रिहानाला मुस्लिम समजत आहात, थांबा तिला तर मस्जिदीमधून बाहेर काढण्यात आलं होतं…

हॉलिवूडची सुप्रसिद्ध पॉप गायिका रिहाना. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळा तिने आपल्या गोड आवाजाने सुरेल केला होता. पण आज हीच गोड गळ्याची गायिका तिच्या आक्रमक ट्विट साठी चर्चेत आली आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत,

‘आपण या बाबतीत काहीच का बोलत नाही? #FarmersProtest.

असं म्हणत तिने आज गाण्याऐवजी ट्विटनं भारतीयांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

 

मग यानंतर लगेचच गायिकेच्या पलीकडे जातं लोकांनी तिच्या बद्दलची सगळी माहिती शोधायला सुरवात केली. कोण आहे ही रिहाना?

तर रिहाना हि हॉलिवूडची सगळ्यात सुप्रसिद्ध पॉप-सिंगर आहे. तिचं मुळ नाव रॉबिन रिहाना फेंटी. बार्बाडोस या कॅरिबिनय बेटांमधल्या देशात १९८८ साली तिचा जन्म झाला आणि ती तिथेच लहानाची मोठी झाली. अमेरिकतले प्रोड्युसर एव्हन रॉजर्स यांनी २००५ मध्ये म्हणजे ती १७ वर्षाची असताना तिचा आवाज ऐकला आणि तिला अमेरिकेत यायचं आमंत्रण दिलं.

२००५ सालीचा तिचा पहिला अल्बम प्रसिद्ध झाला.

यानांतच तिला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली.

२००६ मध्ये ‘गर्ल लाईक मी’ या अल्बममधील गाण्यांनी तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यावर्षीच्या १३ देशांमधील टॉप १० गाण्यांमध्ये तिच्या गाण्याला स्थान मिळालं होतं. पण तिला खऱ्या अर्थाने सुपरस्टार बनवलं ते ‘गुड गर्ल गॉन बॅड’ या अल्बमने.

आज ३२ वर्षांची असलेली रिहाना बिलबोर्ड हॉट १००’ या यादीत स्थान मिळवणारी सर्वांत कमी वयाची गायिका आहे. आजवर ८ ग्रॅमी पुरस्कार तिच्या नावावर आहेत. सोबतच ती सगळ्यात जास्त मानधन घेणारी गायिका बनली.

फोर्ब्स मासिकनुसार तिची एकूण संपत्ती ६०० मिलियन डॉलर (भारतीय रुपयात ४ हजार ४०० कोटी). २०१९ या वर्षांत फोर्ब्सने तिला जगातील सर्वात श्रीमंत गायिका म्हणून घोषित केलं होतं.

अधून मधून तिच्या गाण्यांच्या व्हिडीओवरून देखील वाद निर्माण होत असतात. उदा. २०१५ साली आलेल्या ‘बेटर हॅव माय मनी’ या व्हिडिओवरून वाद उभा राहिला होता. त्यात नग्नता, शिव्या आणि हिंसा असं सगळं दाखवल्यामुळे जास्त चर्चेत आला होता.

आता ही सगळी माहिती मिळाल्यानंतर लोकांनी तिच्या धर्माबद्दल गुगलवर सर्च करायला सुरुवात केली. तिच्या नावावरून रिहाना मुस्लिम आहे का? रिहानाचा धर्म? अशा वेगवेगळ्या टॅग्स वापरून तिच्या धर्माबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. 

1612322877 untitled design

तर सांगायचं असं की लोक ज्या सर्च करताना तिला मुस्लिम म्हणतायत पण,

रिहाना जन्मजात ख्रिस्चन आहे. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखती दरम्यान तिने स्वतः ही माहिती दिली होती.

Rihanna extends her support to Indian farmers; Asks people 'Why aren't we talking about this?!' on Twitter | PINKVILLA

यासोबतच तिला मुस्लिम धर्मियांकडून विरोध झाल्याचं आणि त्यावरून वाद झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं.

गोष्ट आहे २०१३ मधली.

ती आपल्या एका कार्यक्रमासाठी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी असलेल्या अबुधाबीला गेली होती. मुक्कामादरम्यान ती इथल्या मस्जिदीमध्ये गेली होती. यानंतर ती मस्जिदीच्या आवारात फोटो काढू लागली होती. पण हे फोटो ती इतरांना लज्जा उत्पन्न होईल अशा पोझ मध्ये आणि परवानगी न घेता काढत असल्याचं सांगत तिथल्या शेख झायेद यांनी रिहानाला बाहेर काढलं होतं.

हे फोटो नंतर तिने इंस्टाग्रामवर टाकले होते. इथे देखील तिला बऱ्याच वादाला तोंड द्यायला लागलं होतं.

यानंतर २०२० मध्ये ती पुन्हा एकदा मुस्लिम कडव्याच्या वापरावरून वादात सापडली होती. 

२०१७ मध्ये तिने आपला ‘फेंटी’ या नावाने फॅशन आणि ब्युटी ब्रँड सुरू केला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये याच ब्रँडचा एका सॅव्हेज एक्स फेंटीया फॅशन-शो तिने आयोजित केला होता. या फॅशन-शो दरम्यान प्लेबॅक गाण्यात तिने इस्लामी हादीसमधली एक कडवं वापरलं होतं. 

हा शो अमेझॉन प्राईमवर दाखवला गेला आणि यात अंतवस्त्रांच्या प्रकारांचं प्रदर्शन झालं.

यानंतरच वादाला तोंड फुटलं होतं. इस्लाम धर्मात श्रद्धा आहे की हादीस प्रेषित मोहम्मदांनी उच्चारलेले शब्द आहेत. यानंतर या वादावर रिहानाने जाहीर माफी मागितली होती.

आता पुन्हा एकदा आजच्या ट्विटमुळे रिहाना तिच्या गाण्याव्यतिरिक्त दुसऱ्या विषयासाठी चर्चेत आली आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.