गेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार??

तर भिडूनो गेले काही वर्ष ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो खुर्चीच्या खेळाचा निकालाचा क्षण जवळ आलाय. अंहं. भारताच्या पंतप्रधानपदाच्या खुर्ची बद्दल म्हणत नाही तर वेस्टरॉसच्या सिंहासनाबद्दल म्हणतोय.

गेम ऑफ थ्रोन्सच्या काटेरी सिंहासनावर कोण बसणार हे या सोमवारी फायनल एपिसोडमध्ये फायनली कळणार आहे. एवढे दिवस या विषयावरून इंटरनेटवर बक्कळ भांडणे झाली, दोस्तादोस्तांच्यात भांडणे झाली. जॉर्ज आर आर मार्टिनने देखील शेवटपर्यंत कोणाला म्हणजे कोणाला काही कळू दिल नव्हत. फॅन्स मंडळी आजही बुट्टीभर थेऱ्याघेऊन रेडी आहेत. सोमवारी जेव्हा सगळ संपेल तेव्हा आपल्या भिडू मंडळीत काही जण “बघ मी आधीच सांगितलो होतो ” अशी फुशारकी मारतील.

ज्यांना अशा थेरीज जास्ती माहित नाहीत त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलोय कोण जिंकू शकत गेम ऑफ थ्रोन्स ?

१. डिनेरियस टारगेरियन –  

 डार्क नाईट सिनेमामध्ये हार्वी डेंट चा एक फेमस डायलॉग आहे ,

You either die a hero or live long enough to see yourself become the villain .

आज डिनेरियस हे वाक्य जगत आहे . सगळ्या जनतेच्या मनातली राणी असणारी डॅनी एका एपिसोड मध्येच सर्वात मोठी व्हिलन झाली .  डॅनीच ‘ मॅड क्विन ‘ अवतार बघून आता ती बऱ्याच जणांना आयर्न थ्रोन साठी योग्य वाटेना पण आपल्याला विसरून चालणार नाही  सिरीज सुरु झाल्यापासून डॅनी च एकच ध्येय आहे , आयर्न थ्रोन वरती बसायचं जो तिचा हक्क आहे . (  जॉन ‘टारगेरियन’आहे हे कळेपर्यंत तरी तिचा हक्क होताच ) . त्यासाठी बरीच फिल्डिंग लावावी लागली आहे तिला. स्वतःची दोन मुलं , सगळे विश्वासू साथीदार गमावली आहेत या थ्रोन्स साठी त्यामुळे आता ती सहजासहजी मागे फिरेल असं वाटतं नाही .

सध्या तिच्या कॅरॅक्टरमध्ये निगेटिव्ह शेड्स दिसत असले तरी तिच्या मागे असणार सैन्य , ग्रे वर्म चा बदलेला ऍटिट्यूड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रॉगोन , या सगळ्याची ताकद बघता तीच या आयर्न थ्रोन वरती बसली पाहिजे . पण शेवटी हे गेम ऑफ थ्रोन्स च जग आहे इथे कुठल्याच गोष्टीचा  शेवट आपल्याला वाटतो तसा झालेला नाही.  किंग्ज लँडिंग मध्ये डॅनी केलेला राडा कोणालाच आवडलेला नाही , ग्रे वर्म सोडता विश्वास ठेवण्यासारखी माणसे आता तिच्याजवळ नाहीत .

येणाऱ्या शेवटच्या एपिसोड चा ट्रेलर बघितला तर लक्षात येईल डॅनी  एकटीच रेड कीप मध्ये पोहचली आहे . ना तिचा ‘हँड’ टिरीयन तिच्यासोबत आहे ना जॉन . शेवटी डॅनी च आपल्या बापासारखच समोर आलेलं मॅड क्वीन च रूपच तिचा शेवट करेल काय ?

