पंतप्रधान उदघाटन करत होते, तेवढ्यात ममता म्हणाल्या ‘हे तर आम्ही कधीच करून बसलोय’

देशात तिसरी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ममता बॅनर्जी नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्या आपल्या तृणमूल पक्षाच्या विस्ताराच्या तयारीसाठी वेगवेगळ्या राज्यातल्या पक्षश्रेष्ठींशी भेटल्या होत्या. आता या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली यावर कोणी खुलेआम बोललं नाही. पण माध्यमांनी आपापले अंदाज बांधत म्हंटल कि, ही तयारी भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीच्या प्लॅनची असू शकते.

कारण आपण नेहमीच तृणमूल काँग्रेसला केंद्र सरकारच्या अर्थात भाजपच्या विरोधात जाताना पाहिलंय. एवढंच नाही तर पश्चिम बंगालच्या निवडणुकीवेळी सुद्धा आपण या दोन्ही पक्षांतमधली काटे कि टक्कर पाहिलेय. आता तिथं शेवटी ममता दीदींनीच आपला बालेकिल्ला राखला. पण त्यांनतर राज्य विरुद्ध केंद्र अशी लढाई सुरु झालीये. आता सुद्धा असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला.

म्हणजे झालं काय ७ जानेवारीला पंतप्रधान मोदींनी कोलकाता इथल्या चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटलच्या कॅम्पसचे उद्घाटन केले. व्हर्च्युअल मिटिंगद्वारे पीएम मोदींनी हॉस्पिटलचे उद्घाटन केले. या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि अनेक बडे अधिकारी उपस्थित होते. 

पण या मिटिंग दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 

“आम्ही तर हे उदघाटन आधीचं केलंय. आरोग्यमंत्र्यांनी मला दोनदा फोन केला होता. तेव्हा मला वाटलं कोलकत्यातला दुसरा कोणतं महत्वाचं कार्यक्रम असेल, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मुद्धा उपिस्थत राहणार आहे, पण बघितलं तर चित्तरंजन हॉस्पिटलचं उदघाटन होत, पीएम मोदींच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की आम्ही त्याचे उद्घाटन आधीच केले होते.”

ममता दीदी पुढे म्हणाल्या कि, जेव्हा कोविडचं वातावरण होतं. तेव्हा आम्हाला केंद्रांची गरज होती. यावेळी आम्ही पाहिले की, चित्तरंजन रुग्णालय राज्य सरकारशी संबंधित आहे. त्यामुळे आम्ही त्याचे उद्घाटन केले.

आता हे बोलून ममता दीदींनी एकप्रकारे पंतप्रधानांना गप्पचं बसवलं. पंतप्रधान सुद्धा त्यावर काहीच बोलले नाही, ते शांतपणे ममतांचे म्हणणे ऐकत बसले आणि मान हलवत राहिले. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एवढ्यावरचं गप्प बसल्या नाहीत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची सुद्धा तक्रार केली.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आयएएस आणि आयपीएसच्या कमतरतेमुळे केंद्रानं सुचवलं होत कि,  बाहेरून लोकांची भरती करा. आता केंद्राच्या सूचनेचे पालन आम्ही करत आहोत. त्यानुसार आम्ही बाहेरून भरती केली.  मात्र राज्यपालांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांना हे माहीतचं नाही कि, आम्ही पंतप्रधानांच्या सांगण्यावरूनचं हे करत आहोत.

आता या बैठकीत राज्यपाल जगदीप धनखर हजर तर नव्हते. पण जेव्हा त्यांच्या कानावर ही  गोष्ट समजली कि, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांजवळ आपली चुगली केलीये. त्यांनी लगेच ममता दीदींच्या वक्तव्याला विरोध केला. 

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे विधान चुकीचे असल्याचे ट्विट करत म्हंटले की, 

पंतप्रधानांसमोर मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, राज्यपालांनी मला पत्र लिहिले आणि विचारले कशी भरती झाली सांगा. त्यांना माहिती नाहीये कि, हा निर्णय पंतप्रधानांच्या सल्ल्यानेचं घेतला गेलाय. त्यांचा हा दावा चुकीचा आणि अवास्तवही आहे.

आता राज्यपालांनी ममता दीदींच्या वक्तव्याला विरोध केला खरा पण त्यावर स्पष्टीकरण काही दिल नाही. 

पण हद्द म्हणजे जेव्हा ही चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटलच्या उदघाटनाची व्हर्च्युअल मिटिंग सुरु होती, तेव्हा मुख्यमंत्री  ममता बॅनर्जींनीही पीएम मोदींकडे दुर्लक्ष केले. त्यानं मीटिंगमध्ये पंतप्रधानांच्या भाषणाकडे लक्ष देण्याऐवजी आपला मोबाईल वापरणं सुरुचं ठेवलं. आता राजकीय अजेंडा काहीही असो पण पंतप्रधानांचा त्यांचा पदाचा हा एकप्रकारे अपमानच आहे. पण हे पहिल्यांदाच घडलेलं नाही, जेव्हा ममता दीदींनी आपला खुलेआम मोदी विरोधी अजेंडा दाखवलाय.  

गेल्या वर्षी सुद्धा कोलकाता मधल्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात उपस्थित होते. या दरम्यान बाकी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनी जय श्री रामचा जयघोष करायला सुरुवात केली. आता ममता बॅनर्जी यांना बहुतेक ते पटलं नाही कि त्यांनी मुद्दाम केलं माहित नाही पण त्या  कार्यक्रमातून निघून गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या या भूमिकेची मोठी चर्चा झालेली. 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.