तुम्हाला माहिती आहे काय फिर हेरा फेरी मधला तो लंबू खऱ्या आयुष्यात पोलिसवाला आहे..

बॉलिवूडच्या टॉप कॉमेडी फिल्म्स पैकी एक म्हणजे हेरा फेरी सिरीज. जवळपास भारतभरात सगळ्याच लोकांनी हा सिनेमा पाहिला असेल आणि भयंकर हसून ते बेजार झालेले असतील. अक्षय कुमार,परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिघांनी या सिनेमात अक्षरशः जीव ओतून काम केलेलं आहे. हेरा फेरीची दुसरी फ्रेंचायची म्हणजे फिर हेरा फेरी. 2006 मध्ये रिलीज झालेल्या हेरा फेरी मध्ये अक्षय कुमार,परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिघां व्यतिरिक्त जॉनी लीवर, राजपाल यादव, रज़ाक ख़ान, सुनील पाल आणि सुरेश मेनन अशी भयंकर कॉमेडी पात्र होती.

या सिनेमामध्ये एक असं पात्र होतं ज्याचा चेहरा ना बाबू भैय्याने पाहिला,ना राजुने ना शामने ना आपणही पाहिला. काळ्या कपड्यांमध्ये असलेला हा लंबू नक्की कोण होता ? पहिल्यांदा जेव्हा घनश्याम त्याला बघतो तेव्हा तो म्हणतो आयला इसका मूह किधर है ? त्यावर राजू म्हणतो फर्स्ट फ्लोर पे देख. हा इतका उंच माणूस सिनेमाभर दिसत नाही मात्र जेव्हा जेव्हा तो दिसतो त्याची मान ही थेट दुसऱ्या मजल्यावर असते.

हेराफेरी मध्ये दिसलेला हा उंच माणूस खऱ्या आयुष्यात एक पोलिसवाला आहे. त्याचं नाव आहे जगदीप सिंग. पंजाब पोलिसमध्ये हेडकॉन्स्टेबल पदावर ते कार्यरत आहेत. अमृतसरचे असलेले जगदीप सिंग फक्त पंजाबमध्ये वा भारतातच नाही तर पूर्ण जगभर फेमस आहे. जगदीप सिंग यांच्या नावे जगातला सगळ्यात उंच पोलिसवाला असण्याचं रेकॉर्ड आहे.

images 9

35 वर्षांचे जगदीप सिंग हे द ग्रेट खली पेक्षाही 5 इंच अधिक उंच आहेत. जगदीप सिंग यांची उंची ही 7 फूट 8 इंच आहे. जगदीप जेव्हा रस्त्यावरून चालू लागतात तेव्हा त्यांना बघण्यासाठी लोकांची गर्दी होते. मागच्या 18 वर्षांपासून जगदीप सिंग हे पंजाब पोलिसमध्ये कार्यरत आहेत. त्यांना बघून भले भले गुन्हेगार गार होतात.

फक्त पोलिसच नाही तर फिल्म इंडस्ट्री मध्येसुद्धा त्यांची ओळख आहे. आजवर जगदीप सिंग हे रंग दे बसंती, फिर हेराफेरी, तीन थे भाई आणि वेलकम न्यूयॉर्क अशा बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय करून आपला वेगळा फॅनबेस तयार करून बसले आहेत.

images 10

जगदीप सिंग हे इतके उंच आहेत की त्यांच्या उंचीचे कपडे आणि बूट अमेरिकेतून मागवावे लागतात. 19 नंबरचा शूज आणि 190 किलो वजन ही जगदीप सिंग यांची ओळख आहे. इतकी प्रचंड हाईट असल्याने जगदीप सिंग यांना लग्नाला बऱ्याच अडचणी आल्या होत्या पण शेवटी त्यांचं लग्न झालं.

जगदीप सिंग सांगतात की माझ्या उंचीमुळे आज मला सगळे ओळखतात त्यामुळे मला माझ्या उंचीवर गर्व आहे आणि तीच माझी ओळख आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.