तुमचा बबड्या झाला आहे का? तुमचं मुल बबड्या आहे का? हे कसं ओळखायचं.

हे बोलभिडूवाले फाफल्यात. काहीपण विषय घेवून यायला लागलेत. हाय हाय बबड्या. बबड्या ती मूर्ख मालिका दाखवायची बंद करा. 

होय होय भिडूंनो तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करुया. पण कुठल्याही गोष्टीला असं वाऱ्यावर सोडता येत नसतय. निदान त्या बद्दल थोडं वाचायला तर पाहीजे न. आत्ता हे बघा. सध्या झी वाल्यांची टिआरपी खेचणारी मालिका कोणती तर बबड्याची. अनेक जणांना सिरियलचं नाव पण थेट आठवत नाही, आठवतो तो फक्त बबड्या. 

तर प्रत्येक गोष्टीमागं मानसशास्त्र असतं. म्हणजे कसं आजवर आलेल्या मालिकांमध्ये सासू-सून होती. सून नव्याने लग्न करून घरात येते आणि सासू त्रास देते. नाहीतर सून त्रास देते. या मालिकेत याच्या बरोबर उलटं खेळण्यात आलं. म्हणजे सासरा लग्न करुन घरात येतो आणि घरातला मुलगा व्हिलनच्या भूमिकेत जातो. जरासं वेगळं म्हणतात ते हेच. यामुळं नेहमीच घरातला मुलगा कर्ता धर्ता हिरो टाईप दाखवण्याचा मुड अचानक गेला आणि हिरो देखील बबड्या असू शकतो हे लोकांच्या ध्यानीमनी आलं. 

नाही म्हणलं तरी आपल्या आजूबाजूला अशी पात्र असतात. कदाचित आपल्या घरात देखील बबड्या असू शकतो, कदाचित आपला मुलगा देखील बबड्या असू शकतो किंवा गेला बाजार आपणच बबड्या असू शकतो. ममाज् बॉय वेगळं आणि बबड्या असणं वेगळं. आत्ता बबड्या असण्याचे काही निकष थोर अभ्यास करुन आम्ही मांडत आहोत.

ते तूम्ही शांत चित्ताने वाचावे आणि विचार करावा, तर खालील निकष वाचा, हे निकष एका मीमवरून घेण्यात आले आहेत. 

१) वेड्या आईची वेडी ही माया. 

तुमची आई तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करते. नो प्रोब्लेम सर्वांच्याच आया आपल्या पोरावर प्रेम करतात. पण माया आणि वेडी माया यात फरक असतो. तूम्ही जगातलं कोणतही कांड करून आलात तरी तूमची आई त्यावर पांघरूण घालण्याचं काम करत असेल. तूम्ही शाळेत असताना लॉग टेबल साठी आईकडून दोन चार हजार रुपये मागितले असतील आणि तीने ते दिले असतील तर तूम्ही बबड्या आहात.

आयांनो पोराला पदरात घेताना सगळ्या जगाला वाईट ठरवत असाल तर तूमचा मुलगा बबड्या आहे. तुमचा मुलगा अभ्यासात ढ आहे म्हणून शाळेतल्या गुरूजींना तुम्हाला शाळेत बोलवून घेतलं आणि तूम्ही गुरूजींना म्हणालात, तो खूप हूशार आहे वो पण अभ्यासच करत नाही तर तुम्ही बबड्याची आई आहात. 

२) तूम्ही बेरोजगार आहात पण,

तूम्ही बेरोजगार आहात पण तरिही अंगातली मस्ती कमी होत नसेल तर तूम्ही शंभर टक्के बरोजगार आहात. सामाजिक भान असणं हे खूप महत्वाचं आहे. जॉब नाहीत म्हणून तूम्ही मोदींना शिव्यांची लाखोली वहात असाल पण तूमची कितपत तयारी आहे याचा विचार कधी करता की नाही. फक्त बसून घ्यायचं हेच धोरणं असेल तर तुमचा बबड्या झालाय. 

