बजरंग दलाच्या मते “वर्षभर काहीही करा, पण १४ फेब्रुवारीला आमची संस्कृती बिघडते”

आज १४ फेब्रुवारी, व्हेलेंटाईन डे.

उधळून दे तुफान सगळ, काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारख बाणावर खोचलेल.

कुसमाग्रजांच्या या शब्दांप्रमाणे सगळ उधळून, भावनांना वाट मोकळी करून देत, मनात साचलेलं प्रेम आज अनेक जण व्यक्त करतात तर काही कोणी व्यक्त होईल का याची वाट पाहतात. कारणे काहीही असलीत तरी तारुण्याच्या बहरात, प्रेमच फळ चाखण्याचा मोह प्रत्येकाला असतोच त्यामुळे हा आजचा दिवस तरुणांसाठी आणि “मी सुकलेलं पान नाही अनुभवाच रान आहे” असे म्हणाऱ्या अनेक तरुणांसाठी विशेष आहेच.

पण या आपल्या असल्या खोचलेल्या प्रेमाबिमाच्या गप्पा, लाल गुलाबच फुल तिला किंवा त्याला देई पर्यंत कोमेजणार नाही यासाठी केले प्रयत्न आणि उगाच उभ्या आयुष्यातजेवढा वेळ आरश्यासमोर घालवला नाही तेवढा घालून केलेले प्रयत्न या सगळ्या आपल्या कल्पनांना आणि प्रयत्नांना राम राम ठोकणाऱ्या आणि प्रेम करणार्यांना ठोकणाऱ्या,

“बजरंग दल” 

या संघटनेसाठी देखील आजचा दिवस तसा जास्त विशेषच असतोच. पण यावर्षीचा प्रकार जरा जास्तच विशेष आहे

कारण काळ पासूनच बजरंग दल आणि त्यांचा विरोध यावर भयंकर विनोद आणि मीम तयार होता आहेत. बजरंग द्लचा प्रेमाला अर्थात त्यांच्या म्हण्यानुसार पाश्चात्य संस्कृतीच्या व्हेलेंटाईन डे ला इतका विरोध का असावा?

आम्ही म्हणलं आपल्या प्रेम करणाऱ्या भिडुंसाठी याच उत्तर शोधूनच काढू .

तर बजरंग दलचा इतिहास तुम्ही वाचाच पण त्यापूर्वी थोडेसे सावध रहा बर का ….

कारण आज सकाळीच नागपूर येथे बजरंग दल ने व्हेलेंटाईन डे विरोधात निदर्शने करत मोर्चा काढला आहे, पश्चिम महाराष्ट्र तसा वैचारिक वैगेरे म्हणून सांगण्यात येत असल्याने इथल्या बजरंग दलाने फक्त, प्रेमात भरकटू नका, प्रेम करणे म्हणजे नेमक काय? अशा पद्धतीने तरुणांचे कौन्सिलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे तुम्ही थेट फटके खाणार नसला तरी अप्रत्यक्ष खावे लागतील कदाचित. मागे एकदा तर देहराडून मध्ये जोडप्यांचे व्हिडिओ शुटींग करण्यासाठी २५० जणांची टीम बजरंग दलने तैनात केली. आजही अशाच प्रकारे हैद्राबाद, भुबनेश्वर इथे देखील बजरंग दल या संघटनेचे कार्यकर्ते तैनात आहेत तुम्हाला विदेशी संस्कृती कडे झुकू न देण्यासाठी, त्यांच्या मतानुसार.

यातलाच एक मिम आहे त्यात असे म्हणले आहे,

“वर्षभर काहीही करा, पण १४ फेब्रुवारीला आमची संस्कृती बिघडते”.

हेच नेमक त्यांनी काय केलं आज पर्यंत हे जरा पाहूच म्हणजे या मेमचा थोडा अर्थ लागेल.

