गुजरातमधून महाराष्ट्राचे सुत्र हलवणारे “चंद्रकांत पाटील” कोण आहेत..?

काल मध्यरात्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार नॉट रिचेबल झाले. सकाळी बातमी आली की एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदार सुरत येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड उभारले आहे.

आत्ता एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत याबाबत नेमका आकडा सांगता येत नसला तरी ABP अस्मिता या गुजराती चॅनेलच्या संपादकांनी हा आकडा 25 च्या आसपास असल्याचं सांगितलं आहे. त्याचंसोबत त्यांनी गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सेनेच्या या नेत्यांसोबत संपर्कात असल्याचं सांगितलं.

दूसरीकडे संजय राऊतांनी देखील माध्यमांसोबत बोलताना गुजरातच्या CR पाटील सेनेच्या या आमदारांच्या संपर्कात असून ते सातत्याने संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. 

माध्यमांमधून देखील अस सांगण्यात येतय की काल मध्यरात्री चंद्रकांत पाटील हे अचानकपणे सुरतमध्ये आले होते. ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत, व त्यांच्या माध्यमातूनच बंडखोरीचे हे सुत्र अवलंबण्यात येत आहे.

कोण आहेत गुजरातचे चंद्रकांत पाटील..?

पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे जवळचे मानले जातात.

सी.आर. पाटील हे प्रभावशाली खासदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मतदार संघातील विकास कामांना प्रमोट करण्याबाबत ते माहीर असतात अशी गुजरात मध्ये त्यांची ख्याती आहे. सुरतच्या वाढीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता; मग ते कापड आणि हिरे क्षेत्रासाठी धोरणात्मक विकास असो, किंवा सूरत विमानतळाचा संपूर्ण कार्यात्मक विमानतळाचा विकास असो,

ज्यामध्ये सुरतला उर्वरित भारताशी जोडणारी अनेक उड्डाणे आहेत या सर्व विकासाकामाम्ध्ये त्यांची महत्वाचे योगदान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू शिलेदार म्हणून चंद्रकांत पाटलांना ओळखलं जातं.

सी.आर. पाटील कोण आहेत?

पाटील यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला. त्यांनी आयटीआय, सुरत येथून तांत्रिक प्रशिक्षण घेतले. १९८९ मध्ये राजकारणात येण्यापूर्वी ते शेती आणि व्यवसायात सक्रिय होते. मात्र आणखी एक क्षेत्र होतं ज्यात ते कार्यरत होते मात्र काही घडामोडी घडल्या आणि त्यांना बाहेर पडावं लागलं.

१९७५ मध्ये सुरत पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांची खरी स्टोरी सुरु होते.

कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असतांना १९७८ मध्ये पलसाना तालुक्यात एका बूटलेगरच्या घरातून दारूचा साठा पकडल्यानंतर ते प्रथमच अडचणीत आले होते. या अवैध धंद्यामध्ये त्यांचे नाव असल्याचे पोलिस रेकॉर्डमध्ये त्याचे नाव गुंतलेल्यांपैकी एक म्हणून आले.

त्याच वर्षी त्याच्याविरोधात सोनगढ पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील यांना सुरत पोलीस टास्क फोर्सने अटक केली आणि अखेर त्यांना दारूच्या अवैध धंद्यात असल्याच्या आरोपावरून पाटील यांना पोलिस विभागाकडून सहा वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आले होते.

त्यांनी सहकारी बँकेचे ५४ कोटींचे कर्ज बुडवले आहे.

डायमंड ज्युबिली कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात २००२ मध्ये गुन्हे शाखेने पाटीलला मुख्य डिफॉल्टर म्हणून अटक केली होती. पाटील यांनी सहकारी बँकेकडून ५४ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले होते आणि २००२ मध्ये क्लीअरिंग हाऊसमधून बँकेला निलंबित करण्यात आलेली रक्कम परत केली नाही.

सुरतमधील नवसारीचे भाजप खासदार सी आर पाटील हे मूळचे महाराष्ट्रातील जळगावचे असल्यामुळे पक्षामध्ये एक आमदार आणि सुरत-उदाना महानगरपालिकेचे दहा नगरसेवक आहेत जे मूळचे महाराष्ट्रातील खानदेश प्रदेशातील आहेत. मोठ्या संख्येने स्थलांतरित लोकसंख्येवर प्रभाव पाडणारे पाटील यांना या मतदारांची जबाबदारी देण्यात आली आहे.

 त्यांच्या कार्यालयासाठी ISO प्रमाणपत्र करणारे भारताचे पहिले संसद सदस्य आहेत.  

