सुवर्ण मंदिरात तंबाखू खातोय म्हणून थेट हत्या करणारे निहंग शीख एवढे हिंसक का असतात ?

अमृतसरमधील शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या सुवर्ण मंदिराजवळ एक हत्या झाली आणि या हत्येवरून पुन्हा एकदा वादग्रस्त ठरणारे निहंग शीख चर्चत आलेत. ज्या व्यक्तीची हत्या झाली त्यामागचं कारण असं सांगण्यात येतंय कि, मृत व्यक्ती सुवर्ण मंदिराजवळ तंबाकू खात होता. पवित्र स्थळी तंबाखू खात होता म्हणून निहंग शिखांनी त्याची चाकूने भोसकून हत्या केली.  

मृत हरमनजीत सिंग सुवर्ण मंदिराजवळील परिसरात फिरत होता त्यावेळी तो तंबाखू चघळत होता, असे निहंगांचे म्हणणे आहे. त्याला निहंग शिखांनी हटकले, वाद झाला. वाद टोकाला गेला आणि ही हत्या झाली. गंभीर जखमी हरमनजीत सिंग रात्रभर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. या बातमीमुळे सगळीकडे तणावाचं वातावरण आहे.

घडलेल्या घटनेने निहंग शीख आरोपांच्या केंद्रस्थानी आलेय…

ही एकच घटना नाही तर आधी देखील २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यात सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन चालू होते त्यादरम्यान सिंघू बॉर्डरवर एक हत्या झालेली. धार्मिक ग्रंथाचा अपमान केला म्ह्णून काही निहंग शिखांनी लखबीर सिंह या दलित युवकाची हत्या केली होती.  लखबीरची हत्या केल्यानंतर त्याचे हात – पाय कापून सिंघू बॉर्डरपासून काही अंतरावर असेलल्या पोलीस बॅरिकेडला लटकवण्यात आला. या घटनेचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते. या हत्येमागे निहंग शिखांचा हात असल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला होता. 

मागे झालेल्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाला जेंव्हा हिंसक वळण लागले होते. तेंव्हा आंदोलक शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर घेऊन बॅरिकेड्स तोडले आणि दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर परेडच्या वेळी त्यांच्या सोबत निळ्या वेशातले काही शीख योद्धे घोड्यावर बसून त्यांना संरक्षण देत असलेले दिसलेले.

अशा हिंसक घटनांसाठी निहंग शिखांना जबाबदार धरण्यात येतं ते निहंग शीख कोण आहेत ? 

निळा वेष, वाढवलेली दाढी, हातात शस्त्र, डोक्यावर निळी पगडी, त्यावर लावलेली पारंपरिक आभूषणे, हातात ससाणा पक्षी असलेले हे शीख योद्धे कोण हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या शीख योद्ध्यांना निहंग शीख असे म्हणतात.

या निहंग शिखांचा इतिहास पाहत ते इतर शिखांच्या पासून वेगळे ठरतात.

निहंग या फारसी शब्दाचा अर्थ होतो मगरमच्छ. मगरीप्रमाणे आक्रमक व निर्दयी समजल्या जाणाऱ्या या शीख योद्ध्यांना मुघल सैनिकांनी निहंग हे नाव दिलं. शिखांचे नववे गुरु हरगोविंद सिंग यांच्या काळात पश्चिमेकडून होणाऱ्या परकीय आक्रमणाविरोधात अकाली फौज स्थापन झाली. पुढे शीख समुदायाचे धावे गुरु गुरु गोबिंद सिंग यांनी आपल्या अनुयायांना बलिदानाची शपथ देऊन खालसा पंथाची स्थापना केली.

आपल्या विरुद्ध होणाऱ्या हल्ल्याचे प्रत्यत्तर दिले नाही तर आपण संपून जाऊ ही भावना या काळात शिखांच्यामध्ये तीव्र झाली होती. मुघल बादशाह औरंगजेबाची जुलमी धोरणे यासाठी कारणीभूत ठरत होती.  मुघलांशी लढताना गुरु गोबिंद सिंगांचे दोन्ही लहानगे पुत्र साहबज़ादे झोरावर सिंग आणि फतेहसिंग शत्रूच्या हाती लागले. या दोन्ही बालकांना सरहिंदच्या नवाबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आदेश दिला. मात्र दोन्ही चिमुकल्यांनी मोठ्या निर्भीडपणे आपला धर्म सोडण्यास नकार दिला.