या संघटनेची स्थापना झाली ती १ ऑक्टोबर १९८४ साली. जेव्हा विश्व हिंदू परिषद राममंदिर बांधण्याच्या मागणीसाठी “राम जानकी रथयात्रा” चालू केली या यात्रेच्यारक्षणासाठी काही तरुणांना एकत्र केलं गेल आणि ह्याच सुरक्षा करणाऱ्या तरुणांची संघटना निर्माण झाली ती म्हणजे “बजरंग दल”. सध्याच्या सरकारचे अर्थात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार विनय कटियार हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.

सेवा, सुरक्षा, संस्कृती असे या संघटनेचे ब्रीद वाक्य आहे. या वाक्यानुसार त्यांची आजपर्यंतची कारकीर्द देखील आहेच म्हणा. या संघटनेवर नरसीमहा राव यांनी १९९२ साली पहिल्यांदा बंदी घातली आणि नंतर एका वर्षात ती काढून टाकण्यात आली आणि संघटना पुन्हा कार्यरत झाली. 

या सघटनेवर बंदी घालावी अशी मागणी आजपर्यंत कित्येकदा झाली आहे. एवढेच नव्हे तर दिवंगत अट्टलबिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांनी देखील या संघटने बाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पण गेली अनेक वर्ष अमेरिकेच्या CIA ने धार्मिक दहशतवादी संघटना असा ज्यांचा थेट उल्लेख केला आहे असे बजरंग दल तसे शांत आहे. एकमात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे ती म्हणजे वर्षभर जर काहीच धुमाकूळ घालता आला नाही तर धुमाकूळ न घालून वाचवलेली सगळी ताकद ते आज वाया घालवतात.

मग जोडप्यांचे लग्न लावून देणे, मुलीच्या डोक्यात बळजबरीने कुंकू भरायला लावणे, उठाबश्या काढायला लावणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राखी बांध्याला लावणे. म्हणजे किमान आम्हाला जो हिंदू धर्मज्ञात आहे त्यात बहीण भावच नात आणि एका पती पत्नीच नात यात सर्व पातळीवर खूप मोठा फरक आहे मग याच धर्माच्या संस्कृतीच्या रक्षणाचे कारण देत पत्ती पत्नी होणाऱ्या जोडप्यास हे राखी बांधून बहीण भाऊ करतात यात नेमक रक्षण झालं कि काय हे ठरवा ? 

पण मंडळी या सगळ्या इतिहासात एक गोष्ट आहे ती म्हणजे संघटनेचे नाव ते म्हणजे “बजरंग दल”, अर्थात बजरंग म्हणजे कोण ?

तर ज्या माणसाने राम सीता यांचे मिलन होण्यासाठी अख्खी लंका पेटवली ते हनुमान. त्यांचे नाव संघटनेला यांनी दिले, आणि रामाच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर यांनी हि संघटना स्थापन देखील केली. पण ज्या रामाने प्रेमाचा आदर आणि रक्षण करण्यासाठी युद्ध केले त्याच रामाचे भक्त आणि हे प्रेम टिकण्यासाठी जे सगळ्यात पुढे होते असे हनुमान यांचे नाव धारण करून हे बजरंग दल मात्र प्रेमालाच विरोध करतात किंवा त्यांच्यानुसार या दिवसाला विरोध करतात हे लॉजिक काही कळत नाही राव !!!

असो तुम्ही मात्र आजचा दिवस ढकला कारण आज जर तुम्ही प्रेमापोटी काही अश्लिल चाळे केले तर उगाच मार खाल कारण संस्कृतीचे रक्षण करायचे आहे बाकी काय उद्यापासून सगळ रान तुमचंच रान आहे. सोशल मिडीयावरची एकाची प्रतिक्रिया मात्र जाता जाता सांगायलाच हवी, 

” बजरंगबलीने तो लंका जलाई थी, बजरंगबली तो रावण के खिलाफ हैं पर पता नहीं बजरंग दल क्यूं अपनोंके मिलने के खिलाफ हैं, आखिर बजरंग दल को गुस्सा क्यू आत्ता हैं.”

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.