बाबरी पाडल्याचा लालकृष्ण अडवाणींना पश्चाताप होता आणि तसं त्यांनी बोलूनही दाखवलं होतं

भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात जाऊन पार्टीला मोठा करणाऱ्या घटना आणि नेते यांचा विचार करायचा झाल्यास एक कॉम्बिनेशन आपसूकच डोळ्यासमोर येतं ते म्हणजे अडवाणी आणि बाबरी.

आपल्या रथयात्रांच्या जीवावर अडवाणींनी राममंदिर मुद्याला राष्ट्रीय मुद्दा बनवलं होतं आणि परिणामी भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष.

६ डिसेंबर १९९२ रोजी, भारतीय जनता पक्षासह विविध कट्टर हिंदू संघटनांच्या जमावाने अयोध्येतील सोळाव्या शतकातील बाबरी मशीदीचा ढाचा पाडला होता. ६ डिसेंबर रोजी अडवाणी प्रत्यक्षात अयोध्येत उपस्थित होते आणि त्यांच्या डोळ्यादेखत बाबरी पाडण्यात आली होती. एका ठिकाणी त्यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न देखील केला होता पण त्यात त्यांना यश आले नाही.

बाबरी पाडल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य संचालकांपैकी एक असलेल्या के. सुदर्शन यांनी अडवाणींना घडलेल्या घटनेची जबाबदारी घ्या असं म्हटलं होतं.

त्यावर अडवाणी यांनी या कृत्याबद्दल “जाहिरपणे माफी मागू” असं उत्तर दिलं होतं.

त्यानंतर त्याच महिन्यात दिल्ली येथील एका भाषणात अडवाणी या घटनेबद्दल माफी मागण्याच्या अगदी जवळ आले होते. या भाषणात अडवाणी यांनी त्यांना बाबरी पाडल्यामुळे का दुःख होत आहे याची तीन कारणं सांगितली होती. 

अडवाणी म्हणतात कारसेवेमधील ६ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस ठरला. 

तिथं उपस्थित बहुतेक लोक आनंदी होते परंतु या आनंदात सामील होऊ शकले नाहीत. त्यादिवशी मला जेवढे दु:ख आणि दु:ख वाटले आहे तेवढे फार कमी प्रसंगी मला वाटले आहे.

यामागचं कारण अयोध्या आंदोलनाविषयी किंवा पक्षाने स्वत:साठी निवडलेल्या मार्गा किंवा ‘आम्ही ज्या सिंहावर स्वार होतो जिथून आम्हाला कसे उतरायचे ते कळत नव्हते’ असलं काय नव्हतं तर पुढील तीन कारणं होती.

असं म्हणून अडवाणी यांनी तीन कारणं सांगितली.

पहिलं म्हणजे,

 ६ डिसेंबरच्या घटनांमुळे भाजप आणि आर एस एसच्या शिस्तप्रिय प्रतिमेला मोठा धक्का बसला होता.

कॅडर बेस असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी या दोन संस्था त्यांच्या शिस्तीसाठी ओळखल्या जायच्या. स्वतः अडवाणी एक शिस्तप्रिय नेता म्हणून प्रसिद्ध होते. पण अडवाणी सांगतात ”बाबरी पाडताना अयोध्येत जमलेल्या २ लाखांहून अधिक लोकांपैकी एक मोठा टक्का भाजप किंवा आरएसएसशी संबंधित नव्हता पण यामुळे आपली जबाबदारी सुटत नाही.”

दुसरा म्हणजे,

कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता ध्येय राममंदिर बांधण्याचा जो प्लॅन आखण्यात आला होता तो अयशस्वी झाला.

अडवाणी म्हणाले मंदिर बांधण्याच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी जो आराखडा भाजपातर्फे तयार करण्यात आला होता त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता किंवा न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाकडे दुर्लक्ष न करता केला ते केलं जाईल असं ठरलं होतं. मात्र त्यामध्ये आता आम्हाला अपयश आले आहे याचे मला दुःख आहे. भाजपाला राममंदिराचा मुद्दा चर्चेत ठेवायचा होता. 

तसेच पुढे जाऊन कल्याण सिंग यांचं उत्तरप्रदेश सरकार मंदिर उभारण्यासाठी कायदा आणणार होतं आणि जर या कायद्याला केंद्रातून आडकाठी करण्यात आली असती तर भाजप लोकांमध्ये तो मुद्दा घेऊन जाणार होती.

भाजपबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील या प्लॅनला हिरवा कंदील दाखवाला होता. मात्र हा सगळा प्लॅन ६ डिसेंबरला बाबरी पाडल्याने धुळीस मिळाला होता.

तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे,

६ डिसेंबरच्या बाबरी पडण्याच्या घटनांमुळे भाजपची प्रतिमा डागाळली

अयोध्येच्या घटनेनंतर ३ राज्यातली भाजपा सरकारे बरखास्त करण्यात आली होती. त्यामुळं भाजपाला तो मोठा धक्का होता.

त्याचबरोबर अडवाणी आपल्या भाषणात म्हणाले तसं भाजपच्या मते अयोध्या आंदोलन हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे जनआंदोलन आहे.

केवळ मंदिर बांधण्यासाठीच नाही तर राष्ट्राची सांस्कृतिक ओळख पुनर्संचयित करण्यासाठी देखील आहे. अशा जीर्णोद्धारानेच राष्ट्रीय एकात्मता कायमस्वरूपी पाया भक्कम बानू शकतो.

मात्र मशीद पाडल्याने असा हेतू आता भाजपाला लोकांपुढे मांडणं शक्य नव्हतं. त्याचबरोबर बाबरीनंतर जो हिंसाचार झाला ज्यात १००० पेक्षा जास्त लोकं मरण पावले याची देखील सल अडवाणींनी बोलून दाखवली. अडवाणी पुढे म्हणतात देशात आणि देशाबाहेर भाजपाला मानणारा वर्ग वाढत होता मात्र ६ डिसेंबरच्या घटनेनं त्यालाही ब्रेक बसला.

यानंतर अडवाणी जे म्हणाले त्याची सल भाजपाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अजूनही असणार ते म्हणजे,

”६ डिसेंबरच्या घटनांमुळे  विरोधकांना अयोध्या आंदोलनाला कट्टरपंथी आणि धर्मांध ठरवून बदनाम करण्याची संधी मिळाली आहे यात शंका नाही. ”

भाषणाचा शेवट करताना अडवाणी म्हणाले होते आमच्या अपेक्षेप्रमाणे ते ६ डिसेंबरला जे घडले ते आम्हाला तसे नको होते. पण प्रख्यात निबंधकार सर आर्थर हेल्प्स यांनी म्हटल्याप्रमाणे,

“एखाद्याला सर्वोच्च स्थानी नेणारे चांगले भाग्य क्वचितच खाली येते. जीवनात संधी तुम्ही  कल्पना केल्याप्रमाणे येत नाहीत. कधीही येत नाही.”

किंवा गोस्वामी तुलसीदासांनी वेगळ्या पद्धतीने मांडल्याप्रमाणे,

“होईं सोई जो राम रचि राखा.” ज्याचा अर्थ होतो जे काही रामाने रचले असेल तसेच होईल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.