भारताचं प्रतिनिधित्व की ब्रँडची जाहिरात दीपिका वर्ल्डकपमध्ये कोणत्या कारणामुळे दिसली?

कालच्या वर्ल्डकपमध्ये फाइनलनंतर जेवढा जल्लोष अर्जेंटिनात झाला नसेल तेवढा राडा आपल्या भारतात झालंय. एकतर आपल्या अर्ध्या पब्लिकला मेस्सी आणि रोनाल्डो हे दोनच प्लेअर माहित आहेत. त्यामुळे माहित असलेला प्लेयरची टीम जिंकलीय एवढंच कळत होतं. असं ही भारताची वर्ल्ड कपची टीम नसल्याने दुसरी एकादी टीम पकडणं आपल्याला भागच होतं. पण एवढ्यात आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा दीपिका पदुकोण वर्ल्ड कपबरोबर दिसली.

फायनलच्या आधी वर्ल्डकपच अनावरण  करण्यात आलं तेव्हा कॅसिलास बरोबर दीपिका पदुकोण दिसली. 

पण मॅटर इथंच थांबला नाही. लागलीच हा टॉपिक सध्या बॉयकॉट गँगच्या टार्गेटवर असलेल्या दीपिका आणि शाहरुखच्या पठाण या पिक्चरशी जोडून पाहण्यास सुरवात केली. दीपिका पदुकोणचं महत्व इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मने ओळखलं मात्र भारतीयांना कळलं नाही, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर दीपिका पदुकोनने भारताला रीप्रिंझेन्ट करून  भारतीयांची मान उंचावली आहे अशी कॉमेंट्री सुरु झाली. विशेतः दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं असं बोललं गेलं.मात्र त्याचवेळी दीपिकाचं हे देशप्रेम वगैरे नाहीये तर कंपनीची जाहिरात करण्यासाठी दीपिकाला चान्स दिल्याचं बोललं गेलं.

एवढंच नाही तर दीपिका पदुकोण वर्ल्ड कप ट्रॉफीचं अनावरण करणारी जगातील पहिली अभिनेत्री असल्याचंही बोललं जात आहे.

त्यामुळॆ नक्की सिन काय होता? दीपिकाला इतक्या महत्वाच्या इव्हेंटमध्ये उपस्थित राहण्याची संधी कशी मिळाली? तेच जाणून घेऊया. तर दीपिका पदुकोणला फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती ती एका कंपनीचं ब्रँड अँबेसेडर असल्यामुळे. दीपिका पदुकोण ही लुवी व्हिट्टोन (Louis Vuitton) या कंपनीची ब्रँड अँबेसेडर आहे. याच लुवी व्हिट्टोन कंपनीला वर्ल्डकपच्या ट्रॉफीसाठी सुटकेस बनवण्याची स्पॉसन्सरशिप मिळाली होती.

वर्ल्डकपचं आवरण करताना तुम्ही बघितला असेल तर या लुई व्हिट्टोनच्या सुटकेसमधूनच कपचं अनावरण करण्यात आलं होतं. लुई व्हिट्टोन हा जगातला टॉपचा लक्झरी ब्रँड असल्याने त्यांनी वर्ल्ड कप ठेवण्याची सुटकेस स्पॉन्सर करणं वेगळी गोष्ट नाहीये. मात्र या एवढया मोठ्या ब्रॅण्डने दीपिकाला ब्रँड अँबेसेडर करणं ही मात्र वेगळी गोष्ट आहे. आणि त्याहूनही विशेष गोष्ट म्हणजे फिफा वर्ल्डकपच्या एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये दीपिकाला ट्ट्रॉफी उचलण्यासाठी स्थान देणं मात्र वेगळी गोष्ट आहे.

या वर्षी मी महिन्यातच दीपिका पदुकोणला लुई व्हिट्टोनने ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित केलं होतं. यावेळी आपल्यासाठी हे स्वप्नवत असल्याची प्रतिक्रिया दीपिका पदुकोनने दिली होती.

आता येऊया आपल्या मूळ प्रश्नावर मग दीपिका पदुकोनने खरंच भारताचं प्रतिनिधित्व केलं का? तर याचं सरळ सोपं उत्तर हो असं म्हणता येइल.

कारण असंही या मोठ्या समारंभात कलाकरांना त्यांची टॅलेंट, लोकप्रियता या बेसिस वर बोलवलं जातं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दीपिका पदुकोणला एवढ्या मोठ्या ब्रॅण्डने ब्रँड अँबेसेडर करणं, तिला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी देणं यामागे भारताच्या वाढत्या मार्केटची लिंक आहे.

भारत जी आज जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि तेही जगात सर्वाधिक वेगाने अर्थव्यवस्था असल्याने अनेक मोठ्या कंपन्या त्यांचे हातपाय भारतात पसरवण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी दीपिका पदुकोनच फिफासारख्या मोठ्या मंचावर उपस्थित असणे हे भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचं, भारतीयांच्या श्रीमंत होण्याचं प्रतिनिधित्व असल्याचं सांगितलं जात आहे.

बाकी जे लॉजिक आहे ते तुम्हला सांगितलं. आता तुम्ही ठरवा दीपिका पदुकोण नेमकी वर्ल्डकपमध्ये नेमकी का उपस्थित राहिली.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.