मॅनेजमेंट बद्दल जगभर बोलणारे मुंबईतील डब्बेवाले अडचणीत का सापडले आहेत?

देशभरात गणेशोत्सव धुमडक्यात साजरा करण्यात येत आहे. अनेकजण गणेशोत्सवात आकर्षक देखावे करत असतात. मुंबईतील लोअर परेल येथील स्टेशन आणि डब्बेवाला ही संकल्पना घेऊन करण पाटील यांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापन केली आहे. 

चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहोचवणारे आणि जगात मॅनेजमेंटचे गुरू म्हणून स्थान असणारे मुंबईचे डब्बेवाले गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. दिवसाला २५ ते ३० डब्बे पोहोचविणारे डब्बेवाले आता फक्त ४ ते ५ जणांचे डब्बे पोहचवत आहे. यामुळे त्यांचे पगार ५ हजारांपर्यंत कमी झाले आहेत. मुंबई सारख्या शहारत ५ हजारात घर चालविणे शक्य तरी आहे का ? 

डब्बेवाल्यांच्या मॅनेजमेंटची प्रशंसा जभरातील उद्योजक करतात.

इतकंच नाही तर मुंबईतील डब्बेवाल्याचा मॅनेजमेंट अभ्यास हॉवर्ड सारख्या युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा करण्यात आला आहे. डब्बेवाल्यांचे चाहते जगातील कानाकोपऱ्यात आहे. यात एक इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स. २००३ मध्ये मुंबईत आल्यानंतर त्यांनी डब्बेवाल्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा डब्बेवाल्यांच्या वेळापत्रकानुसार त्यांना भेट घ्यावी लागली होती.

तसेच जगभरातील बिझनेस स्कूल्स, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, मोठ्या युनिव्हर्सिटी, कार्यालयात बिझनेस मॅनेजमेंटवर लेक्चर देण्यासाठी मुंबईच्या डब्बेवाल्यांना बोलावत जात होते. नेमकं कशामुळे मुंबईतील डब्बेवाले अडचणीत आले आहेत ? 

कमी अधिक नाही तर मुंबईतील डब्बेवाल्यांना १३० वर्षांचा इतिहास आहे.

डोक्यावर गांधी टोपी पांढरा ड्रेस ही डब्बेवाल्यांची मुख्य ओळख. कोरोनाचा काळ वगळता १३० वर्षांत डब्बेवाल्यांची सेवेत कधीच खंड पडला नाही. उन्हाळा, पावसाळा कुठल्याही काळात डब्बेवाले काम करायला मागे हटत नसायचे. हे सगळे डब्बेवाले सायकल आणि लोकलने प्रवास करतात.

दहशतवादी हल्ला असुद्या की महापूर कुठल्याच संकटात मुंबईतील डब्बे वाले मागे हटले नव्हते. त्यांनी मुंबईतील चाकरमान्यांना डब्बे पोहचविले. कोरोना आला आणि देशातील अनेकांच्या रोजगार हिरावून गेलेत. त्याच्या परिणाम डब्बेवाल्यांवर सुद्धा झाला. 

मुंबईत आता फक्त १ हजार डब्बेवाले उरले असल्याचे सांगितलं जातंय.

मुंबईतील ऑफिसच्या टाईमिंग हे सकाळी ९ ते ५ असतो. कर्मचाऱ्यांच्या साधारण दीड दोन तासांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे सकाळी लवकर घर सोडावे लागते. एवढ्या सकाळी डब्बा तयार होणे अवघड असते तसेच दुपारी जेवेपर्यंत तो थंडा सुद्धा होऊन जायचा. त्यामुळे कर्मचारी डब्बेवाल्यांकडून घरचे डब्बे मागवत होते. 

त्यामुळे डब्बेवाले काय करायचे तर त्यांच्या घरून जेवणाचा डब्बा घेणे आणि त्यांच्या ऑफिसला आणून देणे. घरापासून स्टेशन पर्यंत आणि पुढे स्टेशन पासून ऑफिस पर्यंत पोहचण्यासाठी डब्बेवाले सायकलचा वापर करतात.  सकाळी ७ ते ९ दरम्यान डब्बेवाले हे लोकांच्या घरून डब्बे घेऊन ते एका ठिकाणी जमा करतात. त्यानंतर ते कॅरेटवर ठेऊन रेल्वेत ठेवण्यात येतात. ज्या ज्या ठिकाणचे डब्बे आहेत ते उतरवले जातात. पुढे त्या एक ग्रुप हे डब्बे ऑफिस मध्ये पोचवतो. असे २०० ग्रुप होते त्यात प्रत्येक ग्रुप मध्ये २५ जण असायचे.  

५ हजार डब्बेवाले दररोज २ लाख डब्बे पुरवत होते. डब्बेवाल्यांचे सर्वात मोठे ग्राहक होते मोठ्या कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक,  सरकारी अधिकारी. कोरोना काळात सगळे ऑफिस बंद होते. त्यामुळे त्यांचे मुख्य कामच बंद पडले होते. 

कोरोना कमी झाला असला तरीही अनेक ऑफिस पूर्ण क्षमतेने सुरु झाले नाहीत. 

अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे. अनेक नोकदारांचे जॉब गेले असून ते आपल्या घराजवळ लहान मोठे काम करून  आपले पोट भरत आहेत.  त्यामुळे डब्बेवाले कोणाला डब्बे पुरवणार हा प्रश्न उभा राहिला. कोरोना कमी झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम दिले असल्याने त्यांना डब्बे मागविण्याची गरजच उरली नाही.

