नेहरू, वाजपेयी की मोदी सर्वात जास्त पुस्तके कुणी लिहली ?

राजकारण आणि साहित्यिक क्षेत्र यांचे ऋणानुबंध तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. ब्रिटीश व्यवस्थेमुळे भारतीय राजकारणाचा पायाच साहित्यिकांनी रचला अस म्हणलं तर ते चूक ठरत नाही. कदाचित याच गोष्टीमुळे साहित्यिक क्षेत्रातून न आलेले राजकारणी लोक देखील राजकारणातू साहित्यिक क्षेत्राकडे आकर्षित झाले.

आत्ता ताज उदाहणं पहायचं झालं तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच विद्यार्थांना परिक्षेच्या तणावातून मुक्त करण्यासाठी त्यांनी एक्झाम वॉरिअर्स नावाचं पुस्तक लिहलं. सध्या तरी अनेकजण याच एका पुस्तकाचा दाखला देत असले तरी हे एकमेव पुस्तक नाही. नरेंद्र मोदींची तुलना नेहरूबरोबर देखील करण्यात येते, नेहरूंनी देखील पुस्तके लिहली होती, पुस्तक लिहणारे पंतप्रधान अस आठवलं की मग माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच नाव येतं. त्यांनी देखील पुस्तके लिहली होती,

आणि साहजिक प्रश्न पडतो सर्वात जास्त पुस्तके कोणी लिहली ? 

पुस्तकच्या लिहण्याच्या बाबतीत, दिवंगत अटल बिहारी वाजपेयींच्या बरोबरच, नरेंद्र मोदी यांनी देखील जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकले आहे.

अट्टल बिहारी वाजपेयी १९९९ साली लिहलेल्या “क्या खोया क्या पाया” आणि २००३ साली लिहलेल्या “२१ कविताये” या पुस्तकांच्या बरोबरच एकूण ११ पुस्तकांचे लिखाण केले आहे. यामधील त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.

त्याप्रमाणेच इंग्रज काळात जेल मधून जवाहरलाल नेहरू यांनी लिहलेलेली अनेक पुस्तक देखील प्रसिद्ध आहेत. यातीलच एक पुस्तक म्हणजे ५९५ पानांचे “भारत कि खोज” हे पुस्तक. भाजप च्या या दोन्ही पंतप्रधानांनी जरी नेहरूंपेक्षा अधिक पुस्तके लिहली असतील तरी नेहरूंच्या या पुस्तका बरोबर त्याची तुलना होऊ शकत नसल्याचे  समीक्षक सांगत असतात.

त्यांच्या बरोबरच इंदिरा गांधी यांनी चार पुस्तके लिहली. तसेच चरण सिंग यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तसेच ग्रामीण भारतावर आधारित आठ पुस्तकांचे लिखाण केले. वी. पी. सिंग यांनी देखील प्रेमाच्या भावना व्यक्त करणारा काव्य संग्रह २००६ साली प्रकाशित केला आहे. बाबरी मस्जिद विध्वंसाचा उलेख करणाऱ्या पुस्तका बरोबरच पी. वी. नरसिंहराव यांनी तीन पुस्तकांचे लिखाण केले. इंद्र कुमार गुजराल भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर भरपूर लिखाण केले आहे. त्यांनी आपल्या आत्मकथे बरोबरच इतर तीन पुस्तकांचे लिखाण केले.

या सगळ्याच पंतप्रधानांच्यात एका वेगळ्या विषयावर मुरारजी देसाई यांनी पुस्तक लिहले. त्यांनी मिरेकल्स ऑफ यूरिन थेरेपी हे पुस्तक लिहले. या पुस्तकाबरोबरच त्यांनी इतर दोन पुस्तकांचे लिखाण देखील केले.

या सगळ्या पंतप्रधानांमध्ये सगळ्यात अधिक पुस्तकांचे लिखाण मात्र आपले सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपल पाहिलं पुस्तक आणीबाणीच्या काळात गुजरात वर झालेल्या परिणामांच्या बाबतीत लिहले आहे. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी हे पहिले पुस्तक लिहले आहे. आपातकाल में गुजरात असे या पुस्तकाचे नाव आहे. या बरोबरच हिंदी, मराठी, आणि इंग्रजी भाषेतील, एक भारत श्रेष्ठ भारत, ज्योतिपुंज, सामाजिक समरसता, सेतुबंध, साक्षी भाव, अशी आज पर्यंत त्यांची एकूण १४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

त्यामुळे या सगळ्या पंतप्रधानांच्या मध्ये लिखाणाच्या आकड्यांबाबत बाबतीत नरेंद्र मोदी अधिक वरचढ आहेत हे नक्की.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.