२.  जॉन स्नो – 

या कार्यकर्त्याला आयुष्यात काय पाहिजे हे अजून त्याला समजलंच नाही . नाईट्स वॉच चा लॉर्ड कमांडर हो म्हणलं तर उत्तर येत I don’t want it . लॉर्ड ऑफ विंटरफेल हो म्हणलं तर I don’t want it , बिचाऱ्याला शेवटी तो घोस्ट पण नको झाला त्यालापण तो टॉरमंड जवळ सोडून आला. आपण जॉन स्नो नसून एगॉन टारगेरिअयन आहे आणि आयर्न थ्रोन वरती सर्वात जास्त हक्क आपला आहे हे समजल्यानंतर देखील उत्तर तेच , I don’t want it. पण आता डॅनी च हे रूप बघता जनतेच्या भल्यासाठी का होईना जॉन थ्रोन वरती बसायला तयार होईल का  ? जॉन स्नो जर तयार झाला तर सगळ्या वेस्टरॉस ची जनता देखील त्याच्यामागे उभी राहील , पण यासाठी त्याच्यासमोर सर्वात मोठी अडचण असणार आहे ती डॅनीची .  आपल्या प्रेमासाठी डॅनी आयर्न थ्रोन सोडेल काय ? का जॉन स्नो च डॅनीवर असलेलं प्रेम बघता तिला ‘ मॅड क्विन ‘ च्या रूपात बघण्यापेक्षा तोच डॅनीचा शेवट करेल ?

प्रश्न लई आहेत पण गावाची इच्छा आहे तो थ्रोन वर बसावा. जेव्हा जेव्हा गरज पडली आहे तेव्हा तेव्हा मात्र त्याने खंबीर भूमिका घेतली असा त्याचा इतिहास आहे. गरज होती तेव्हा वॉलवरचे नियम मोडून  भिंती पलीकडल्या वाइल्डलीन्ग्जना वाचवण्यासाठी अलीकडे तो घेऊन आला, नाईट किंग विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी डनी पुढे एक पाउल माग घेतलं सगल्यांना खऱ्या लढाई साठी रेडी केलं. हे सगळ जॉन स्नो मुळे शक्य झालंय. तो नेड स्टार्कप्रमाणे दयाळू आणि पराक्रमी दोन्ही आहे. स्टार्क आणि टार्गेरियन दोन्हीच रक्त त्याच्यात वहातय. कुणी म्हणतो तो अझर अहोंय की काय ते आहे. एकूण काय तो लोकांना आवडतो आणि तो डिझर्व्ह देखील करतो.

उद्या समय की मांग असेल तर जॉन थ्रोनवर बसेल हे नक्की,

३.आर्या स्टार्क-

गेम ऑफ थ्रोंस सिरीयल मधलं सगळ्यांच सगळ्यात लाडक कॅरेक्टर. नेड स्टार्कच्या पोराबाळांच्यातली सगळ्यात वांड मुलगी.  सिरिओ फोरेल कडून ब्राव्होसी स्टाईल तलवारबाजी शिकली. पुढे ब्राव्होसला जाऊन नो नेम गॉडच्या आशीर्वादाने जॅकन हेगारकडून असॅसीन होण्याच प्रशिक्षण घेऊन आली. तिथून तर तिला कोणी अडवायच्या भानगडीतही पडू नये अशी तिची हवा झाली आहे.

वॉल्डर फ्रे, पीटर बेलीश अशा आपल्या लिस्ट मधल्या अनेकांना तिने तर संपवलंचं. पण या सिझन मध्ये सगळ्या मोठा आंबा तिने पाडलाय तो म्हणजे नाईट किंग. ज्या विंटरची गेली अनेक वर्षे भीती घातली जात होती तो विंटर आर्याने एका घावात संपवून टाकला. सगळ्या मानवजातीवर उपकार केलं. वेस्टरॉसच्या सर्वसामान्य व्यक्तीनां थ्रोन पेक्षा हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा होता. तो आर्याने संपवला. म्हणून ती आता तिथली हिरो आहे. आणि येत्या एपिसोड मध्ये देखील किंग्ज लँडीग पेटवून देणाऱ्या डीनेरीसवर देखील ती डाव साधू शकते.