मोठ्या कॉर्पोरेट इमारतींसह बहुतेक कार्यालये बंद आहेत. तिथूनच डब्बेवाल्यांची जास्तीत जास्त कमाई होत होती. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम दिल्याने त्यांचे हे काम गेले आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांसाठी मुंबईतील लोकल १ वर्ष बंद ठेवण्यात अली होती. त्यानंतर डब्बेवाल्यांना सावरता आले नाही. 

डब्बेवाल्यांचे काम कमी होण्याचे अजून एक कारण म्हणजे म्हणजे दक्षिण मुंबईतील अनेक शाळांनी सुरक्षेचे कारण देऊन डब्बेवाल्यांना परवानगी नाकारली आहे. यामुळे सुद्धा त्यांच्या कामावर बराच परिणाम झाला आहे. अनेक शाळांनी आपले कॅन्टीन सुरु केल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितलं जात आहे. तसेच कोरोना संदर्भातील सेफ्टी लक्षात घेऊन अनेकांनी डब्बेवाल्याच्या हाताने डब्बा मागविणे बंद केले आहे.   

 यामुळे आता मुंबईत फक्त १ हजार डब्बेवाले उरले आहेत.

मुंबईतील डब्बावाल्यांची संख्या कमी झाली आहे आणि बरेच जण त्यांच्या मूळगावी परतले आहेत आणि इतरांनी ड्रायव्हर, वॉचमन, डिलिव्हरीमन आणि भाजी विक्रेते असे पर्यायी काम सुरु केले आहे. जे काही डब्बेवाले उरले आहेत, त्यांना पुढील काही दिवसात काम आणि उत्पन्न वाढण्याची आशा आहे.

या सगळ्यातून १५ हजारापर्यंत पगार डब्बेवाल्यांना मिळत होता, आता फक्त ५ ते ७ हजार मिळतात. सलग दोन वर्ष सायकल एकाच ठिकाणी उभ्या असल्याने अनेक डब्बेवाल्यांच्या सायकली खराब झाल्या आहेत. पहिल्या लॉकडाऊन मध्ये डब्बेवाला असोसिएशनच्या वतीने त्यांच्या सदस्यांना पहिले तीन महिने दिड हजारांची मदत केली होती. त्यानंतर मात्र कुठलीही मदत त्यांना करण्यात आली नसल्याचे सांगितले जाते. 

मॅनेजमेंट बद्दल जगभर बोलणाऱ्या डब्बेवाले जोडधंद्याची साथ देऊ शकले नाही. 

एकच प्रकारचा व्यवसाय डब्बेवाले करत होते. ते म्हणजे लोकांना डब्बे पोहचविणे. त्याला कुठल्याही जोडधंद्याची साथ दिली नाही. एअरटेलने आपल्या एका जाहिरातीसाठी डब्बेवाल्याचा उपयोग केला होता. नंतर मात्र डब्बेवाल्यांनी दुसऱ्या कंपन्यांकडे लक्ष दिले नाही.

 जाहिरातीतून त्यांना चांगले पैसे मिळाले असते. अधिक पैसे मिळविण्यासाठी त्यांनी वेगळा मार्ग कधीच निवडला नाही. डब्बेवाल्यांची कामाची पद्धत पाहून एका १५ वर्षाच्या मुलाने कुरियर सेवा सुरु केली होती. मात्र डब्बेवाले यांनी दुसरा कुठलाही जोडधंदा स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढविल्याचे सांगितले जात आहे. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गारगोटे यांनी नमूद केले की, त्यांच्या काही सहकाऱ्यांनी इतर कामे सुरू केली आहेत. “काही जणांनी सुरक्षा रक्षक, लिपिक आणि हॉटेल वितरण कामगार म्हणून नावनोंदणी केली होती.

 

पण गारगोटे यांच्यासारख्या कामगारांसाठी, ज्यांची कुटुंबे डब्बावाला व्यवसायात 100 वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी ही सुंदर ऑर्केस्टेटेड प्रणाली सोडणे हा एक शाश्वत पर्याय आहे का?

 

पहिल्या लॉकडाऊनमध्ये मुंबई डब्बावाला असोसिएशनने आपल्या कामगारांना आर्थिक पाठबळ दिले, परंतु त्यानंतर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

 

असोसिएशनचे सचिव नितीन सावंत यांनी IndianExpress.com ला सांगितले की, “पहिल्या लॉकडाऊनमध्ये असोसिएशनमधील सर्व डब्बावाल्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा करण्यात आले. त्यांनी स्पष्ट केले की पहिल्या लॉकडाऊनमुळे मार्च ते ऑक्टोबर 2020 पर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता, कामगारांना एकतर इतर नोकऱ्यांकडे जाण्यास भाग पाडले गेले किंवा खाजगी वितरणात भाग घ्यावा लागला.

“कोविड -19 च्या संपूर्ण परिस्थितीत डब्बावाल्यांना निधी गोळा करणे, मास्क आणि सॅनिटायझर आणि रेशन प्रदान करण्यात मदत करणार्‍या स्वयंसेवी संस्था आणि गर्दी-अनुदानित मोहिमांच्या प्रयत्नांबद्दल संघटना अत्यंत कृतज्ञ आहे,” ते म्हणाले, त्यांना “फार थोडे” मिळाले. सरकारकडून पाठिंबा.

 

ऑक्‍टोबर ते मार्च 2021 दरम्यान, गाड्या पुन्हा सुरू झाल्या असूनही, केवळ 200-300 डब्बेवाले शहरात परतले. आणि आता, दुसऱ्या लाटेमुळे गाड्या पुन्हा बंद आहेत. “परिस्थिती उदास दिसत आहे, आणि कामगार पूर्वीच्या तुलनेत फारच कमी पैसे कमावत आहेत,” सावंत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.