‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ लिहणारे संजय बारु कॉंग्रेसचे की भाजपचे ? 

तुम्ही पत्रकार आहात. कोणत्या पक्षाचे…? 

तुम्ही लेखक आहात. कोणत्या पक्षाचे….? 

पत्रकार आणि लेखक हे दोन वर्ग सध्या लोकांच्या रडारवर असतात. कोणीही येत आणि पत्रकार म्हणल्यानंतर कोणत्या पक्षाचे आणि लेखक म्हणल्यानंतर कोणत्या पक्षाचे हे ओघानं विचारतं. प्रामाणिक असणारे हसतात. बाकीचे देखील हसतातच. फक्त हसणं वेगळ असतं इतकच. 

थोडक्यात सांगायच झालं तर हल्ली पत्रकार आणि लेखक हा कोणत्यातरी वृत्तीने लिहतोच अस म्हणण्याची एक प्रथाच आली आहे. आणि एक व्यक्ती पत्रकार आणि लेखक दोन्ही असेल त्यातही त्याच्या भूमिका राजकिय असतील तर तो नेमका कोणाचा याची चौकशी तर केलीच जाणार. तसची माणूस हातात पेन उचलतो तेव्हाच राजकारणाला सुरवात होते. माणूस तटस्थ असला तरी ती देखील एक भूमिकाच असते. कित्येक वर्षांपुर्वी कॉंग्रेसच्याच धोरणांबद्दल एक वाक्य ऐकलं होतं, कोणतिही भूमिका न घेणं हि देखील एक भूमिका असते. तसच लेखक आणि पत्रकारांच देखील असतच. 

आत्ताही तसच होतय. संजय बारू हे नाव सध्या देशाच्या राजकारणात दूसऱ्यांदा गाजतय. एक लेखक इलेक्शनच्या टायमिंगला एकाच गोष्टीमुळे गाजावा हा तसा दुर्मिळ योग. तसही लेखकांना गाजताना फक्त आपण साहित्य परिषदेच्या निवडणुकांमध्येच बघतो. मराठी लेखक सहजा असे गाजत नाहीत. ते भाग्य हिंदी किंवा इंग्लीश लेखकांच्याच. 

संजय बारू मुळचे कुठले. 

संजय बारू यांचे वडिल प्रशासकिय अधिकारी होते. संजय बारू यांचे वडिल बीपीर विठल मनमोहन सिंग यांचे मित्र होते. विठल वित्त व योजना विभागाचे सचिव असताना मनमोहन सिंग वित्तसचिव होते. मनमोहन सिंग आणि विठल यांचे कोटुंबिक संबध होते व त्या नात्यानेच मनमोहन सिंग यांनी लहानपणापासून संजय बारू यांना पाहीलं आहे. 

असो, तर मुळ प्रश्न हा कि हे संजय बारू नेमके कुणाचे आहेत. कॉंग्रेसचे की भाजपचे. 

संजय बारूंची मुळ ओळख अर्थतज्ञ आणि पत्रकार. पुस्तकामुळे त्यांची ओळख आत्ता राजकिय लेखक अशी झाली असली तरी त्यांच मुळ हे पत्रकाराच. “द इकोनॉमिक टाइम्स’ मध्ये ते असोसिएट एडिटर होते तर बिझनेस स्टेंडर्डमध्ये ते चीफ एडिटर होते. 

2004 साली पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार म्हणून निवड. 

एक चांगला आणि तटस्थ (हि देखील राजकिय भूमिका असते) पत्रकार व अर्थतज्ञ म्हणून त्यांची मे 2004 साली पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. ऑगस्ट 2008 अखेर ते माध्यम सल्लागार म्हणून काम करत होते. फक्त माध्यम सल्लागारच नाही तर पंतप्रधानांचे प्रवक्ता म्हणून देखील ते कारभार संभाळत होते. या पदावर असताना त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाला अडचणीत आणतील अशी कोणतीच भूमिका, वक्तव्य जाहिरपणे केल्याच दिसत नाही. 

 2008 ला पदावरुन मुक्त झाल्यानंतर पुस्तक लिहण्यास सुरवात केली. 

संजय बारू यांनी ऑगस्ट 2008 नंतर पुस्तक लिहण्यास सुरवात केल्याच सांगण्यात येत. पण या पुस्तकाबद्दल ते अत्यंत गोपनीय होते. त्याची वाच्यता त्यांनी कोठेच केली नव्हती. 2014 च्या सुरवातीला त्यांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली होती त्यामध्ये त्यांनी मला असे पुस्तक लिहण्याची इच्छा असल्याच वक्तव्य केल होतं. मात्र त्यापुर्वीच त्यांनी पुस्तक लिहण्यास सुरवात केली असल्याचं सांगितल जातं. त्यांच्या मुलाखतीनंतर बऱ्याच पत्रकारांनी त्यांची भेट घेण्यास सुरवात केली. 

पुस्तक लिहल्यानंतर ते पंतप्रधान मनमोहनसिंग यांना दाखवण्यात आलं होतं व त्यानंतर त्यांनी काही गोपनीय गोष्टी दूर करण्यास सांगितल्यानंतर त्या दूर करण्यात आल्याचा दाखला बारू यांनी एका मुलाखतीमध्ये दिला होता. ते असही म्हणाले होते की, सरकारच्या गोपनीयतेचा भंग होईल असा कोणताच भाग मी लिहला नाही. ते पत्रकार आहे, ते लेखक आहेत व ते तटस्थ आहेत. तटस्थ असणं फायद्याचं असतं कारण वेळप्रसंगी आपली तटस्थपणाची भूमिका जाहिर करता येते. त्यांनी काय लिहलं याहून अधिक त्यांच टायमिंगच अधिक सांगून जातं. एप्रिल 2014 ला पुस्तक प्रकाशित होणं व जानेवारी 2019 ला सिनेमा येणं हा ओघाओघाने होवू शकतं म्हणणारे नक्कीच हुशार म्हणावे लागतील. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.