आणखी एक महत्वाची गोष्ट या सिझन मध्ये झाली ती म्हणजे आर्याचं आणि गॅण्ड्रीचं गुटर्गु. आर्या म्हणजे स्टार्ककन्या, गण्ड्री म्हणजे बॅराथियन सुपुत्र. त्याचा थ्रोनवर वारसा हक्काने अधिकार देखील आहे. हे दोघे एकत्र आले तर मस्त राज्य करतील असं आपल्या पैकी लई जणांना वाटत. हे सगळे झाले तिच्या बाजूचे मुद्दे. पण तिच्या विरुद्ध जाणारेही काही मुद्दे आहेत.

सगळ्यात एक नंबरचा मुद्दा म्हणजे तिला आपल्या जॉन आणि ब्रान या भाऊलोकांप्रमाणे हा थ्रोन नको आहे. या सगळ्या पासून दूर जाण्याची तिची इच्छा आहे. शिवाय  ती जेवढी भारी योद्धा आहे तेव्हढी ती मोठी राजकारणी नाही आणि ब्रोन भाऊ एकदा म्हणून गेलेत त्याप्रमाणे,

“how it’s hardcore cutthroats who kill thousands and get made into a king”

आज डीनेरीस सत्ता जवळ आल्यावर खुळी झाली आणि आपल्या शक्तीचा गैरवापर करत सुटली. उद्या आर्या तसं करणार नाही कशावरून? म्हणून आर्या बाई भारी आहेत पण थ्रोन पासून दूर राहिल्या तर बरच आहे.

४.टिरियन लॅनिस्टर –  

मागच्या सिजन पर्यंत कोणी विचारलं असत कि आयर्न थ्रोन वरती बसण्याची सर्वात जास्त शक्यता कोणाची आहे तर उत्तर होत ते म्हणजे टिरियन लॅनिस्टर. टिरियन ची हुशारी , त्याचा बेरकीपणा त्याला शेवटी आयर्न थ्रोन वर बसवेल असं वाटतं होत पण या सिजन मध्ये टिरियन ची अवस्था बघता तो डॅनीच्या हातून मरण्याचीच शक्यता जास्त आहे .

पण समजा टिरियन ला शिक्षा देण्याच्या आधीच जर डॅनी मेली आणि जॉन ने आयर्न थ्रोन ला नकार दिला तर टिरियन आयर्न थ्रोन वरती बसू शकतो . टिरियन ला राज्य सांभाळायचा अनुभव देखील आहे, जॉर्ज आर आर आबांनी टिरीयन टारगेरियन असू शकतोय असा पिल्लू वेळोवेळी सोडलाय. तसं असेल तर त्याला तर थ्रोनवर बसण्याचा अधिकारही प्राप्त होतो. अशा अनेक गोष्टी त्याच्या बाजूने आहेत त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तिसऱ्या एपिसोड मध्ये त्याच्या आणि सानसा च्या रिलेशन ला पुन्हा एकदा हळुवार का होईना झालेली सुरुवात .

नॉर्थ मधील स्टार्क फॅमिली आणि साऊथ मधील लॅनिस्टार्स सानसा आणि टिरियन च्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात. राज्य करण्यात कोणताच इंटरेस्ट नसलेले इतर स्टार्क म्हणजे आर्या , ब्रान आणि जॉन चा देखील याला विरोध होईल असं वाटतं नाही. जर लढायचीच वेळ आली तर सानसा च्या मदतीने नॉर्थ ची आर्मी टिरियन च्या मागे उभा राहू शकते. सर डावोस सारखा माणूस देखील टिरीयनलाच मदत करेल , जुने संबंध बघता ऐनवेळी ब्रॉन देखील समोर येऊन टिरियन ला आयर्न थ्रोन मिळवून द्यायला मदत करू शकतो.

