सुशांत सिंगच्या मृत्यूला २ वर्षे होत आलेत तरी #JusticeforSSR रोज कोण ट्रेंडिंगला आणतंय?

इंडियातले लोकं इमोशनल आहेत हे तर आपल्याला माहीत आहेच. आणि त्यात त्यांना पिक्चरचं एक भलतंच येड. आपल्या आवडत्या हिरोच्या मृत्यूनंतर अगदी त्याची मंदिरं बांधून त्याची पूजा केल्याचीही उदाहरणं तुम्ही ऐकलं असतील.

त्यात सुशांत सिंग राजपूतचं पण नाव जोडता येइल. मानलं चटका लावून जाणारी एक्झिट सुशांत सिंग राजपूतने घेतली होती. जून  २०२० मध्ये राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  लॉकडाऊनमुळे घरात बसलेला आक्खा भारत हळहळला होता.

मात्र हा विषय इथंच थांबला नाही. आज दीड वर्षांपेक्षा जास्त काळ उलटुनपन लोकं काय हा विषय थंड होऊन द्यायला तयार नाहीयेत. 

#justice for SSR  आजही ट्रेंडिंगला असतोय. बर अधून मधून नाही तर रोजच टॉपच्या ट्रेंडमध्ये तुम्हाला हा हॅशटॅग दिसेल. त्यामुळं मग म्हटलं तर बघावं नक्की  ही लोकं कोण आहेत जी रोज एवढी मेहनत घेत आहेत. आणि जसं जसं डीप गेलो तसं तसं हे वेगळंच प्रकरण असल्याचं पुढं आलं.

#JusticeForSSR आणि  #Justice4SSR हे पहिल्या हॅशटॅगपैकी त्यानंतर #Warriors4SSR, #Revolution4SSR, #ArrestRhea, असे हॅशटॅग अधून मधून ट्रेंड होऊ लागले.

तर हा हॅशटॅग चालवणारी पहिली गॅंग होती भोळी भाबडे सुशांतसिंग राजपूतचे फॅन्स आणि त्यांचा फायदा घेणारे ग्रुप ऍडमिन्स. म्हणजे सुरवातीला ह्या ऍडमिन्सनी लोकांचे सेंटीमेंट्स बघून ग्रुप्स काढले. आणि मग लाखाच्या आसपास फॉलोइंग गेल्यानंतर एकत्र येऊन मग हे हॅशटॅग चालवतात.

उदाहरणार्थ ऑक्टोबर २०२० मध्ये  “JUSTICE_FOR_SUSHANT” या नावाने चालणाऱ्या गुओच उद्धरण घेऊ . या ग्रुपचे तेव्हा 119.1 k सदस्य होते. अठ्ठावीस वर्षीय कैजाद बानाजी हा ग्रुपचा ऍडमिन आहे. मुंबईतील आयटी क्षेत्रातील या कर्मचाऱ्याने दोन वर्षांपूर्वी सुशांतसिंग राजपूत याला भेटला होता. तेव्हापासूनच तो त्याचा फॅन झाला होता.

THE QUINT  शी बोलतांना तो सांगतो सुशांतसिंग राजपूत स्वत:चा जीव घेऊ शकतो यावर विश्वास ठेवणे त्याला अवघड वाटले आणि यामुळे त्याला फेसबुक पेज, एक इंस्टाग्राम हँडल तयार करून केसशी संबंधित आपले विचार आणि मते मांडण्यास  केली. बनजीने  सांगितले की दिवसासाठी हॅशटॅग ठरवणारे कोणीही नाही. कोणीतरी एक Twitter वर हॅशटॅग पोस्ट करणे सुरू करतात आणि ज्यामध्ये सर्वाधिक ट्विट असतात तो दिवसाचा हॅशटॅग बनतो.

पण हे झालं त्याचं सुरवातीचं काम आता त्यानं ग्रुपचं नाव चेंज करून हिंदुत्व असं केलं आहे.

