आयआयटीयन पोरांनी बनवलेली इलेक्ट्रिक एथर मार्केटमध्ये राडा घालत आहे

भारतात एक काळ असा होता की जेव्हा तुम्हाला जर मारुतीची ८०० कर जरी घ्यायची असेल तर किमान १-२ वर्षाचं वेटिंग असायचं. १९९१-९२च्या लिबरॅलायझशनच्या आधी लायसन्स आणि परमिट राजचा जो जमाना होता त्याची ती देणं होती. मात्र परवा जेव्हा मी एथरची इलेक्ट्रिक स्कुटर बघायला गेलो तेव्हा जवळपास तसाच अनुभव आला. पण इथं सिन थोडा वेगळा होता. इथं पण वेटिंग होती पण ती होती या स्कुटरला असलेल्या डिमांडमुळं. २-३महिन्याचं वेटिंग असल्याचं त्या सेल्स मॅनेजरनं सांगितलं.

एथरच्या ४५० आणि ४५०X या मॉडेलची बाजारात जोरदार डिमांड आहे.

मग शेवटी काय आलो तसाच घरी. आणि बघावं म्हटलं ही ह्या स्कुटर का एवढ्या डिमांड मध्ये आहेत. बघितलं तर पहिली भारी गोष्ट ही निघाली की कंपनी भारतीय आहे. आयआयटी मद्रासच्या पोरांनी २०१३मध्ये हे स्टार्ट-अप काढलं होतं. तरुण मेहता आणि स्वप्नील जैन या दोघं या कंपनीचे फाऊंडर.

खरं तर कॉलेजच्या लॅबमध्ये यांना सुरवातीला एक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरण्यात येणारी इफिशिएंट लिथियम-आयन बॅटरी बनवयाची होती.

पण पुढं याचं EV मधला इंटरेस्ट वाढत गेला आणि त्यांनी आपल्या पॅशनलाच आपला बिझनेस बनवलं.

स्टार्ट-अप मध्ये सगळ्यात महत्वाचं असतंय फंडिंग. 

तुम्हाला तुमच्या कामाचा प्रोटोटाईप दाखवून इन्वेस्टर्सना तुमच्या कंपनीत पैसे गुंतवायला पटवायला लागतंय. मात्र जैन आणि मेहता यांचं काम चोख होतं त्यामुळं सुरवातीची थोडी झकझक सोडली तर इन्वेस्टर्स यांना लवकर भेटले.

२०१४ मध्ये त्यांना IIT मद्रासच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून ४५ लाख रुपये मिळाले.

मात्र २०१४ च्या उत्तरार्धात, स्टार्टअपला पुन्हा निधीची कमतरता भासत होती कारण ते चाचणीच्या टप्प्यात होते. तरुण मेहता सांगतो की भारतीय बाजारपेठेसाठी स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर तयार करण्याच्या कल्पनेवर गुंतवणूकदार धोका पत्करण्यास तयार नव्हते.

मग भरपूर नकार मिळाल्यानंतर, तरुण आणि स्वप्नील या दोघांनी फ्लिपकार्टच्या फाउंडरशी  संपर्क साधला – सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल – ज्यांनी एथरच्या आइडियावर विश्वास ठेवला आणि डिसेंबर २०१४ मध्ये एथर एनर्जीमध्ये $१ दशलक्ष गुंतवणूक केली.

फंडींगची एकदा सोय झाल्यानंतर त्यांनी मग यातला जादातर पैसा r&d वर लावला. एका  चांगल्या इलेक्ट्रिक वाहना बरोबरच हा नाही तर एक चांगली दुचाकी देणे ज्यात एक चांगला बॅटरी बॅक-अप असलेली बॅटरी,फास्ट चार्जर, बीएमएस आणि टचस्क्रीन डॅशबोर्ड सारख्या सुविधा देणे हा त्यांचा उद्देश होता आणि त्यांनी तो पूर्ण पण केला. त्यामुळंच आज रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये एथरची सगळ्यात जास्त वाहनं आहेत.

या स्कुटर्सचा लूकपण लोकांना जाम आवडतोय. टेस्ट ड्राईव्ह नंतरच लोकं गाडीबरोबर फोटो काढून इंस्टाग्राम वर टाकायला लागलेत. गाडी चालवयला पण तशी स्मूथ आहे. पण सगळ्यात जास्त या इलेक्ट्रिक स्कुटरची मागणी असण्याचं कारण आहे वाढणाऱ्या पेट्रोलच्या किंमती.

इलेक्ट्रिक वाहन इथं सगळ्यात जास्त फायद्याचं ठरतंय. एथरच्या स्कुटर चालवायला वर्षाला पेट्रोलवर चालणाऱ्या स्कुटरच्या तुलनेत जवळपास १५००० हजार रुपये कमी लागतात असं सांगितलं जातंय.

इलेक्ट्रिक गाडयांचा सगळ्यात सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कमी असलेल्या चार्जिंग स्टेशनचा.

पण एथरच्या ४५० आणि ४५०X या दोन्ही गाड्या एका चार्जिंगमध्ये ७० ते ८० किलोमीटर आरामात चालतात असं हे गाड्या वापरणारे सांगतायत.

त्यामुळं गावातल्या गावात किंवा कमी अंतरावर फिरायला या गाड्या चालू शकतात.

बाकी गाडीचा डिस्प्ले पण मस्तय. मोबाइल एकदा गाडीला कनेक्ट केला की गाडी चालवताना खिशातून बाहेर काढावा लागत नाही. त्यामुळं येणार काळ इलेक्ट्रिक गाड्यांचा असणार म्हणतायेत ते आता खरं वाटू लागलंय.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.