते. त्याच त्रावणकोरच्या राजांनी ६ व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. ९ व्य शतकातल्या ग्रंथांमध्ये याचे पुरावे आहेत.

मात्र १७२९ मध्ये वेनाड राज्याला नष्ट करून मार्तंडदेव देव वर्मा यांनी त्रावणकोर राज्याची स्थापना केली. नवीन राज्य स्थापन केलेल्या मार्तंडदेव वर्माने १७५० मध्ये पद्मनाभस्वामी मंदिराला नव्यानं बांधलं. 

राजा मार्तंड वर्माने आपलं राज्य आणि परिवार देवाला अर्पण केलं होतं. तेव्हापासून या मंदिराची व्यवस्था करण्याची जबाबदारी आणि मंदिराची मालकी याच त्रावणकोर राजघराण्याच्या हातात आहे. 

अनंत नागावर पहुडलेल्या भगवान विष्णूला हे मंदिर समर्पित आहे..

भगवान विष्णू ज्या शेषनागावर योग मुद्रेत पहुडलेले असतात. त्याच शेष नागाला अनंत नाग असे म्हटले जाते. संत विल्व मंगलम स्वामियार हे भगवान विष्णूचे मोठे भक्त होते. ते रोज शाळीग्राम दगडाची पूजा करून भगवान विष्णूच्या दर्शनासाठी ध्यान करायचे.

एक दिवस देवाने मुलाचे स्वरूप घेऊन त्यांची खोड काढली. त्यामुळे संत विल्व मंगलम त्या मुलाच्या मागे धावू लागले. त्या मुलाच्या मागे एका जंगलात गेल्यानंतर एका मोहाचे झाड एका क्षणात खाली कोसळले आणि महाविष्णूने संत विल्व मंगलम स्वामियार यांना दर्शन दिले. 

त्याच मोहाच्या लाकडापासून देवाच्या मूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे. तर नेपाळमधून गंडकी नदीच्या पात्रातून आणलेले शाळीग्राम दगड या मूर्तीवर जडवलेले आहेत. 

सगळं ठीक होतं मात्र इंदिरा गांधींमुळे समस्या निर्माण झाली..

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्रावणकोरची राजेशाही संपली. राजेशाही संपली असली तरी या मंदिराची मालकी मात्र राजघराण्याकडेच होती. परंतु १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी राजपरिवारांचा प्रिव्ही पर्स बंद केला.

प्रिव्ही पर्सच्या कायद्यानंतर मंदिराच्या मालकी वरून राजघराणं आणि सरकार यांच्यात वाद सुरु झाला. याची केस पहिल्यांदा हाय कोर्टात गेली. हाय कोर्टाने सरकारच्या बाजूने निर्णय दिला होता. 

हाय कोर्टांनंतर ही केस सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने याच केसचा निकाल देतांना मंदिराची मालकी राजघराण्याला दिली. तसेच २०११ मध्ये मंदिराच्या तळघरातले दरवाजे खुले करण्यासाठी परवानगी दिली. 

सहा दरवाजे उघडले मात्र सातवा दरवाजा बंदच आहे..

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तळघराच्या दरवाजे उघडायला सुरुवात झाली. त्यात तळघरातून एका पाठोपाठ एक याप्रमाणे २२ अब्ज डॉलर किमतीचे सोने, चांदी आणि हीरे मिळाले असल्याचे सांगितले जाते. 

परंतु जेव्हा सातवा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतांना दोन जणांचा साप चावल्याने मृत्यू झाला. त्या दोघांच्या मृत्युनंतर या दरवाज्याबात गूढ रहस्य वाढत गेलं. 

त्यानंतर मंदिर समिती आणि त्रावणकोर राजघराण्याने दरवाजा उघडू नये असं मत मांडलं. त्यामुळे कोर्टाने श्रद्धेचा आदर करत दरवाजा उघडण्याचे अधिकार मंदिर समितीला दिले.

नाग पाशम मंत्राचं रहस्य कायम आहे.. 

सातव्या दरवाज्यावर कोणतेच कुलूप नाही किंवा कोणत्याही प्रकारचे खिळे नाहीत. दरवाजा एकदम सपाट आहे मात्र त्यावर दोन नाग काढलेले आहेत. साप चावल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तसेच  दरवाज्यावर सुद्धा दोन नाग काढलेले असल्यामुळे भीती निर्माण झाली.

काहींच्या मते तो दरवाजा शापित आहे तर काहींच्या मते तो दरवाजा नाग बंधम म्हणजेच नाग पाशम मंत्राने बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तो दरवाजा मंत्रांच्या साहाय्यानेच उघडण्यात यावं असं मत आहे.

त्या नाग पाशम मंत्रावर गरुड मंत्राची किल्ली आहे..

शापित असलेल्या किंवा नाग पाशम मंत्राने बंद केलेल्या या दरवाज्याला उघडण्यासाठी फक्त एकाच उपाय आहे. तो म्हणजे गरुड मंत्राचा उच्चार करून हा दरवाजा उघडता येऊ शकतो.

मात्र हा गरुड मंत्र योग्य उच्चरवात आणि पूर्ण स्पष्टतेने म्हणू शकेल असा कोणताच व्यक्ती भारतासह जगात नाही. जर हा मंत्र म्हणतांना जराशी जरी चूक झाली तर त्या व्यक्तीची मृत्यू होईल असं सांगितलं जातं. त्यामुळे हा मंत्र म्हणून दरवाजा उघडायला कोणीही समोर येत नाहीये.

सुप्रीम कोर्टाने दरवाजा उघडण्याचा निर्णय मंदिर समितीला दिलाय. त्यामुळे गरुड मंत्राचा पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने उच्चार करून या दरवाज्याला खोलू शकेल असा व्यक्ती जेव्हा भेटेल. तेव्हाच हा दरवाजा उघडला जाईल अशी शक्यता आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.