५. सान्सा स्टार्क –

सध्या सगळ्या सेव्हन किंगडम मध्ये जर ‘ राजकारण ‘ कोणाला जमत असेल तर ते सानसाला . सर्सी लॅनिस्टर आणि लिटिलफिंगर बरोबरच्या सहवासात तिला जे काय बरे वाईट धडे मिळाले आहेत त्याने ती या खेळात चांगलीच तयार झाली आहे . जॉन ने विश्वासाने सांगितलेलं आपलं गुपित तिने अजिबात वेळ न घालवता टिरीयन जवळ फोडलं . या एका गोष्टीमुळे पुढे किती राडा झाला आहे आपण बघितलंच . व्हॅरिसला डॅनीने ड्रकारिस केलं , जॉन आणि टिरीयन ने आपल्याला धोका दिला असं समजून त्यांच्यापासून लांब झाली. हे सगळं असच घडणार असा अंदाज असल्यानेच सानसा ने टिरीयन ला जॉनच सत्य सांगितलं असं वाटतं. म्हणजे डॅनीचा आयर्न थ्रोन वरचा हक्क डळमळीत करायला खरी सुरुवात सान्सानेच केली आहे.

उद्या जॉन का सान्सा असा पर्याय आला तर नॉर्थ चे लोक सान्सालाच पाठींबा देतील कारण तीच आता सर्वात मोठी स्टार्क आहे . तिच्या मुळेच बॅटल ऑफ बास्टर्ड नॉर्थ ला जिंकता आलं. आपल्या कुटुंबावरच प्रेम बघता आर्या सुद्धा जॉन पेक्षा सान्साच्याच पाठीमागे उभा राहील. राहता राहिला टिरियन चा प्रश्न तर त्याला सानसा बद्दल सॉफ्ट स्पॉट आहेच. पहिला डाव तर सानसा ने व्यवस्थित खेळला आहे . ब्रान च्या मदतीने थोडंफार पुढच्या गोष्टींचा तिने अंदाज घेतला तर हि लेडी ऑफ विंटरफेल लवकरच आपल्याला क्विन ऑफ सेव्हन किंगडम झालेली दिसेल.

६. ब्रान स्टार्क

सिरियलच्या पहिल्याच एपिसोडमध्ये हा उंच टॉवरवरून खाली पडला. पडला म्हणजे काय त्याला जेमीने खाली टाकलं. पण गडी वाचला, दोन्ही पायावर निभावलं. याच घटनेन स्टार्क विरुद्ध लॅनीस्टर या घराण्यातली भांडण चव्हाट्यावर आली आणि गेम ऑफ थ्रोन्सला सुरवात झाली.

तसं म्हटल तर ब्रान हा सुरवातीपासून या गेम चा महत्वाचा खेळाडू आहे. आता तर तो थ्री आईड रेव्हन झालाय. त्याला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ सगळीकडे फिरून येण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. त्याच्या या दैवी शक्तींमुळे तो लंगडा असूनही इतर कोणाही पेक्षा अनेक पटीने ताकतवान झाला आहे. शिवाय तो स्टार्क घराण्याचा एकुलता एक जिवंत असलेला पुरुष आहे. नेड स्टार्कच्या पुण्याईने स्टार्क लोकांबद्दल फक्त नॉर्थच नाही तर पूर्ण वेस्टोरस मध्ये एक सिम्पथी आहे. यामुळेच टारगेरियन , बॅराथियन, लॅनीस्टर यांच्या ऐवजी स्टार्कना थ्रोन वर बसवण्याची टूम निघाली तरी ब्रानला खुर्ची मिळू शकते.

सगळ्यात मह्त्वाचे ब्रान यासाठी तयार आहे की नाही?

जॉन प्रमाणेच ब्रानने देखील आपल्याला काहीच नको हे आधीच सांगून ठेवलय. जेव्हा टिरीयन त्याला लॉर्डऑफ विंटरफेल होण्याबद्दल बोलतो तेव्हा ब्रान अगदी निर्विकारपणे “I really dont want it” असं सुनावतो. आता झालंय असं की मरण्यापूर्वी वॅरिस बाबा सांगून गेलाय की,

” the best ruler is someone who doesn’t want to rule.”

आता हे जर खर म्हणायचं झालं तर ब्रान खुर्चीच्या रेस मधून अजून आउट झाला नाही असच मानावं लागेल. आणि आमच्या खास सूत्रांनी सांगितलंय की लोकांना शॉक बसवण्यासाठी फेमस असलेल्या या सिरीयलच्या निर्मात्यांनी ब्रान थ्रोनवर बसल्याच शुटींगही केलंय. खर खोट परवाच कळेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.