अमेरिकेतला सर्वात मोठ्ठा शेतकरी कोणाय माहिताय का..? …”बिल गेट्स”

बिल गेट्स जगातल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती व्यक्तींपैकी एक. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वात दानशूर व्यक्तींपैकी देखील एक.

पण याहून एक वेगळी ओळख त्यांच्याच नावावर आहे, अन् ती म्हणजे…

अमेरिकेतले सर्वात मोठ्ठे शेतकरी…

गेट्स यांच्याकडे तब्बल २ लाख ६९ हजार एकर जमीन असून त्यातील सर्वाधिक ही शेतजमिनी आहे. तेही अमेरिकेतील १८ राज्यात. अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन असणारे बिल गेट्स एकटे आहे.

त्यांनी ही शेत जमीन मागच्या १० वर्षात विकत घेतल्याचे सांगण्यात येते. 

लुसियाना प्रांतात ७० एकर शेत जमीन असून तेथे सोयाबीन कापूस आणि तांदळाचे पीक घेतल्या जाते. नेब्रास्का प्रांतात २० हजार एकर, वॉशिंग्टन मध्ये १४ हजार एकर जमीन आहे. मॅकडोनल्ड मध्ये मिळणारे फ़्रेंच फ्राईज हे बिल गेट्स यांच्या शेतातून येणाऱ्या बटाट्यापासून बनविण्यात येतात. तसेच वॉशिंग्टन मधील शेत तर अंतराळातून दिसत असल्याचा दावा केला जातो. 

अरबपती असणारे बिल गेट्स हे शेती का विकत घेत आहे. 

बिल गेट्स यांना शेती संदर्भात एका मुलाखतीत सांगितले की,

भविष्यात शेती क्षेत्र हे महत्वाचं ठरणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतजमिनीची खरेदी इनव्हेसमेंट म्हणून केली आहे. त्याचा हवामान बदलाशी काही संबंध नाही. मी शेतीकडे बिझनेस म्हणूनच पाहतो. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात शेतजमिन खरेदी केली आहे. शेतीबरोबरच काही जमिनीवर स्मार्ट सिटीज बनविण्यात येणार आहे. ऍरिझोना प्रातांत स्मार्ट सिटीसाठी जमीन खरेदी केल्याचे गेट्स सांगतात.

गेट्स यांनी शेल कंपन्या तयार करून या जमिनी विकत घेतल्या आहेत. तसेच जमिनीतून आर्थिक परतावा मिळत असल्याने बिल गेट्स यांनी हे पाऊल उचलल्याचे अमेरिकेतील अर्थतज्ञ सांगतात. 

अमेरिकेच्या ऍग्रीकल्चर विभागाकडून सांगण्यात आले आहे की,

अमेरिकेतील ३० टक्के शेतकरी शेती कसत नाहीत आहे. या शेतकऱ्यांनी एका दशकापूर्वी या जमिनी विकत घेऊन ठेवल्या आहेत. यातील काही शेतकरी एक तर खूप श्रीमंत आहेत किंवा यांच्याकडे शेती करण्याएवढे पैसे नाहीत. त्यामुळे हे शेतकरी शेती करत नाही. 

अमेरिकेतील कृषी तज्ञ सांगतात,

बिल गेट्स शेतीकडे वळले तर अमेरिकेत शाश्वत शेतीला त्याची मदत होईल. तसेच बिल गेट्स यांनी आफ्रिका आणि इतर विकसनशील देशातील कृषी क्षेत्रातील लहान शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे माध्यमातून २००८ पासून शेतकऱ्यांना २ हजार २३८ कोटी रुपये मदत केली आहे. 

अमेरिकेत शेत जमीन विकण्याचा ट्रेंड मागच्या १० वर्षात वाढला आहे. 

अमेरिकेत सामान्य शेतकऱ्यांचा शेत जमीन विकण्याकडे कल असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. तेथे दररोज सरासरी २ हजार एकर पेक्षा जास्त शेत जमीन विकल्या जाते.

अमेरिकेचा विचार करायला गेलात तर २०११ मध्ये १०० मोठ्या उद्योजकांकडे ३२.७ मिलियन एकर शेतजमीन होती. ती आता ४२.१ मिलियन एवढी झाली आहे. ज्या-ज्या ठिकाणी उद्योजकांनी शेत जमिनी विकत घेतल्या आहेत तेथे घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

६६ वर्षीय बिल गेट्स यांची एकूण संपत्ती १३० अब्ज डॉलरची आहे. शेतीचे उत्पन्न हे शाश्वत असल्याचे गेट्स सांगतात.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.