 बहुतेक त्याला त्याची टार्गेट जनता वाढवायची असावी.

WhatsApp Image 2022 04 11 at 5.23.51 PM 1 पण तरी हे काय पटण्यासारखं नाहीये कि एवढ्या दिवस एवढे हॅशटॅग रोज ट्रेंड होत आहेत आणि कोणी हे सगळं कॉर्डीनेट नाही करतेय. 

मग म्हटलं ट्विटरवर कोण ट्रेंडिंगला हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये नेतंय ते बघावं. 

तर मग शोधता शोधता एक नाव पुढं आलं नीलोत्पल मृणाल.  newslaundry च्या एका स्टोरीमध्ये याच्याबद्दल माहिती मिळते. तो “जस्टिस फॉर SSR” ट्विटर मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे. तो  किमान तीन टेलीग्राम गट आणि 6,000-8,000 व्हॉलेंटीअर्सना हातळतो.

दररोज सकाळी आणि संध्याकाळी, न चुकता,  एक नवीन टॅगलाइन पोस्ट करणे -जसं की Justice delayed for SSR.  मग तो त्याच्या टेलिग्राम ग्रुप्सवर टाकणे आणि ती त्याच्या ट्विटर टाइमलाइनवर पिन करने हा त्याचा ठरेलला दिनक्रम असायचा. मग काही वेळातच ही टॅगलाइन  ट्विटरवर ट्रेंडिंग व्हायला सुरु व्हायची.

बिझनेसमन असेलल्या या भाऊला पॉलिटिक्सचा पण नाद आहे.

त्यातच त्याने सांताक्रुज मधून मुंबईच्या नगरसेवक पदाची निवडणूक पण लढवली आहे. मध्ये त्याचे भाजपच्या नेत्यांबरोबरचे फोटो पण पुढे आले होते. त्याच ओरिजनल अकाउंट सस्पेंड करण्यात आल्यानंतर हा भाऊ Nilotpal -Specially Abled Champion या नावाने आता अकॉउंट चालू केलं आहे. तसेच सुशांत सिंग राजपूतच्या आठवणी जपण्यासाठी त्यानं immortalsushant ही वेबसाइट पण चालू केली आहे, या वेबसाइट वरून तो आजही ssr चा विषय ट्रेडिंगवर आणण्याचं काम करत असतो.

आजही त्याच्या अकॉउंटवरून ट्रेंडच टार्गेट सेट केलं जात असल्याचं पाहायला मिळतं.

WhatsApp Image 2022 04 11 at 6.16.01 PM

बाकी असे भरपूर फॅन्स पण आहेत जायना सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळाला नाही असं वाटतं आणि ट्विटरवर ट्रेंड आणून ते त्याला न्याय मिळवून देऊ शकतात.

SSR फॅन्सच्या या अशा ट्रेंड चालवण्याबद्दल Anatomy of a Rumour: Social media and the suicide of Sushant Singh Rajput असा एक रिसर्च पेपर पण आला होता .

त्यातपण या ट्रेड्सबद्दल इंटरेस्टिंग माहिती मिळते.  सुशांत सिंग राजपूतवरील ट्विट्सना इतर विषयांवरील ट्विटपेक्षा सरासरी अधिक रिट्विट्स मिळतात.  काही टीव्ही चॅनेलसाठी  हा ट्रेंड फायदेशीर ठरतो. ज्यामध्ये रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ या चॅनेल्सचा समावेश आहे.

बाकी तुम्हाला जर रोज रोज SSR फॅन्सची हे ट्रेंड बघायची उबग आली असेल तर तुम्ही त्याला ब्लॉक करू शकताय. 

ट्विटरच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन कन्टेन्ट प्रेफरन्स मध्ये हे हॅशटॅग्स टाकून हा ट्रेंड तुम्हाला म्युट करता येइल.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.