या कारणामुळे सैन्यातील ‘ब्राह्मण रेजिमेंट’ बरखास्त करण्यात आली होती.
राजू शेट्टी यांनी सैन्यात आपली पोरं जातात, देशपांडे-कुलकर्णी यांची जात नाही अशा आशयाचे वक्तव्य केले. त्यावरुन जोरदार विरोध देखील करण्यात आला. राजू शेट्टी यांनी याबाबत माफी देखील मागीतली. त्यानंतर सोशल मिडीयावर अनेकांकडून विचारण्यात आलं, भारतीय सैन्यात ब्राह्मण रेजिमेंट का नाही?
भारतीय सैन्यात ब्राह्मण रेजिेमेंट होती मात्र ती बंद करण्यात आली. काही दिवसांपुर्वी इंग्रजांनी काढून घेतलेला सन्मान परत मिळावा यासाठी पुन्हा एकदा ब्राह्मण रेजिमेंटची स्थापना करण्याची मागणी नुकतीच केंद्र सरकार कडे करण्यात आली होती.
इंग्रजांच्या इस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेल्या आणि नंतर बरखास्त केलेल्या ब्राह्मण रेजिमेंटचा हा इतिहास.
इस्ट इंडिया कंपनी हि भारतात व्यापार करण्यासाठी आली पण हळू हळू सत्तास्थापनेची त्यांना चाहूल लागू लागली. पण भारता सरख्या लढव्या, भौगोलिकरित्या मोठा विस्तार असणाऱ्या देशावर राज्य करतांना त्यांना गरज होती ती सैन्याची. त्यांच्या देशातून सैन्य मागवून घेणे त्यांच्यासाठी अशक्य होते. मग त्यांनी आपल्याच देशातील लोकांच्या जोरावर सैन्य उभारणीस सुरवात केली. त्यासाठी त्यांनी अनेक सैन्य तुकड्या उभ्या केल्या इंग्रजांच्या भाषेत रेजिमेंटस.
इतिहासाचे अनेक दाखले आपल्याला इतकचं दर्शवतात कि ज्यांना शास्त्र महिती होत, ज्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले होते, जे ज्ञानी होते ते “ ब्राह्मण ”. पण एक सत्य मात्र या इतिहासाच्या पानांमध्ये दडलेलं आहे ते म्हणजे शास्त्र महिती असणऱ्या ब्राह्मणांनी इंग्रजांच्या काळात शस्त्र देखील उचले होते.
कॅप्टन टी.नेलोर याने अवधच्या नबाबाच्या तैनाती फौजेसाठी ब्राह्मणांची पहिली ” पायदळ रेजिमेंट ” सन १७७६ मध्ये उभारली. या रेजिमेंटमध्ये ब्राह्मण सैनिकांची भरती केली जात असे. या सैनिकांचा गणवेश खाकी फेटा, लाल कोट, गडद निळी पॅन्ट आणि पांढरे लेगिंग्ज असा होता. छातीवरील बिल्ला (बॅज) हा जहाजाच्या नांगराच्या आकाराचा होता आणि त्यावर सर्वात वर राजमुकुट आणि खाली “ब्राह्मणस” अशी अक्षरे होती. हीच होती सैन्यातील पहिली ब्राह्मण रेजिमेंट.
या रेजिमेंट ने १८०३-०५ मध्ये दुसरे मराठा युद्ध, १८१४-१६ मध्ये अंग्लो-नेपाळी १८२४-२६, अंग्लो- बर्मीज१८२६ भरतपूर या युद्धांमध्ये आपला पराक्रम दाखवून युद्धे जिंकली आणि अनेक सन्मान प्राप्त केले. पहिल्या विश्व युद्धाच्या वेळेस या रेजिमेंट ला येमेन देशातील एडन या शहरात पाठवण्यात आलं होत. त्यावेळेस त्यांना ओस्मानी साम्राज्याकडून मोठ्याप्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते.
त्यानंतर ब्रिटिशांनी १९१७ मध्ये दुसरी बटालियन उभी केली आणि त्यांना इराणला पाठवण्यात आले.
पहिल्या महायुद्धात जाण्यापूर्वी पहिल्या ब्राह्मण रेजिमेंटचे कार्य प्रामुख्याने अलाहाबाद मध्ये चालायचे. आणि तिथूनच ते तिसऱ्या ब्राह्मण रेजिमेंटला जोडले गेले होते. त्यानंतर १९२२ मध्ये या रेजिमेंटची पंजाब रेजिमेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. या रेजिमेंटच वैशिष्ट्य म्हणजे यात ब्राह्मणानं सोबत पंजाब मधील मुस्लीम समुदायास देखील सैन्यात भरती करून घेण्यात आलं होत.
त्यानंतर भारता स्वातंत्र्याची संकल्पना मूळ धरू लागली होती. अनेक ठिकाणी उठाव तसेच स्वतंत्र भारताचा विचार पसरत होता. अशा स्थितीत लढणारे ब्राह्मण सैन्य तरी कसे मागे राहील, त्यांनी देखील यात उडी घेतली १८५७ मध्ये या रेजिमेंटने हत्यारबंद विद्रोह केला आणि मग स्वातंत्र्यासाठीच्या विद्रोहाचा प्रवास सुरु झाला.
या उठावात मंगल पांडे हे इंग्रजी सैन्यात असून सुद्धा त्यांनी त्यांच्या विरुद्ध बगावत केली होती. नानासाहेब पेशवे यांनी सुरु केलेला इंग्रजी राजवटीचा विरोध, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी पुकारलेल इंग्रजांच्या विरोधातले युद्ध, तात्या टोपे यांच्या सारख्या अनेक ब्राह्मण क्रांतीकारकांनी ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र उगारले होते आणि त्यामुळे इंग्रजांना चांगल्याच नुकसानाला सामोरे जावे लागले होते.
त्यामुळे त्यांचा ब्राम्हण सैनिकांवरचा विश्वास उडाला होता.
१९४२ मध्ये मोठ्याप्रमाणात स्वातंत्र्याच्या मागणीच नेतृत्व ब्राह्मण समाजाकडून करण्यात येत होते. यातच ब्राह्मण रेजिमेंटने दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांकडून लढण्यास मनाई केली होती. यामुळे ब्राह्मण जर सैन्यात राहिले तर फौजेत असंतोष निर्माण करतील. तसेच इतर सैन्यास बगावत करण्यास प्रवृत्त करतील अशी शंकेची पाल चुकचुकू लागली होती म्हणून त्यांना सैन्य भरती करण्यास बंदी घातली.
एकीकडे देशात प्रचंड प्रमणात स्वतंत्र्य चळवळीची धग पेटत असतांना दुसरीकडे सैन्य विद्रोहाची भीती इंग्रजांना सतावत होती. अखेरीस यावर पर्याय शोधला गेला आणि इंग्रज राजवटीने जसा आपल्या देशाचा वापर आधी व्यापारासाठी करून घेत देशावर राज्य केले तसेच त्यांनी त्यांच्याच संरक्षणासाठी उभी केलेली पहिली ब्राह्मण रेजिमेंट १९४२ मध्ये रद्द केली.
हे ही वाचा.
- अर्धे हिंदू आणि अर्धे मुसलमान असणारे हुसैनी ब्राम्हण.
- आंबेडकर म्हणाले ,श्रीधर टिळक हाच खरा लोकमान्य .
- पेरियार कोण होते..?