यामुळे संतप्त झालेल्या नवाबाने ९ वर्षांच्या झोरावर सिंग आणि ६ वर्षांच्या फतेह सिंग यांना भिंतीत जिवंत चिणून ठार करण्याची शिक्षा दिली. मात्र तरीही दोन्ही मुलांनी आपला शीख धर्म सोडला नाही. २७ डिसेंबर १७०४ रोजी दोन्ही साहबज़ाद्यांना भिंतीत जिवंत पुरलं.

शीख धर्मातील हे सर्वात मोठे बलिदान मानले गेले.

असं मानतात कि गुरु गोबिंद सिंह यांचे सर्वात धाकटे सुपुत्र फत्तेसिंग यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेत निहंग या पंथाची स्थापना करण्यात आली.

त्यांच्याप्रमाणेच निळा वेष हे निहंग शीख परिधान करू लागले.  त्यांनी अनेक युद्धांमध्ये भाग घेतला. अतिशय कमी संख्या असली तरी शत्रूचा पराभव करण्यासाठी हे योद्धे युद्ध भूमीवर अतिशय क्रूर व निर्दयीपणे लढताना दिसायचे.

चिड़िया नाल मैं बाज लडावां
गीदडां नू मैं शेर बनावां
सवा लख नाल इक लडावां
तां गोविंद सिंह नाम धरावां

आजही निहंग शीख या उक्तीप्रमाणे वागताना दिसतात. त्यांनी कठोर ब्रम्हचर्याची शपथ घेतलेली असते.  यात काही पंथ आहेत जे गृहस्थ धर्माचा आचरण करतात मात्र त्यांच्या पत्नीला देखील निहंग पंथाची दीक्षा घ्यावी लागते. या महिला देखील निळ्या वेषभुषेत असतात. 

निहंग शिखांचे धार्मिक चिन्ह, पगडी, आभूषणे देखील इतर शिखांपेक्षा अधिक मोठे आणि ठसठशीत असते. शीख परंपरेचे ते पालन कठोरपणे करताना दिसतात. 

Now this is some bad ass insane head gear (turban). Nihangs - The Warrior Clan of the Sikhs [ TIL ] [ History ] - Album on Imgur

गुरु गोबिंद सिंग यांची आठवण म्हणून ते आपल्या सोबत बाज म्हणजेच ससाणा पक्षी बाळगत असतात.

त्यांनी शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेलं असतं. सर्व दीनदुबळ्यांचे संरक्षण करण्याची शपथ त्यांनी घेतलेली असते. गुरु ग्रंथसाहिब बरोबरच दशम ग्रन्थ साहिब आणि सरबलोह ग्रन्थचे ते वाचन व पालन करत असतात. या ग्रंथामध्ये भक्तिरसाबरोबरच वीर रस देखील आहे असे त्यांचे म्हणणे असते.

हे निहंग शीख छोट्या छोट्या गटात राहतात. वेगवेगळ्या शीख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी घोड्यावरून ते चक्कर मारत असतात. यांचे तीन दल आहेत तरना दल, बिधि चंद दल, आणि बुड्ढा दल. त्यांचे वेगवेगळे प्रमुख असतात त्यांना जत्थेदार असं ओळखलं जातं.

Who are the Nihangs? Explained in points - India News

एकेकाळी निहंगशिखांना भारतातील सर्वात खतरनाक सैन्य शक्ती मानलं जात असे. 

आज हे योद्धे देशभरातील गुरुद्वारांमध्ये  गुरुबानीचा पाठ करताना दिसत असले तरी त्यांच्या तील जिद्द आणि वृत्ती लढाऊच आहे. अन्याय घडत असेल तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी ते हातात शस्त्र घेऊन दाखल होतात. या निहंग शीखांचे अयोध्येच्या राम मंदिराशी देखील जुने नाते आहे. दीडशे वर्षांपूवी बाबरी मशिदी पहिल्यांदा राममूर्तीची स्थापना करणारे आणि तिथे हवन करणारे निहंग शीख साधूच होते.

इतका दैदिप्यमान इतिहास असूनही निहंग शीख हत्येसारख्या घटनेत कारणीभूत ठरतात.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.