कार्यालयासाठी आयएसओ प्रमाणपत्र ९००१: २०१५ प्राप्त करणारे ते भारताचे पहिले संसद सदस्य आहेत. मतदारसंघासाठी सरकारी सेवांच्या देखरेखीसाठी आणि प्रशासनासाठी लागू गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी त्यांच्या कार्यालयासाठी ISO प्रमाणपत्र देण्यात आले. शासकीय सुविधांचे उत्तम व्यवस्थापन आणि देखरेख करण्यासाठी त्याला हे प्रमाणपत्र देण्यात आले होते.

तसेच चंद्रकांत पाटील हे प्रभावी संसदपटू मानले जातात. ते आपल्या मतदारसंघातील विकास कामांना प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात माहिर आहेत. याद्वारे ते मतदारांपर्यंत सहज पोहोचतात.

गुजरातमधली स्थलांतरित लोकसंख्या भाजपसोबत आहे ते चंद्रकांत पाटील यांच्यामुळे असं बोललं जातं.

विक्रमी मते मिळवली

भारतीय जनता पक्षाचे सी.आर.पाटील संसदीय निवडणुकीत विजयाचे सर्वकालीन विक्रम मोडले होते. त्यांनी गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदारसंघात आपल्या कॉंग्रेसच्या प्रतिस्पर्धीला ६.८९ लाख मतांच्या फरकाने पराभूत केले होते.

६ लाखांहून अधिक मतांनी जिंकलेल्या नेत्यांच्या क्लबमध्ये पक्षाचे सहकारी संजय भाटिया, कृष्ण पाल आणि सुभाषचंद्र बहेरिया आहेत, तर इतर डझनभर उमेदवारांनी ५ लाखांच्या फरकाने विजय मिळवला आहे.

मोदीलाटेत मोदींना देखील इतकी मते मिळाली नव्हती जितकी चंद्रकांत पाटील यांना मिळाली होती.

वाराणसी संसदीय मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धीला पराभूत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४.७९ लाख मतांनी पराभूत केले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा ३.७१ लाख मतांनी पराभव केला होता.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची पहिली लोकसभा निवडणूक गुजरातमधील गांधीनगरमधून ५.५७ लाख मतांनी मोठ्या फरकाने जिंकली होती, तर २०१४ मध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गांधीनगर मतदारसंघातून ४.८३ लाख मतांच्या फरकाने जिंकून आले होते. असो या सर्व दिग्गज भाजप नेत्यांच्या पुढची मजल मारलेले चंद्रकांत पाटील ठरले होते.

वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावली होती.

सीआर पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवडते नेते आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या समन्वयाची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपवली होती. वाराणसीमध्ये पंतप्रधानांच्या निवडून येण्याची बाबदारीही त्यांनी पार पाडली होती.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची वडोदराची जागा सर्वाधिक फरकाने जिंकली होती. त्यांनी आपल्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याचा ५,७०,१२८ मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला. तथापि, त्यांनी तेथील जागेचा राजीनामा दिला आणि वाराणसी संसदीय मतदारसंघ कायम ठेवला जिथे ते ३,७१,७८४ मतांच्या फरकाने जिंकून आले होते.

कोरोनाकाळात हेच चंद्रकांत पाटील वादात सापडले होते.

मागे ५०००  रेमडेसिविर इंजेक्शन फ्री वाटली गेली होती ती चंद्रकांत पाटलांनी,

गुजरातमध्येही कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली होती, त्यामुळे त्याचा काळाबाजार चालू होता. हेच इंजेक्शन घेण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये लांबच लांब रांगा लागल्या जात होत्या. लोकं ५ पट पैसे देऊन हे इंजेक्शन विकत घ्यायला तयार होते.

केंद्र सरकार म्हणायचे की हे इंजेक्शन मेडिकल स्टोअरमध्ये नाही, ज्यामुळे ते खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होत नव्हते. अशा सर्व परिस्थिती मध्ये हे इंजेक्शन भाजप कार्यालयातून मोफत वाटले जात  होते.

चंद्रकांत पाटील यांनी ट्वीत करून माहिती दिली होती रेमडेसिविर इंजेक्शनची तीव्र कमतरता असल्यामुळे हे इंजेक्शन भाजप तर्फे मोफत वाटले जाणार आहे. तेंव्हा त्यांनी आपल्याकडे ५ हजार इंजेक्शन डोस असल्याचे सांगितले होते. तेंव्हा यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित होता या इंजेक्शनच्या कमतरता असतांना यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात इंजेक्शन आलेच कसे काय?

त्यात सी.आर. पाटील यांनी या इंजेक्शन्सची थेट फार्मा कंपनीकडून खरेदी केल्याचा दावा केला होता.   तथापि, फार्मा लायसन्सशिवाय वैद्यकीय इंजेक्शन्सचे वितरण केले जाऊ नये,असा नियम असतांना हा वाद बराच मोठा झाला होता. तेंव्हा विरोधी नेत्याने तक्रार दाखल केली असता हे प्रकरण न्यायालयाकडे गेले होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.