ज्या रेव्ह पार्ट्यांमुळे बॉलीवूड कलंकित झालंय त्याची सुरवात नेमकी कधी झाली ?

मुंबई मध्ये क्रूझ रेव्ह पार्टी चालू होत. तिथे एनसीबी ने छापा टाकून शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला त्याच क्रूझ वरून ताब्यात घेण्यात आले होते. अनेक दिवसापासून आर्यन खान अटकेत आहे.कालच त्याच्या जामिनावर सुनावणी झाली. पण त्याला काही कोर्टाने जामीन दिला नाही. ह्या सगळ्या प्रकरणामुळे बॉलीवूड मधील रेव्ह पार्टी कल्चर, ड्रग्स कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

याआधीही सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रबर्ती हि ड्रग्स कनेक्शन संबंधात अनेक दिवस अटकेत होती. तेव्हा श्रद्धा कपूर, सारा अली खान, राकुल प्रीत, आदींची ड्रग्स प्रकरणात चौकशी करण्यात आली होती.

गेल्या वर्षी रिया चक्रबर्ती चे ड्रग्स चे प्रकरण संपता संपत नाही तोच परत एकदा आर्यन खान च्या ड्रग्स मधील अटकेमुळे बॉलीवूड एवढं का ड्रग्स च्या आहारी जातंय असा प्रश्न तुम्हाला पण पडलाय ना.. तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

हा आर्यन खान ज्या रेव्ह पार्टी मधून पकडला गेला ती रेव्ह पार्टी म्हणजे नक्की असते तरी काय हे आधी तुम्हाला सांगून टाकतो…

1950 च्या दशकात लंडनमधील अनेक लोकांनी जुन्या पद्धतीपासून वेगळी जीवनशैली निवडण्यास सुरुवात केली. त्यांना बोहेमियन म्हणतात. त्यावेळी रेव्ह हा शब्द धमाकेदार बोहेमियन पार्टीसाठी वापरला जात असे.

यामध्ये म्युझिक च्या तालावर थिरकणारी तरुण मंडळी असायची. सेक्स, ड्रग्स चा वापर केला जात असे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि 1990 च्या दशकात डीजेच्या संकल्पनेमुळे रेव्ह पार्टी वाढल्या. डीजे,सेक्स ,ड्रग्स यांचं पॅकेज असणाऱ्या ह्या रेव्ह पार्ट्या भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात. महागडी प्रवेश फी त्यांच्याकडून आकारली जाते.

हा विषय तर झाला रेव्ह पार्ट्यांचा… आता आपण बघूया ड्रग्स म्हणजे काय आणि त्याचे काय प्रकार असतात…. तुम्हाला पुढे जी माहिती सांगणार आहे ती फक्त माहिती पुरतीच मर्यादित असू द्या बरं  का… नाही तर ड्रग्स च्या भानगडीत पडल्यावर तुम्ही पण त्या आर्यन खान सारखे गोत्यात याल

ज्या पदार्थाच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) या पदार्थाचा मादक पदार्थात समावेश केला जातो. ब्राऊन शुगर, झंडूबाम रुमालवर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते. स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जातो. इतकेच नाही तर मॅजिक मश्रूम, एलसीडी, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर यांचाही वापर ड्रग्स म्हणून वापर केला जातो.

ड्रग्स घेतल्यावर नक्की काय प्रक्रिया शरीरात घडत असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता वाढली असलेलं ना….तर ते पण सांगतो.

देशातील प्रसिद्ध सायकाइट्रिस्ट डॉक्टर राजेश कुमार एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असे म्हणतात की,

“तुम्ही कोणतंही ड्रग्स घ्या. आपल्या शरीरावर परिणाम करण्याचा एकच समान मार्ग ड्रग्स वापरतात. जेव्हा तुम्ही ड्रग्स घेता तेव्हा ते आपल्या मेंदूच्या मधल्या भागात पोहोचल्यावर प्लेजर ऐक्टिविटीजच्या सर्किट मध्ये जाऊन काम करतात. सामान्यत: मेंदूचा हा भाग सेक्स, फूड, प्लेजर ऐक्टिविटीज, म्युजिक या क्रिया केल्याने सक्रीय होतो. हा भाग सक्रीय झाल्यास व्यक्तीला अतिशय समाधानी वाटू लागते. आनंदी भाव त्याच्या मनी जागृत होतो. म्हणूनच ड्रग्स घेतल्याने व्यसनी व्यक्तीला छान वाटू लागते व वारंवार ती भावना अनुभवण्यासाठी तो ड्रग्स घेण्यास सुरुवात करू लागतो व व्यसनाधीन होतो.”

आता विषय राहिलाय तो हा कि, हि बॉलीवूड सेलेब्रिटी ड्रग्स च्या एवढ्या आहारी का गेली आहेत. सांगतो ते पण 

बॉलीवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचे सेवन केले जाते. याचे स्पष्टीकरण देताना अनेक जण म्हणतात की बॉलीवूड मध्ये डिप्रेशन मोठ्या प्रमाणावर आहे. आयुष्य हे धकाधकीचे आहे. रात्री अपरात्रीचे शूट, धावपळ, फिल्म हिट किंवा फ्लॉप होण्याचे टेन्शन, फिल्म मध्ये गुंतविलेला पैसा वसूल होईल कि नाही याची चिंता यामुळे अनेक व्यक्ती ड्रग्स घेतात.

पण जाणकारांच्या मते ही फक्त एक अफवा आहे. ज्या व्यक्तीला डिप्रेशन आणि ताण तणावाची समस्या आहे तो योग्य उपचार घेऊन सुद्धा बरा होऊ शकतो. या उपचारादरम्यान जी औषधे वापरली जातात त्यात कुठेही अशा प्रकारच्या ड्रग्सचा वापर केला गेलेला नसतो. उलट जेवढे जास्त ड्रग्स व्यक्ती घेतो तेवढी त्याची समस्या वाढत जाते.

ड्रग्सच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना जर तुम्ही विचारलं की , “का रे बाबा असं ड्रग्स,दारू, वगैरे का घेतोस” तर प्रत्येक जण हे बोलतं की ,”माझ्या मागे लय टेन्शन आहे, माझ्या डोक्यावर किती ताण आहे हे तुला नाही कळणार.”  ड्रग्स च्या आहारी जाणारे अनेक जण त्यांच्या ह्या सवयीसाठी डिप्रेशन ला जबाबदार धरतात.

ह्या आर्टिकल च्या शेवटी डिप्रेशन पासून कसं  दूर ठेवता येईल यावर फुकटचा सल्ला देणार आहे. चालेल ना ?

नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे, ज्या गोष्टींमुळे ताण तणाव येतो त्या गोष्टी दुर्लक्ष करणे, योगा करणे, मेडीटेशन करणे, मानसोपचारतज्ञांकडून योग्य उपचार घेणे यांसारखे चांगले मार्ग सुद्धा ताण तणावावर मात करण्यास उपयोगी ठरू शकतात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.