३) तूम्हाला किचनचं काम येतच नाही.. 

विचार करा सगळं जग झोंबी झालय.तूम्ही एकटेच राहीलाय. आय एम लिजंन्ड पिक्चरमधल्या हिरोसारखं फक्त या पृथ्वीवर तूम्ही एकमेव माणूस आहात. तेव्हा तूम्हाला मॅगी देखील करुन खाता आली नाही तर. झोंबीच्या तावडीतून तुम्ही वाचलात आणि उपाशीपोटी मेलात तर उपयोग काय हाय का? 

किचनच्या कामांना तुम्ही ह्याट समजत असाल तर तुम्ही चुकताय. किमान चहा तर टाकायला यायला हवा. नसेल जमत तर किंमत तर करता यायला हवी. या दोन्ही गोष्टी होत नसतील तर तूम्ही बबड्या आहात. स्वयंपाक करणं हे हलक्या प्रतीचं आणि बायकांच काम आहे अस समजत असाल तर तूम्ही १०० टक्के बबड्या आहात.

४) तूमचा मित्र तुमचा गैरफायदा घेतो

तुमचा मित्र तुमचा गैरफायदा घेत असेल तर तुम्ही एक नंबरचे त्यू तर आहातच पण ही गोष्ट बबड्या होण्याच्या दिशेने टाकलेले तुमचे पहिले पाऊल आहे. कस असतय मित्रांवर विश्वास ठेवायलाच पाहीजे पण आंधळा विश्वास काय कामाचा भिडू.

कोणीपण सोम्यागोम्या उठून येत असेल आणि तूम्हाला थेट गंडा घालून जात असेल तर नाही चालणार. शिवाय आपला मुलगा आपल्या मित्रांवर विश्वास ठेवून घराला गंडा घालण्याचे काम करत असेल तर अशा आयांनी देखील ओळखायला हवं की आपला सोनूला आज बबड्या झाला आहे. 

५) नाक्यावरचा माणूस देखील तुमची इज्जत काढून जात असेल. 

लक्षात घ्या ज्याला घरात इज्जत नसते त्याला गावात इज्जत नसते. त्यामुळं घरात इज्जत कमवायला शिका. नाहीतर कोणीही येतो आणि तुमची दिडदमडीची अक्कल काढून पुढे जातो. अशा वेळी मोकळ्या मनाने आत्मपरिक्षण करायला शिका. आपण काय करतोय याचा फडणवीसांप्रमाणे दिर्घ अभ्यास करा. 

आयांनी देखील इथं एक गोष्ट ध्यानात घेतली पाहीजे कोणीही येतो आणि पोराला टपली मारून जातो अशा वेळी टपली मारणाऱ्याच्या नावाने दिवसरात्र बोटं मोडायची गरज नाही. त्रयस्थपणे आपल्या मुलाकडे पहा. त्याचं काय चुकतय ते पहा आणि समजवा. अशा वेळी पोरं पदरात घ्यावं आणि समजून सांगावं. तरिही ऐकत नसेल तर बबड्या म्हणून सोडून द्यावं. 

६) तुमचा बाप फक्त आईमुळे शांत बसत असेल तर 

लक्षात ठेवा तुमचा बापाची मस्त इच्छा आहे की तूमच्या पेकाट्यात लाथ घालून तुम्हाला दूनियादारीची झळ सोसून द्यायची पण अलका कुबलसारख्या आपल्या बायकोकडे बघुन तुमचा बाप शांत रहात असेल तर समजून घ्या तूम्हीच तो बबड्या.

आपण काय करतो, काय नाही याची काळजी बापाला नसेल. कितीही कांड केले तरी चौकातल्या पानपट्टीवाल्याप्रमाणे लांबूनच आपला बाप आपल्याकडे बघत असेल तरी समजून घ्यायचं आपला बबड्या झालाय. 

आत्ता तुमच्यासाठी एक बोलभिडूचा प्रश्न वरील सर्व निकषांचा विचार करता, राजकारणातला बबड्या कोण असू शकतो ? 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.